आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी तेल कंपन्यांनी 'एलपीजी' सिलिंडरच्या दरांत मोठा बदल करत दरवाढ केली आहे. घरगुती वापराचा 14 किलोचे सिलिंडर 50 रुपयांनी तर व्यावसायिक वापराचा 19 किलोचा सिलिंडर 350 रुपयांनी महाग झाला आहे. देशातील काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले. अचानकच झालेल्या या मोठ्या वाढीमुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पण केवळ आरोप-प्रत्यारोप करून सामान्य माणसाच्या खिशाला बसणारी झळ कमी होणार नाही.
जवळपास आठ महिन्यांनी झालेल्या या दर वाढीमुळे सर्वसामान्य माणसाला धक्का बसला आहे. 6 जुलै 2022 नंतर तेल कंपन्यांनी पहिल्यांदाच किंमती बदलल्या आहेत. उज्ज्वला योजनेत समावेश नसल्याने बहुतांश गॅस वापरकर्त्यांना गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्यात आले आहे.
होळीच्या आधीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका
गेल्या वर्षी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत चार वेळा वाढ करण्यात आली. आता पुन्हा एकदा झालेल्या या दर वाढीमुळे एलपीजी सिलिंडरचे दर 1100 रुपयांच्या घरात गेले आहेत. तर व्यावसायिक सिलिंडरचे दर 2150 रुपयांवर गेले आहेत. होळीच्या आधीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. गॅस दर वाढीमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना तसेच छोट्या व्यवसायिकांना झळ बसत आहे. शहरातील छोट्या व्यावसायिकांना या महागाईमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने छोटे व्यापारी आणि गृहिणींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तेव्हा व्यावसायिकांनी या दरवाढीविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
या विषयाशी संबंधित आणखी बातम्या वाचा.
महागाई:एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपये महाग; आता एक सिलिंडर 1,103 रुपयांमध्ये, व्यावसायिक सिलिंडर 350 रु. महाग
महागाईमुळे त्रस्त लोकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. बुधवारपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ५० रुपयांनी वाढली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. ईशान्येकडील तीन राज्यांत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच किमती वाढवल्याचा विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. पूर्ण बातमी वाचा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.