आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टगणेशोत्सव: स्वस्तात सजावटीच्या टिप्स:घरीच बनवा मंदिर, मखर आणि सजावट; या ट्रिक्सने वाचेल खर्च

लेखक: अलिशा सिन्हा3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागताची सर्व तयारी झालीच असेल. मात्र बाप्पांसाठी डेकोरेशन कसे करावे या विचारात असणाऱ्यांसाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आम्ही सांगणार आहोत.
डेकोरेशनविषयी घरच्यांची बोलणी ऐकणाऱ्यांनी तर या सर्व टिप्स वाचायलाच हव्या...
चला तर जाणून घेऊया, कमी पैशांत आणि कमी वेळेत गणपतीसाठी डेकोरेशन कसे करावे?
सुरूवात करूया, पूजा रुम आणि एंट्री गेटपासून. खाली दिलेले ग्राफिक्स वाचा...

गणपती विराजमान होण्यापूर्वी मंदिराचे बॅकग्राऊंड डेकोरेट करण्याची पद्धत...
फुलांच्या सहाय्याने...

 • झेंडूची फुले शुभ मानली जातात, यामुळे घरात सकारात्मकता येते. यापासून तुम्ही डेकोरेशन करू शकतात.
 • झेंडूची फुले जास्त प्रमाणात नसतील, तर ती गुलाब किंवा दुसऱ्या फुलांच्या सोबत लावूनही डेकोरेशन केले जाऊ शकते.
 • फुलांचा वापर थीमसहही केला जाऊ शकतो. जसे की, वर्तुळाच्या आकारात, मंदिराच्या आकारात किंवा त्रिकोणी आकारात फुल लावा.

ताजे फुल नसल्यास...

 • ज्या लोकांना क्राफ्टींगची आवड असते त्यांच्याकडे origami papers असतातच, ते या पेपर्सच्या मदतीने आर्टिफिशिअल फुल बनवू शकतात.

Origami Paper च्या सहाय्याने क्राफ्टींग येत नसल्यास...

 • तुम्हाला सहजपणे क्राफ्टींगच्या दुकानात मनते मिळतील. अनेकांच्या घरी आधीच मनके असतात.
 • धाग्याच्या मदतीने मनक्याची माळ बनवून घ्या. बॅकग्राऊंडपासून ते फ्रंटपर्यंत या माळा लटकावून द्या. यामुळे चांगला लूक येईल.

मनका विकत घ्यायचा खर्च जास्त वाटल्यास...

 • साडी किंवा रंगीत ओढणीने बॅकग्राऊंड कव्हर करा.
 • याच्या वर झालर किंवा फेरी लाईट लावा. यामुळे बॅकग्राऊंडमध्ये चांगला प्रकाश राहील आणि मंदिर प्रकाशमान होईल.

गणपतीसाठी वेगळे मंदिर बनवायचे असेल आणि खर्चही जास्त करायचा नसेल, तर खालील ग्राफिक्स वाचा...

पूर्ण मंदिर केवळ ५० ते ६० रुपयांत तयार होऊ शकते.
एंट्री गेट, पूजा रूम, फ्लोअर आणि मंदिराचे बॅकग्राऊंड तयार झाल्यानंतर अखेरीस तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार. आता गणपतीच्या फ्रंटचे डेकोरेशन करा...

 • रांगोळी काढली असेल तर त्याच्या चारही बाजूंनी पणती किंवा मेणबत्ती लावा.
 • रांगोळी काढली नसेल तर फुलांनी फ्रंट साईड सजवा.
 • जवळ झाडांच्या कुंड्या ठेवा, यामुळे सकारात्मकता राहील.

खर्च

 • फुगे - घरी नसतील तर दुकानात ६० रुपयांत पाकिट मिळू शकते.
 • origami papers - कमीत कमी १०० ते १५० रुपयांत मिळेल
 • कार्डबोर्ड नसेल तर किराणा किंवा इतर दुकानांत सहज मिळेल. काही दुकानदार पूजेसाठी मोफतही देतील.

जाता-जाता...
गणेश चतुर्थीच्या आधी ड्रॉईंग रूमही थोडी डेकोरेट करून घ्या. यामुळे उत्सवाचा फील येईल. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहूण्यांनाही सकारात्मक वाटेल -

 • दाराच्या दोन्ही बाजू फुलांनी डेकोरेट करा.
 • सेंटर टेबलवर काचेच्या वाटीत फुल ठेवा.
 • जे सामान असेल, त्याची सेटींग थोडी बदला.
 • चालण्यासाठी जागा राहील अशा पद्धतीने ड्रॉईंग रूमचे इंटेरिअर करा.
बातम्या आणखी आहेत...