आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टझारखंडमध्ये पेटवलेल्या मुलीच्या घरातून ग्राऊंड रिपोर्ट:वडील म्हणाले, शाहरुख धमकी द्यायचा, लव्ह जिहादचा आरोप चुकीचा

लेखक: वैभव पळनीटकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या दुमकामध्ये २३ ऑगस्ट रोजी पहाटे शाहरुख नावाच्या मुलाने घरात झोपलेल्या एका १६ वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. पाच दिवस असह्य वेदना सहन केल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्या रात्री काय झाले होते, हे जाणून घेण्यासाठी अरूंद गल्ल्यांतून मुलीच्या घरी आम्ही पोहोचलो. हे चार खोल्यांचे घर आहे. लोखंडी गेटसमोर आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी दार उघडले. समोर तिची आजी चूल पेटवण्यासाठी काड्या गोळा करत होती. छोट्या अंगणातून आम्ही घरात प्रवेश केला.
ज्या मुलीविषयी आम्ही बोलत आहोत, तिचे नाव आणि ओळख सांगू शकत नाही, कारण केस प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स अगेन्स्ट सेक्श्युअल ऑफेन्स म्हणजेच पॉक्सो कायद्यानुसार नोंदवण्यात आली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांना मोठा धक्का बसला आहे. पण, आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडूनच ऐका पूर्ण प्रकरण...

'10-15 दिवसांपूर्वी शाहरुख हुसैनने कुणीतरी मैत्रीणीकडून माझ्या मुलीचा नंबर घेतला. यानंतर ४-५ वेळा त्याने भेटायला बोलावले. माझ्या मुलीने नकार दिल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी धमकी दिली की, बोलली नाही, तर तुला जीवे मारून टाकेन. मी रात्री १० वाजता घरी पोहोचल्यावर माझ्या मुलीने मला हे सांगितले. आम्ही ठरवले की, सकाळी पाहू काय करायचे ते. पण ती सकाळ होऊच शकली नाही'
दीड वर्षांपूर्वी पत्नीचा मृत्यू, आता मुलीचा
मुलीच्या ६ जणांच्या कुटुंबात तिचे वडील, मोठी बहीण, लहान भाऊ आणि आजी-आजोबा होते. आईचा दीड वर्षांपूर्वी कॅन्सरने मृत्यू झाला होता. वडील नोकरी करतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
आतल्या एका खोलीकडे बोट दाखवत वडील म्हणाले, खिडकीजवळ ठेवलेल्या पलंगावर माझी मुलगी झोपलेली होती. सकाळी ४ वाजता ती ओरडली, पप्पा मला वाचवा. शाहरूखने मला पेटवले. मी पळतच जाऊन दरवाजा उघडला. समोर मुलगी जळत होती. मी चादर घेऊन आग विझवायला लागलो. आग विझवण्यासाठी मुलीनेही स्वतःवर पाणी टाकले.'
13 वर्षांच्या भावाने बहिणीला जळताना बघितले
मुलीच्या १३ वर्षांच्या छोट्या भावानेही ही घटना उघड्या डोळ्यांनी बघितली. तो म्हणाला, माझी ताई इकडून तिकडे पळत होती. ती वेदनेने किंचाळत होती. मी आणि आजी खोलीत झोपलेलो होतो. ताईला पाहून आम्ही जोरजोरात रडत होतो.

पीडित कुटुंबाच्या घरापर्यंत अरूंद गल्ल्या आहेत. आग लावल्यानंतर शाहरूख याच रस्त्याने पळून गेल्याचे सांगितले जाते.
पीडित कुटुंबाच्या घरापर्यंत अरूंद गल्ल्या आहेत. आग लावल्यानंतर शाहरूख याच रस्त्याने पळून गेल्याचे सांगितले जाते.

रुग्णालयात केवळ मलमावरच काढला पूर्ण दिवस
आग विझवल्यानंतर वडील मुलीला घेऊन दुमकातील सदर रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयाची स्थिती चांगली नाही. तिथे जखमांवर मलम लावून सलाईन लावण्यात आले. यातच एक दिवस गेला. जास्त ताप आल्यास इथले डॉक्टर राँचीला रेफर करतात. तिथे मुलीवर काय उपचार झाले असते असे तिचे वडील म्हणाले.
सकाळी ५ ते रात्री साडेनऊपर्यंत मुलगी रुग्णालयात विव्हळत राहिली. हे म्हणायला वैद्यकीय महाविद्यालय आहे. पण इथल्या डॉक्टर्सनी रेफर करायला १२ तास लावले. आम्ही गाडीतून राँचीसाठी निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे पोहोचलो. माझी मुलगी संपूर्ण रस्त्याने त्रास सहन करत राहिली.
आम्ही तिला रिम्समध्ये घेऊन गेलो. झारखंडमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात बर्न वॉर्डमध्ये एसीही नव्हता. मुलीला थोडा आराम मिळावा म्हणून मी बाजारातून टेबल फॅन घेऊन आलो. ती ५ दिवस त्रास सहन करत राहिली. २८ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी ती म्हणाली होती, 'जशी मी मेले, त्यालाही अशीच शिक्षा व्हायला हवी.'

मुलीचे वय १६ वर्षे, सुरूवातीच्या FIR मध्ये लिहिण्यात आले १९ वर्षे
२३ ऑगस्टला घटनेच्या दिवशीच पोलिसांनी FIR नोंदवून घेतला होता. यातही हलगर्जीपणा झाला. FIR मध्ये मुलीचे वय १९ वर्षे लिहिण्यात आले आहे. नंतर तपासातून निष्पन्न झाले की, मुलीचे वय १६ वर्षे आहे. ती १२ वीत शिकत होती. घटनेच्या ८ दिवसांनंतर पॉक्सो कायद्यातील कलम १२ जोडण्यात आले.
दुमकाचे एसपी अंबर लकडांनी सांगितले की, मुलीने जबाबात दंडाधिकाऱ्यांसमोर तिचे वय १९ वर्षे सांगितले होते. तिच्या वडिलांनी यावर सही केली होती. म्हणूनच पोलिस मुलगी सज्ञान असल्याचे म्हणत होते. तपासातून निष्पन्न झाले की दहावीच्या गुणपत्रकातील जन्मतारखेनुसार तिचे वय १६ वर्षे आहे.
पॉक्सो कायद्याचे कलम लागल्यानंतर आम्ही एसपी अंबर लकडांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही.

BJP कडून लव्ह जिहादचा आरोप
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रघुबर दास यांनी ही लव्ह जिहादची घटना असल्याचे म्हटले आहे. ही सामान्य घटना नाही. एका समुदायाचे लोक लव्ह जिहादच्या माध्यमातून डेमोग्राफी बदलू इच्छित आहेत.
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी म्हणाले की, मुलीचे वय जास्त सांगून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी एसडीओपी नूर मुस्तफांवर आरोप लावला. नंतर मुस्तफांना तपासातून हटवण्यात आले.
कुटुंबीय म्हणाले - लव्ह जिहादचा आरोप चुकीचा
मुलीच्या कुटुंबीयांना लव्ह जिहादच्या आरोपांविषयी आम्ही विचारले. मुलीच्या वडिलांचे उत्तर होते, ही चुकीची गोष्ट आहे. मुसलमान किंवा हिंदुविषयी यात काहीही नाही. मुलगा म्हणत होता माझ्याशी बोल. मुलीने नकार दिला तर त्याने आग लावून मारून टाकले. प्रकरण इतकेच आहे. लव्ह जिहादचा आरोप चुकीचा आहे.

बातम्या आणखी आहेत...