आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकिस्तान सीमेवर नवा रोमांच:राजस्थानमधून केवळ 150 मीटर लांबीवरुन पाहा पाकिस्तान, शत्रूवर लक्ष कसे ठेवावे, हे देखील समजणार

लेखक: अक्षय वाजपेयी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैसलमेरपासून 140 किलो मीटर अंतरावर असलेल्या ‘बॉर्डर पॉईंट 609’ वर एक नवीन पर्यटन स्थळ तयार करण्यात आले आहे. इथून पाकिस्तानचे अंतर फक्त 150 मीटर आहे. उन्हाळा संपताच हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. केवळ 50 रुपये प्रवेश शुल्क भरून पर्यटकांना भारत-पाक सीमेवर फेरफटका मारता येईल, तसेच पाकिस्तानमधील दृश्यही पाहता येईल.

सीमेजवळच एक टॉवर बांधण्यात आले आहे, जिथे पर्यटकांना जाण्याची परवानगी असेल. दैनिक 'दिव्य मराठी' नेटवकर्कच्या रिपोर्टरने येथे बीएसएफ जवानांसोबत एक दिवस घालवला. वाचा हा खास रिपोर्ट.

याच स्टेडियममध्ये दररोज रिट्रीट सोहळा होणार आहे. याचे काम पूर्ण झाले आहे.
याच स्टेडियममध्ये दररोज रिट्रीट सोहळा होणार आहे. याचे काम पूर्ण झाले आहे.

वाचा बॉर्डरवरुन भास्कर रिपोर्टरचा लाईव्ह रिपोर्ट...

बीएसएफ कमांडंट कुलवंत राय शर्मा आणि डेप्युटी कमांडंट अनिल शर्मा यांच्यासोबत मी 5 वाजता तनोट माता मंदिरात पोहोचलो. हे तेच मंदिर आहे जिथे 1971 च्या भारत-पाक युद्धात चमत्कार दिसला होता. पाकिस्तानी सैन्याने हजारो बॉम्ब डागले मात्र, त्यातला एकही बॉम्ब मंदिरावर पडला नव्हता.

या चमत्कारामुळे बीएसएफ जवानांमध्ये तनोट माते बद्दल प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे. पाकिस्तानने टाकलेले बॉम्ब आजही दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पाहण्यासाठी मंदिराच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

या मंदिरातील पूजा आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी बीएसएफच्या हाती आहे. मंदिराला लागूनच बीएसएफची सीमा चौकी आहे. येथून भारत-पाकिस्तान सीमा 18 किमी अंतरावर आहे.

आम्ही साधारण 6 च्या सुमारास सीमेवर पोहोचलो. सीमेवर पोहोचताच एखाद्या प्रेक्षणीय स्थळी आल्यासारखे वाटले. सीमेच्या काही अंतरावर एक मोठे प्रवेशद्वार दिसले. आत प्रवेश करताच खुले मैदान (स्टेडियम) दिसत होते. आता या स्टेडियममध्ये दररोज रिट्रीट सोहळा होणार आहे. म्हणजेच संध्याकाळी राष्ट्रध्वज उतरवण्याचा सोळळा भव्य पद्धतीने केला जाणार आहे.

कॅफेटेरिया, ऑफिसर लाउंज, पार्किंग स्पेस आणि ऑब्झर्व्हेशन पॉइंटचेही काम पूर्ण झाले आहेत. कमांडंट शर्मा यांनी सांगितले की, पर्यटक ऑब्झर्व्हेशन पॉईंटवर म्हणजेच ओपीवर चढू शकतील आणि त्यांना पाकिस्तानी सीमा पाहता येईल. त्यांना पाकिस्तानचे सैनिकही दिसतील.

पर्यटक या ऑब्झर्व्हेशन पॉईंटवर म्हणजेच ओपीवर चढू शकतील आणि त्यांना पाकिस्तानी सीमा पाहता येईल.
पर्यटक या ऑब्झर्व्हेशन पॉईंटवर म्हणजेच ओपीवर चढू शकतील आणि त्यांना पाकिस्तानी सीमा पाहता येईल.

सीमेवर कधीच रायफल चालणार नाही...

आम्ही या ठिकाणांची पाहणी करत होतो, त्याचवेळी बीएसएफचे जवान सीमेवर गस्त घालत होते. यामध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश होता. बीएसएफ जवान 6 ते 6 तासांच्या दोन शिफ्टमध्ये ड्युटी करतात.

दिवसा त्यांच्याकडे रायफल, पाण्याची बाटली तसेच दुर्बीण आणि रात्री मोठा टॉर्च असतो. मात्र, सीमेपलीकडून होणारी प्रत्येक हालचाल टिपता यावी, यासाठी सीमेवरील तारांजवळ मोठे फोकसही लावण्यात आले आहेत.

