आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रुग्णभुर्दंडवाहिका! निश्चित दराच्या चौपट-दहापट भाडे आकारणी; तक्रारीसाठीच्या 75 फोनपैकी 25 अस्तित्वातच नाहीत; सात चक्क राँग नंबर...

औरंगाबाद/नाशिक/सोलापूर/जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तक्रारीसाठी आरटीओकडून 75 फोन नंबर जारी; कॉल केला असता फक्त तीन उचलले

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राज्यात रुग्णवाहिकांचे दर ठरवून दिले असतानाही प्रत्यक्षात दसपटीपेक्षा अधिक रक्कम आकरत राज्यभर रुग्णांची लूट होत असल्याचे चित्र आहे. यावर कारवाई करणारे परिवहन अधिकारी मात्र, “लेखी तक्रारी आलेल्या नाहीत’ या छापील उत्तरांपासून “पावत्या आणा, कारवाई करू’ अशी उत्तरे देत आहेत. अडलेल्या रुग्णाकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसुली करणारा कोणता रुग्णवाहिका चालक “पावती’ देणार, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाइकांना पडला आहे.

तक्रारीसाठी आरटीओकडून ७५ फोन नंबर जारी; कॉल केला असता फक्त तीन उचलले

रुग्णवाहिकांच्या या लुबाडणुकीविरोधात तक्रारी करण्यासाठी राज्य परिवहन आयुक्तालयाने १८ जून रोजी खास परिपत्रक काढून त्यांच्या कार्यालयांमधील ७५ दूरध्वनी क्रमांक जाहीर केले. मात्र,”दिव्य मराठी’ने केलेल्या पडताळणीत यापैकी २५ दूरध्वनी क्रमांक अस्तित्वातच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. तसेच यापैकी ४० फोन उचललेच नाहीत. फक्त नागपूर, वर्धा आणि वाशी हे तीन क्रमांकच उचलले गेले. वाशी कार्यालयातील एक तक्रार वगळता अन्यत्र एकही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...