आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:नवीन कोरोना व्हेरिएंट IHU मुळे वाढली चिंता, ओमायक्रॉनमध्ये 37 तर IHU मध्ये 46 म्युटेशन, जाणून घ्या किती आहे धोकादायक?

अभिषेक पाण्डेयएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत असतानाच एका नवीन स्ट्रेनचा शोध लागल्याने जगाची चिंता वाढली आहे. फ्रान्समध्ये सापडलेल्या या नवीन व्हेरिएंटला IHU असे नाव देण्यात आले आहे. IHU व्हेरिएंटमध्ये 46 म्युटेशन आढळले आहेत. त्यामुळे याबाबतची चिंता वाढली आहे. एकीकडे ओमायक्रॉनमुळे जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि शास्त्रज्ञ त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीत या नवीन स्ट्रेनमुळे कोरोनाची नवी लाट पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन IHU काय आहे? त्याचे पहिले प्रकरण कुठे सापडले? कोरोनाचा नवीन स्ट्रेन IHU किती धोकादायक असू शकतो? ते जाणून घेऊया

IHU ला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट का म्हटले जात आहे?

आयएचयूचे पहिले प्रकरण फ्रान्समध्ये आढळले. हा कोरोना व्हेरिएंट B.1.640 चा उप-वंश आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये फ्रान्समध्ये या व्हेरिएंटचे पहिले प्रकरण आढळल्यानंतर फ्रेंच संशोधकांनी IHU प्रकाराचे उप-वंश B.1.640.2 म्हणून वर्गीकरण केले आहे.

या नवीन स्ट्रेन IHU ची माहिती 29 डिसेंबर 2021 रोजी medRxiv वर पोस्ट केलेल्या अभ्यासातून मिळते. या नवीन स्ट्रेनचा शोध घेतल्याची घोषणा शास्त्रज्ञ डिडिएर राऊल यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल इन्स्टिट्यूट (IHU) च्या मेडिटेरिनी इंफेक्शन इन मार्सिलेच्या संशोधकांनी केली. या व्हेरिएंटला आयएचयू असे टोपणनाव दिले आहे.

IHU चे पहिले प्रकरण कोठे आढळले?

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरच्या मध्यात (2021) फ्रान्समध्ये IHU स्ट्रेनचे पहिले प्रकरण आढळून आले होते आणि आतापर्यंत तेथे 12 प्रकरणे आढळून आली आहेत. म्हणजेच, ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून येण्यापूर्वीच (24 नोव्हेंबर) IHU चे पहिले प्रकरण समोर आले होते.

IHU चे पहिले प्रकरण फ्रान्समधील एका व्यक्तीमध्ये आढळून आले ज्याने लसीकरण केले होते आणि ही व्यक्ती कॅमेरून या आफ्रिकन देशातून परत आली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे दिल्यानंतर चाचणीत ती व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यात IHU किंवा B.1.640.2 व्हेरिएंट असल्याची पुष्टी झाली. IHU चे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर, दक्षिण-पश्चिम फ्रान्सच्या त्याच भौगोलिक क्षेत्रातून आणखी 11 प्रकरणे नोंदवली गेली.

नवीन व्हेरिएंट किती धोकादायक आहे?

IHU मध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन आहेत आणि त्यातील काही म्युटेशन अल्फा सारख्या इतर व्हेरिएंटसारखे असल्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. प्राथमिक अहवालानुसार, IHU च्या अनुवांशिक कोडमध्ये 46 म्युटेशन आणि 37 डिलिशन्स झाले आहेत, त्यापैकी बहुतेक स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत.

असे मानले जाते की, जगभरात हाहाकार माजवत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा जास्त म्युटेशन IHU मध्ये आढळून आले आहेत. ओमायक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 36 हून अधिक म्युटेशन आढळून आले. स्पाइक प्रोटीनद्वारेच हा विषाणू मानवी पेशींना चिकटतो.

तर संशोधकांनी असे म्हटले आहे की संसर्ग आणि लसीपासून संरक्षणाबाबत IHU बद्दल कोणताही अंदाज लावणे खूप घाईचे आहे.

जगात नवीन स्ट्रेनची प्रकरणे कोठे आढळली आहेत?

कोरोनाच्या IHU किंवा B.1.640.2 व्हेरिएंटची प्रकरणे आतापर्यंत फक्त फ्रान्समध्ये आढळून आली आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये दक्षिण पश्चिम फ्रान्समध्ये त्याचे पहिले प्रकरण समोर आल्यापासून आतापर्यंत 12 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

जगातील इतर कोणत्याही देशाने IHU च्या प्रकरणांची पुष्टी केलेली नाही. outbreak.info नुसार, या व्हेरिएंटचे शेवटचे प्रकरण 25 डिसेंबर 2021 रोजी नोंदवण्यात आले होते. तेव्हापासून जागतिक डेटाबेसमध्ये या व्हेरिएंटची आणखी कोणतीही प्रकरणे नोंदलेली नाहीत.

IHU व्हेरिएंट किती वेगाने पसरतो?

