आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Notice Of Agneepath Yojana Issued, Registration For Air Force Recruitment From 24th June, At Least 8th Pass Mandatory

कामाची बातमी:अग्निपथ योजनेची अधिसूचना जारी, 24 जूनपासून हवाई दलाच्या भरतीसाठी नोंदणी, कमीत कमी 8वी पास अनिवार्य

अलिशा सिन्हा2 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की सरकार अग्निपथ योजना मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. या योजनेला अनेक ठिकाणी पाठिंबाही दिला जात आहे. आर्मी आणि एअरफोर्समध्ये 75% अग्निवीरांची फक्त 4 वर्षांसाठी भरती केली जाणार आहे.

आजच्या कामाच्या बातमीमध्ये पाहूया अग्निपथमध्ये भर्ती होण्याची प्रक्रिया कशी असणार आहे..

भारतीय सैन्य

प्रश्न: अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात अर्ज करण्याची वयोमर्यादा किती आहे?
उत्तरः
कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 17.5 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असावे.

प्रश्न: केव्हापर्यंत नोंदणी करू शकता?
उत्तरः नोंदणीची प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरू होत आहे. शेवटची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

प्रश्न: कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहे?
उत्तरः या 6 पदांसाठी भरती केली जाईल...

 • अग्निवीर जनरल ड्युटी
 • अग्निवीर तांत्रिक
 • अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/दारूगोळा परीक्षक)
 • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
 • अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास
 • अग्निवीर ट्रेडसमन 8वी पास

उत्तर:

 • अग्निपथ योजनेअंतर्गत, NCC A प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 5 गुण, B प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 10 गुण आणि NCC C प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना सैन्यात भरतीसाठी 15 गुण मिळतील.
 • NCC चे C प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अग्निवीर जनरल ड्युटी आणि लिपिक/स्टोअर कीपर पदांसाठी CEE (सामान्य प्रवेश परीक्षा) मध्येही सूट मिळेल.

प्रश्न: अर्ज कसा करू शकतो?
उत्तरः
या लिंकला भेट देऊन
https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

प्रश्न 4 वर्ष दर महिन्याला किती पगार मिऴेल?
उत्तर:

 • पहिले वर्ष - 30 हजार रुपये महिना
 • दुसरे वर्ष - 33 हजार रुपये महिना
 • तिसरे वर्ष - 36.5 हजार रुपये प्रति महिना
 • चौथे वर्ष - 40 हजार रुपये महिना
 • 75% अग्निवीर 4 वर्षांनी निवृत्त होतील.

भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठी काय करावे लागेल?

रजिस्ट्रेशन करावे लागेल

24 जून ते 05 जुलै पर्यंत.

अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलाच्या भरतीसाठी पात्रता निकष

जनरल ड्युटी (जीडी) सोल्जर या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा-

https://www.careerindianairforce.cdac.in/assets/joining_instructions/AGNIVEER_VAYU.pdf

वय मर्यादा
तुमचे वय किमान 17.5 वर्षे आणि कमाल 21 वर्षे असावे.

आप्लाय करण्यासाठी या लिंकला क्लिक करा.......

https://www.careerindianairforce.cdac.in/

4 वर्ष दर महिन्याला किती पगार मिऴेल?

 • पहिले वर्ष - 30 हजार रुपये महिना
 • दुसरे वर्ष - 33 हजार रुपये महिना
 • तिसरे वर्ष - 36.5 हजार रुपये प्रति महिना
 • चौथे वर्ष - 40 हजार रुपये महिना
बातम्या आणखी आहेत...