आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:ऐक्याचा संदेश; बालहट्टानंतर नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या घरी गणेशोत्सव

शीतलकुमार घोंगडे | कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री गणरायाची आरती करताना अब्रार
  • कळंबला ऐक्याचा संदेश, मुस्लिम तरुणाकडून गणेशमूर्ती भेट

नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या तीन वर्षांच्या मुलाने हट्ट करून घरात गणरायाची स्थापना केली आहे. तर शहरातील अमर चाऊस या युवकाने गरजूंना मोफत गणेश मूर्ती दिल्या अाहेत. या माध्यमातून दोघांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. सध्याच्या धार्मिक धुव्रीकरणाच्या काळात दोघांनीही आदर्श निर्माण केला आहे.

गणरायाच्या पूजनासाठी शिक्षण, व्यवसाय आदी कारणांमुळे विखुरलेले कुटुंब एकत्र येते व ‘निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा’ अशी प्रार्थना करीत आपल्या मनोदयांना प्रत्यक्ष रूप देण्यासाठी सुरुवात करतात. अशाच काही कारणांमुळे गणेशोत्सवाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व आगळेवेगळे आणि अनमोल आहे. थोडे मागे वळून पाहिले तर गणेशोत्सव सुरू करण्यामागे लोकमान्य टिळक यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीला आता फलरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते. या सोबत आता गणेश उत्सवाच्या काळात सर्व जातीचे लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत. मागील वर्षी कळंब तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, तत्कालीन नायब तहसीलदार राजीव बाभळे, रविराज जाधव यांनी महसूल कॉलनी येथे गणेशमूर्तीची स्थापना केली होती. यावेळी यांच्या घरातील चिमुकल्यांनी याचा आनंद घेतला होता. या वर्षी गणेशोत्सव अनेक ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या तीन वर्षांच्या अब्रार या चिमुकल्याने घरी गणपती मूर्ती स्थापना करण्याचा हट्ट धरला. कामाच्या व्यापात असल्यामुळे जमादार यांनी दुर्लक्ष केले. मात्र, अब्रारचा हट्ट कमी होत नसल्यामुळे जमादार यांच्या पत्नीने बाजारात जाऊन गणेशमूर्ती आणून घरात गणेशाची स्थापना केली. तेव्हाच या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या चिमुकल्याने नकळत सर्वांनाच सामाजिक एकाेप्याचा संदेश दिला आहे.

चाऊस यांनी दिल्या मूर्ती

कोरोनामुळे लॉकडाऊन झाले होते. यामुळे हातावर पोट असल्याची खूप अडचण निर्माण झाली. काही लोकांना गणेश स्थापना करण्यासाठी मूर्ती खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे शहरातील युवक अमर चाऊस याने जातीच्या पलीकडे जाऊन गणेशमूर्ती प्रत्येकाच्या घरी स्थापन व्हावी, या हेतूने तीस कुटुंबांना स्वखर्चातून गणेशमूर्ती दिल्या. त्या भक्तांनी मनोभावे वृत्तीने घरात गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्ती देऊन चाऊस यांनीही सामाजिक एकात्मता जोपासली आहे.