आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ganesha Visarjan In The Country, The Mercury In California At A Record High, See 10 Interesting Pictures Of The Week.

फोटोज ऑफ द वीक:गणरायाला निरोप, कॅलिफोर्नियात उष्णतेमुळे झाड पेटले, पाहा आठवड्यातील 10 रंजक फोटो...

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

1) भारत: अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन, आता पुढच्या वर्षी बाप्पा येणार

अनंत चतुर्दशीनिमित्त देशातील अनेक शहरांमध्ये भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मुंबईचा गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. फोटो तिथला आहे. यावर्षी​ कोविडच्या दोन वर्षानंतर, कोणत्याही निर्बंधाशिवाय, मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते.

2) अमेरिका : कॅलिफोर्नियामध्ये भीषण उष्णतेमुळे झाड पेटले

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भीषण उष्णतेने थैमान घातले आहे. येथे सप्टेंबरचे पहिले आठ दिवस आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण दिवस ठरले आहेत. मंगळवारी येथे पारा 47 अंशांवर पोहोचला. उष्णतेमुळे येथे जंगलाला आग लागण्याच्या अनेक घटना घडत आहेत.

3) चीन: सिचुआनमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, थरारक बचावकार्य

हा फोटो चीनच्या सिचुआन प्रांतातील आहे. तिथे शुक्रवारी ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपानंतर अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले. फोटोत भूकंपानंतर भूस्खलनात अडकलेल्या लोकांना वाचवताना कर्मचारी दिसत आहेत.

4) मलेशिया : जेव्हा 'चंद्र' जमिनीवर उतरला

सध्या मलेशियातील क्वालालंपूर येथे मिड ऑटम फेअर आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान, चायना टाउनमधील हेरिटेज साइटवर एक मोठा फूल मून ठेवण्यात आला आहे. ही जत्रा चिनी दिनदर्शिकेनुसार प्रत्येक आठव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी भरते.

5) स्वित्झर्लंड: पौराणिक कथांनी प्रेरित 'ध्यान कवटी'

स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये कलाकार निकी डी सेंट फाले यांचे शिल्प प्रदर्शनात आहे. त्याची उंची 10 फूट आणि रुंदी 7 फूट आहे. या शिल्पाला स्कल मेडिटेशन असे नाव देण्यात आले आहे. हे काचेचे आणि रंगीत दगडांनी बनलेले आहे. पौराणिक कथांनी हे प्रेरित आहे.

6) तुर्की: 60 टन वाळूपासून तयार केलेली अंतराळवीरांची कलाकृती

तुर्कीतील अंटाल्या शहरात आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सव सुरू आहे. या वर्षी महोत्सवाची थीम स्पेस अॅडव्हेंचर आहे. येथे कलाकारांनी वाळूतून 25 अंतराळवीरांच्या कलाकृती तयार केल्या आहेत. यामध्ये सोव्हिएत अंतराळवीर युरी गागारिन (डावीकडे) यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. कलाकृती तयार करण्यासाठी 60 टन वाळू वापरण्यात आली आहे.

7) ब्रिटन: निसर्ग संवर्धनासाठी रडणारा घोडा ठरला विजेता

हा फोटो ब्रिटिश कलाकार मिस्टीचा आहे. ज्याला चॅनल 4 तर्फे सर्वोत्कृष्ट शिल्पकलेचा पुरस्कार मिळाला आहे. 'आय व्हीप फॉर नेचर' या थीमवरील त्यांच्या कलाकृतीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ही कलाकृतीही लवकरच लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे.

8) चीन : 25 हजार एलईडी बल्बपासून बनवत आहेत कृत्रिम चंद्र

हा फोटो चीनच्या जिआंग्सू प्रांतातील आहे. तिथे एका मॉलमध्ये 'सुपर आर्टिफिशियल मून' बनवला जात आहे. हा चंद्र बनवण्यासाठी मॉलमधील कर्मचाऱ्यांनी सुमारे 25 हजार एलईडी दिवे वापरले आहेत. या कृत्रिम चंद्राचा व्यास सुमारे 6 मीटर आहे.

9) ऑस्ट्रेलिया: ऑपेरा हाऊसकडून इंग्लंडच्या महाराणींना श्रद्धांजली

हा फोटो ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाऊसचा आहे. तिथे ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ-II यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली म्हणून ऑपेरा हाऊसमध्ये राणीचे एक विशाल पोर्ट्रेट प्रक्षेपित केले गेले.

10) ड्रोन फोटो ऑफ द इअर

हा फोटो नॉर्वे आणि उत्तर ध्रुवाच्या दरम्यान असलेल्या स्वालबार्ड बेटाचा आहे. चित्रात एक लहान ध्रुवीय अस्वल बर्फावर चालताना दिसत आहे. हा फोटो ड्रोनद्वारे घेतला असून २०२२ मध्ये ड्रोन छायाचित्रांमध्ये सर्वोत्कृष्ट फोटोचा पुरस्कार याला मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...