आतापर्यंत, केवळ फ्रान्समध्ये IHU (B.1.640.2) ची 12 प्रकरणे आढळून आली आहेत. इतर कोणत्याही देशाने IHU च्या प्रकरणांची पुष्टी केलेली नाही. कोरोनाव्हायरसच्या इतर ज्ञात स्ट्रेनपेक्षा IHU किती शक्तिशाली आहे किंवा किती वेगाने पसरतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पण IHU किंवा त्याचे पूर्ववर्ती कोरोना व्हेरिएंट B.1.640 हे ओमायक्रॉनसारखे संक्रमण करणारे नाही आणि तितक्या वेगाने पसरत नाही असे मानले जाते.

MedRxiv मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, IHU व्हेरिएंटच्या वायरोलॉजिकल, एपिडिमिलॉजिकल आणि क्लिनिकल फिचर्सद्दल कोणताही अंदाज लावणे खूप घाईचे आहे.

नवीन व्हेरिएंटबद्दल WHO काय म्हणाले?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप IHU ला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' किंवा 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' घोषित केलेले नाही. पण नोव्हेंबर 2021 मध्ये, WHO ने घोषणा केली होती की, व्हेरियंट B.1.640 ला 'व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंग' किंवा VUM अंतर्गत ठेवले जाईल. WHO ने अद्याप IHU ला कोणत्याही श्रेणीत ठेवलेले नाही.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ते आयएचयूवर लक्ष ठेवून आहे. WHO चे कोविड घटना व्यवस्थापक आब्दी महमूद यांनी मंगळवारी जिनिव्हा येथे IHU बद्दल सांगितले की या व्हेरिएंटच्या रडारवर आपण आहेत. आब्दी म्हणाले, "त्या विषाणूमध्ये पसरण्याची भरपूर क्षमता होती."

IHU बद्दल अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे

एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगल-डिंग यांनी IHU प्रकाराबाबत एक लांबलचक ट्विटर थ्रेड पोस्ट शेअर केली आहे. डिंग यांनी लिहिले की, कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत राहतात, परंतु याचा अर्थ ते अधिक धोकादायक असतील असा नाही.

मंगळवारी आपल्या ट्विटमध्ये, डिंग म्हणाले, "जी गोष्टी व्हेरिएंटला अधिक धोकादायक बनवते ती म्हणजे त्यात होणा-या म्युटेशनच्या संख्येमुळे गुणाकार करण्याची क्षमता ही आहे."

"जेव्हा हे घडते, ते 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' बनते - उदाहरणार्थ ओमायक्रॉन, जो अधिक संसर्गजन्य आहे आणि रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यास सक्षम आहे. हा नवीन प्रकार (IHU) कोणत्या श्रेणीत येईल हे पाहणे बाकी आहे," असे ते म्हणाले.

IHU हा B.1.640 चा सब-लिनेट आहे, त्या विषयी जाणून घ्या

फ्रेंच संशोधकांनी ज्या IHU व्हेरिएंटचा उल्लेख केला आहे, तो कोरोनाच्या B.1.640 व्हेरिएंटचा सब-लीनेज आहे, त्याला WHO ने नोव्हेंबर 2021 मध्येच 'व्हॅरिएंट ऑफ मॉनिटरिंग' मध्ये ठेवले होता.

नोव्हेंबर 2021 मध्ये फ्रान्समधील 12 लोकांमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट आता फ्रेंच संशोधकांनी B.1.640.2 उप-वंश म्हणून वर्गीकृत केला आहे.

B.1.640 हा करोनाचा नवीन व्हेरिएंट नाही. जीनोम सिक्वेन्सिंग डेटाबेसद्वारे विविध व्हेरिएंटच्या प्रसाराचा मागोवा घेणाऱ्या outbreak.info या वेबसाइटनुसार, कोरोनाचा लीनेज B.1.640 प्रथम 1 जानेवारी 2021 रोजी ओळखला गेला होता. त्यानुसार, जगभरात या लीनेजशी संबंधित संसर्गाची 400 हून अधिक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत.

या अहवालानुसार, जगातील 19 देशांमध्ये कोरोना स्ट्रेन B.1.640 ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी एक प्रकरण भारतातही आढळून आले आहे. जागतिक डेटाबेसमध्ये नोंदवलेल्या भारतातील 89763 जीनोम सीक्वेन्सेसपैकी फक्त एक प्रकरण आढळले होते.

कोरोनाच्या B.1.640 स्ट्रेनची सर्वाधिक प्रकरणे फ्रान्स (287), काँगो (39), जर्मनी (17) आणि युनायटेड किंगडम (16) मध्ये आढळून आली आहेत. त्याचा सर्वाधिक प्रसार काँगोमध्ये आढळून आला, जेथे 454 जीनोम सीक्वेन्सेसपैकी 39 प्रकरणे आढळून आली.

IHU व्हेरिएंट मिळणे ही चिंतेची बाब का आहे?

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संकटाचा सामना करणार्‍या जगासाठी कोरोनाचा नवीन व्हेरिएंट IHU चे आगमन ही आणखी एक चिंताजनक बातमी आहे. ओमायक्रॉनचे पहिले प्रकरण 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आले आणि दीड महिन्यापेक्षा कमी कालावधीत ते जगातील 100 हून अधिक देशांमध्ये पसरले आहे.

ओमायक्रॉनमुळे अमेरिका, युरोप आणि भारतातही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ओमायक्रॉनमुळे भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या लाटेदरम्यान देशातील दैनंदिन प्रकरणांची संख्या 16 लाखांपर्यंत जाऊ शकते, हा आकडा दुसऱ्या लाटेदरम्यान 4 लाख दैनंदिन प्रकरणांपेक्षा 4 पट जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...