आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनिर्माणातली स्त्रीशक्ती:मेट्रोच्या कामातून गवसला भरारीचा मार्ग!

श्रद्धा सरवदे - नेवसकर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सृजनाची अर्थात निर्माणाची शक्ती हे स्त्रीचं एक महत्त्वाचं रूप. अपत्याला जन्म देणं या रूपात ती प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच. मात्र, त्याहीपुढे जाऊन इंजिनिअर, आर्किटेक्चर अशा फील्डवरच्या कामांमधून राष्ट्रनिर्माणात योगदान देणाऱ्या महिलांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढलीय. प्रत्यक्ष फील्डवरच्या कामामधली आव्हानं अशा क्षेत्रातल्या महिला सहजरीत्या पेलताना दिसत आहेत. असेच आव्हान पुणे मेट्रोच्या कामात पेलले आहे ते श्रद्धा यांनी. करिअरमध्ये स्त्री-पुरुष असण्यापेक्षा कष्टाची तयारी, जिद्द, नवीन गाेष्टी शिकण्याची इच्छा, शिस्त अादी गुणांनाच महत्त्व असते, हे सांगणारा श्रद्धा यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत...

बदलत्या काळात समाजातील सर्वच क्षेत्रांत महिला अग्रेसर राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे स्वत:ची भूमिका पेलताना दिसतात. ‘चूल अाणि मूल’ या चाैकटीत अडकलेली महिलांची प्रतिमा बदलण्याकरिता त्यांनी प्रगतीची नवनवीन दालने काबीज करत सक्षमपणे अापल्या कामाचा ठसा उमटवला अाहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत महिलांची घाेडदाैड सुरू असतानाच सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात अापण काम करावे हे ध्येय मनाशी बाळगत मी पुणे मेट्राेच्या कामात सहभागी झाले.

मूळची मी सांगली जिल्ह्यातील मिरजची राहणारी...वडील संजय सरवदे सांगली न्यायालयात स्टेनाेग्राफरचे काम करतात, तर अाई माधुरी सरवदे विटा न्यायालयात असिस्टंट सुपरिटेंडंट.. सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयातून डिप्लाेमा इंडस्ट्रियल इलेक्ट्राॅनिक्सची पदवी संपादन केल्यानंतर पुण्यातील नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीअाेईपी) दुसऱ्या वर्षात बीटेक-इलेक्ट्राॅनिक्स टेलिकम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला. सहसा सीअाेईपीत प्रवेश मिळवायचा तर त्याकरिता माेठी कसरत पार करावी लागते, परंतु डिप्लाेमाच्या अंतिम वर्षात चांगले मार्क मिळाल्याने मला सहजरीत्या प्रवेश मिळू शकला. बीटेकचे तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण हाेत असतानाच सन २०१७ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले. त्या वेळी पुणे मेट्राेची सुरुवात पुण्यात हाेणार हाेती अाणि त्याकरिता मेट्राेने पदभरती सुरू केली हाेती. अापल्याला अायटीतील खासगी नाेकरी न करता शासकीय नाेकरीत जाण्याची खूणगाठ मनाशी मी बांधली असल्याने मेट्राेचे मुलाखतीस समर्थपणे सामाेरे गेले अाणि निवडली ही गेले. नागपूर मेट्राेच्या कार्यालयातून जाॅयनिंग लेटर हातात पडताच अायुष्यातील पहिल्या नाेकरीचा अानंद गगनात मावत नव्हता. माझ्यासह सीअाेईपीमधील १२ जण मेट्राेचे कामात निवडले गेले, मात्र त्यात केवळ चारच मुलींचा समावेश हाेता.