बीएसएफने सीमेवरील तारांच्या मधोमध अशा अनेक गोष्टी ठेवल्या आहेत की त्यांच्या थोड्या हालचालीवर ते सावध होतात. कमांडंट शर्मा म्हणतात, या सीमेवर रायफलचा वापर कधीच होत नाही. समजा झालाच तर समजायचे युद्ध सुरू झाले आहे.

दररोज ४ हजार पर्यटकांना संधी

मी कमांडंटला विचारले की तुम्हाला बॉर्डर टुरिझम का सुरू करायचे आहे? त्यावर ते म्हणाले, याचे दोन उद्देश आहेत. पहिला, आम्हाला नागरिकांचा कनेक्ट हवा आहे. लोकांना भेटायचे आहे, त्यांना बीएसएफची भूमिका सांगायची आहे आणि सीमेबाबत योग्य माहिती द्यायची आहे.

दुसरा हेतू अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. पर्यटकांच्या आगमनाने या भागातील अर्थकारण बदलेल. आमचा अंदाज आहे की येथे दररोज सुमारे 4 हजार पर्यटक येतील. एका व्यक्तीला 50 रुपये आकारले जातील. आता तुम्ही अंदाज लावू शकता, स्थानिक बाजारात किती पैसे येईल. वाहनांची आणि हॉटेल्सची बुकिंगही होईल. ज्याचा स्थानिक रहिवाशांना फायदा होईल.

रात्री आठच्या सुमारास सीमेवरून परत आलो. त्यानंतर बीएसएफ जवानांच्या हाताने शिजवलेले अन्न खाल्ले. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता उठलो, कारण तनोट माता मंदिरात सकाळी ६ वाजता आरती सुरू होते. कोणी येवो वा न येवो, पूजा ठरलेल्या वेळेलाच होते.

आरती करून आम्ही पुन्हा सीमेवर पोहोचलो. त्यानंतर सकाळी ६ वाजता आलेले सैनिक ड्युटी करताना आढळले. काही उंटावर तर काही पायी चालत होते. प्रत्येकजण हातात रायफल घेऊन फिरत होता.

आम्ही पोहोचताच काही पर्यटकही आले. सीमा पाहून ते रोमांचित झाले. बीएसएफ अधिकाऱ्यांनी त्यांना सीमेबाबत सांगितले. सैनिक सीमेचे रक्षण कसे करतात हेही त्यांनी सांगितले.

आतापर्यंत २ कोटी रुपये खर्च

पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य सरकार आणि बीएसएफने संयुक्तपणे हा खर्च केला आहे. तनोट माता मंदिरापर्यंत जाण्यासाठी वाहने उपलब्ध आहेत, मात्र तनोट माता मंदिरापासून सीमेवर जाण्यासाठी सार्वजनिक वाहन अद्याप उपलब्ध नाही.

येथे सार्वजनिक वाहने उपलब्ध करून देण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. मात्र, खासगी वाहन किंवा बस बुक करून सीमेवर सहज पोहोचता येते.

सीमेजवळ असलेल्या तनोट माता मंदिरात सकाळी ६ वाजता आरती सुरू होते. कोणी येवो वा न येवो, पूजा ठरलेल्या वेळेलाच होते.
सीमेजवळ असलेल्या तनोट माता मंदिरात सकाळी ६ वाजता आरती सुरू होते. कोणी येवो वा न येवो, पूजा ठरलेल्या वेळेलाच होते.

लोंगेवाला, तनोट माता मंदिर, आणि भारत-पाक सीमा

बॉर्डर चित्रपट पाहिला असेल तर लोंगेवालाचे नाव आठवेल. 1971 मध्ये पाकिस्तानने 2,000 सैनिकांसह लोंगेवाला पोस्टद्वारे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंजाब रेजिमेंटच्या 23 व्या बटालियनच्या ए कंपनीच्या केवळ 120 सैनिकांनी पाकिस्तानचा पराभव केला.

तेव्हापासून लोंगेवाला पोस्ट प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. यापासून काही अंतरावर तनोट मातेचे मंदिर आहे. त्यामुळे लोंगेवाला, तनोट माता मंदिर आणि भारत-पाक सीमेला जोडून पर्यटन सर्किट तयार करण्यात आले आहे. कमांडंट शर्मा यांनी हा प्रस्ताव सर्वप्रथम तयार केला होता.

अटारी-वाघासारखा बीटिंग रिट्रीट सोहळा नाही

बीएसएफच्या उच्च सूत्रांनी दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अटारी-वाघा बॉर्डरसारखा बीटिंग रिट्रीट सोहळा होणार नाही. या संदर्भात पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झालेली नाही. या ठिकाणी फक्त रिट्रीट सोहळा असेल, ज्यामध्ये संध्याकाळी राष्ट्रध्वज खाली उतरवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...