आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Garaba In Gujarat : People Are Roaming In The Terrace, Balcony, People Living Abroad Are More Interested In Virtual Mode Because The Family Is Connecting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:गुजरातमध्ये यंदा घरोघरी छतावर-बाल्कनीतच गरबा; व्हर्च्युअल मोडमुळे विदेशातील लोकही जोडले गेले

ध्रुवी शहा/मनीषा भल्ला | अहमदाबाद/मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आता व्हर्च्युअल स्क्रीनवर गरबा खेळला जात आहे.
  • गुजरातमध्ये गरब्याचा व्यवसाय 10 हजार कोटी रुपयांचा

गुजरातमध्ये लोक यंदा ‘व्हर्च्युअल गरब्या’चा आनंद घेत आहेत. उत्साहही कमी नाही. फरक ए‌वढाच की मोठ्या पार्टी प्लॉटऐवजी लोक घरात, छतावर एवढेच नव्हे तर बाल्कनीतही गरब्याच्या सुरांवर थिरकत आहेत. यंदा मुंबईची गरबा क्वीन फाल्गुनी पाठक, प्रीती-पिंकी आणि दिवांग पटेल हे मोठे कलावंतही स्टेजऐवजी व्हर्च्युअल स्क्रीनवर दिसत आहेत. व्हर्च्युअल गरब्यासाठी गायकांचे प्री-रेकॉर्डेड आणि लाइव्ह शो होत आहेत. विदेशातही मोठ्या कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे तेथे स्थायिक झालेले भारतीयही आपल्या मायभूमीशी जोडले गेले आहेत. मोठ्या कार्यक्रमांमुळे कुटुंबासोबत गरबा खेळण्याची परंपरा कमी झाली होती. ती यंदा पुन्हा सुरू झाल्याने कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीही खुश आहेत. डीजे सौरिन यांनी सांगितले की, आयोजनाच्या पहिल्याच दिवशी २४ तासांत ९००० लोक जोडले गेले. अनेकांनी आमच्यासोबत रिव्ह्यूही शेअर केला आहे.

गुजरातमध्ये गरब्याचा व्यवसाय १० हजार कोटी रुपयांचा

गुजरातमध्येच गरब्याचा व्यवसाय सुमारे १० हजार कोटी रुपयांचा आहे. जवळपास २०० इव्हेंट कंपन्या आयोजक आहेत. त्यांच्याशी डेकोरेशन, ढोल, केटरिंग, प्रसाद, प्रिंटिंग या क्षेत्रातील आणि कलावंत असे लाखो लोक जोडलेले आहेत. गरबा स्पेशल डीजे निहारच्या मते, नवरात्रीशी संबंधित कलाकारांचीच संख्या सुमारे पाच लाखांवर आहे.