आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:चौघांच्या मनात आयुष्य संपवण्याचा आला होता विचार, तसाप्रयत्नही केला; आता यश मिळवून इतरांसाठी ठरले आदर्श

रांची7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कठीण काळात निराशेवर मात करून आयुष्यात यश मिळवणाऱ्यांच्या चार कथा

एकाकी जीवन व आयुष्यातील अडचणींना कंटाळून अनेक लोक आत्महत्येचा विचार करतात. अर्थात, नैराश्याच्या त्या काळातून बाहेर पडणे अशक्यही नाही. नैराश्यावर मात करणाऱ्या, नकारात्मकतेवर विजय मिळवणाऱ्या चार योद्ध्यांची ही कथा. त्यांनी आता आयुष्यात यश तर मिळवले आहेच, शिवाय इतरांनाही ते आयुष्याचे तत्त्वज्ञान शिकवत आहेत. निराश असलेल्यांना त्यातून प्रेरणा मिळेल, असे त्यांना वाटते. त्यांची कथा त्यांच्याच शब्दांत...

शुभम च्यवन : रॅगिंगमुळे आत्महत्येचा विचार, आता नृत्यशिक्षिका

२०१४ मध्ये आत्महत्या करण्याचा विचार केला होता. उपचारांमुळे बरी झाले. ‘निफ्ट’ मध्ये निवड झाली, पण रॅगिंगमुळे पुन्हा तब्येत बिघडली. दिल्लीत उपचार सुरू झाले. नंतर बिरजू महाराजांच्या कलाश्रमातून कथ्थक शिकले. अनेक कार्यक्रम केले. त्यातून मला नवीन ऊर्जा मिळाली.

दोनदा मॅट्रिक फेल, लग्न मोडले, आता पीजीत टॉपर : प्रियंका श्री

दोन वेळा मॅट्रिकमध्ये नापास झाले तेव्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नंतर कुटुंबीयांनी लग्न लावून दिले. मी माझे शिक्षण पुढे सुरू ठेवले. घटस्फोट झाला, पण शिक्षण सोडले नाही. नंतर पीएचडीही केली. सरकारी शाळेत नोकरी लागली. आता मला मुलांसाठी जगायचे आहे.

संजयकुमार सागर : टोमण्यांमुळे नैराश्य, आता विद्यार्थ्यांना देतात प्रोत्साहन

पोलिओमुळे लग्न झाले नाही, त्यामुळे कुटुंबीय टोमणे मारत होते. चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यातूनही बचावलो. २००२ मध्ये लग्न झाले. पत्नीने आयुष्यच बदलून टाकले. तिच्या प्रोत्साहनामुळेच पुढे वाटचाल केली. आज माझे विद्यार्थी चांगल्या पदांवर आहेत.

आयुक्ता जिशा : तणावामुळे आत्महत्येचा विचार, पण आता लेखिका

मी लहानपणापासून आनंदी होते. लॉकडाऊनमध्ये एकटी राहिल्याने आणि सुशांतसिंहच्या मृत्यूच्या बातमीने निराश झाले. आई-वडिलांनी स्वभावातील बदल पाहून मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घेतला. दोन महिन्यांत नैराश्यातून बाहेर तर पडलेच शिवाय ‘सिंड्रेला इन स्लिपर्स’ हे पुस्तकही लिहिले. मी लेखनाला नैराश्यावर मात करण्याचे माध्यम बनवले. आईच्या सल्ल्यावरून कादंबरीलेखन सुरू केले. आता माझे आयुष्यच बदलले आहे.

बातम्या आणखी आहेत...