आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूमध्ये बुधवारी 14 लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे MI-17V-5 हेलिकॉप्टर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत हेलिकॉप्टरमध्ये होते. सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच निलगिरीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणाऱ्या MI-17V5 हेलिकॉप्टरची खासियत काय आहे? भारताने ते कधी विकत घेतले आणि ते जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर का आहे?
सर्वात पहिले Mi-17V-5 हेलिकॉप्टरबद्दल जाणून घेऊया...
Mi-17V-5 हे दुहेरी इंजिन असलेले मल्टीपर्पज हेलिकॉप्टर रशियाने निर्मित केले आहे. हे रशियन कंपनी मिल मॉस्को हेलिकॉप्टर प्लांट, कझान हेलिकॉप्टर प्लांट आणि उलान-उडे एव्हिएशन प्लांट यांनी तयार केले आहे. Mi-17V-5 हेलिकॉप्टर हे Mi-8 हेलिकॉप्टरची अपग्रेडेड व्हर्जन आहे.
Mi-17V-5 हेलिकॉप्टर किती सक्षम?
Mi-17V-5 ही Mi-8 हे जास्त उंचीवर आणि अत्यंत प्रतिकूल हवामानातही चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने अपग्रेड केलेले व्हर्जन आहे. Mi-17V-5 विशेषत: उंचीवर आणि उष्ण हवामानात चांगल्या प्रकारे ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
Mi-17V-5 चा वापर VIP ते सैन्यदलासाठी केला जातो
Mi-17V-5 हे जगातील सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टर आहे. हे सैन्य आणि शस्त्रे वाहतूक, फायर सपोर्ट, गार्ड पेट्रोल आणि शोध आणि बचाव (SAR) मोहिमांमध्ये देखील तैनात केले जाऊ शकते. तसेच Mi-17V-5 हे कार्गो वाहतुकीसाठी डिझाइन केले आहे. याचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते व्हीआयपी आणि लष्कराच्या ऑपरेशनपर्यंत केला जातो.
जगातील सुमारे 60 देश 12 हजारांहून अधिक MI-17 हेलिकॉप्टर वापरतात.
जाणून घ्या Mi-17 हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
भारताने Mi-17V-5 ची ऑर्डर कधी दिली?
संरक्षण मंत्रालयाने रशियासोबत 80 MI हेलिकॉप्टरसाठी 1.3 अब्ज किमतीचा करार केला. भारतीय हवाई दलाला Mi हेलिकॉप्टरची डिलिव्हरी 2011 मध्ये सुरू झाली आणि 2013 मध्ये 36 Mi सीरीज हेलिकॉप्टर प्राप्त झाली. मात्र, संरक्षण मंत्रालयाने 2012-2013 दरम्यान, 71 Mi-17V-5 ची ऑर्डर दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.