मेट्राेत सेक्शन इंजिनिअर म्हणून मी रुजू झाले. मेट्राेशी संबंधित सर्व टेलिकम्युनिकेशन कामाची देखरेख ठेवणे, त्याबाबतची पूर्तता करून देणे अादी कामे करण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडली. मात्र, मेट्राेच्या वतीने सुरुवातीलाच तीन महिने हैदराबाद येथे नेमके टेलिकम्युनिकेशनचे काम कसे करावयाचे याचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात अाल्याने मनावरील अाेझे काहीसे कमी झाले हाेते. पुणे मेट्राेची एकूण चार मार्गांवरील ३० मेट्राे रेल्वे स्टेशन असून त्या ठिकाणचे डिस्प्ले, टेट्रा रिडिअाे सिस्टिम, दाेन स्टेशनमधील फायबर नेटवर्क, अनाउन्समेंट व्यवस्था, सीसीटीव्ही, अॅक्सेस कंट्राेल, मास्टर क्लाॅक याबाबतचे टेलिकाॅम सुविधांवर देखरेख ठेवण्याचे काम सुरू केले. एखाद्या नामांकित कंपनीच्या ठेकेदारास संबंधित कामे टेंडर प्रक्रियेद्वारे दिली जात असतात अाणि त्याची मागणीप्रमाणे तसेच मेट्राेच्या नियमाप्रमाणे पूर्तता करण्यात येते अाहे का याबाबतची तपासणी, दुरुस्ती करण्याचे काम अामच्यावर साेपवले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात मेट्राे स्टेशन्स तयार नसल्याने डिटेल रिपाेर्ठ प्राेजेक्ट (डीपीअार), टेंडर डाॅक्युमेंट, मेट्राेच्या कामाची माहिती, दुरुस्ती व्यवस्था, कामाची पद्धत याबाबत सखाेल अभ्यास करून त्यास समजावून घेण्यात येत हाेते. त्याचसाेबत मेट्राेच्या कार्यालयातील टेलिकम्युनिकेशनशी संबंधित गाेष्टींची खरेदी, संगणक, लॅपटाॅप, प्रिंटर, टीव्ही, टेलिफाेन, इंटरनेट, वायफाय यांची खरेदी व त्यांची याेग्य जागी व्यवस्था निर्माण करणे ही कामे करण्यात अाली. इलेक्ट्राॅनिक, सिव्हिल, ट्रान्झॅक्शन विभागाशी समन्वय ठेवून मेट्राेचे काम कशा प्रकारे वेगाने पुढे नेता येईल याद्वारे ही अनेक छाेट्या-माेठ्या गाेष्टी शिकण्यास मिळू लागल्या.

सध्या माझ्याकडे अॉटाेमेटिक फेअर क्लेक्शन (एएफसी)चे काम असून मेट्राेची सुरुवात झाल्यानंतर मेट्राेचे प्रवासी तिकिटासाठी क्यूअार काेड, नॅशनल काॅमन माेबेलिटी कार्ड (एनसीएमसी), नियर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) असे तीन पर्याय देण्यात येणार अाहेत. याबाबतचे कामाची पूर्तता करणे, ग्राहकांचे तिकिटासंदर्भातील तक्रारींचे अाॅनलाइन निवारण करणे अादी गाेष्टींबाबत याअंतर्गत काम करण्यात येते. प्रत्येक मेट्राे स्टेशनला शहरातील बसची सुविधा पुरवण्यात येणार असून मेट्राे स्टेशन परिसरात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार अाहे याबाबतचे ताळमेळ बसवणारी यंत्रणा विकसित करण्यात येत अाहे. मेट्राेच्या कामात पेपर वर्क कमी करण्याचा उद्देश असल्याने टेलिकम्युनिकेशनवर भर देण्यात येत असल्याने कामाची व्याप्ती माेठ्या प्रमाणात अाहे. मेट्राेच्या कामात सुरुवातीपासून काम करत असल्याने वेगवेगळे बारकावे शिकण्यास मिळत असून वेळेच्या मर्यादेत काम कशा प्रकारे पूर्ण करावे हे अनुभवास मिळत अाहे. काेराेनाच्या काळात परिस्थिती प्रतिकूल असल्याने दीड ते दाेन महिने ‘वर्क फ्राॅम हाेम’ केले, परंतु माझे काम स्टेशनच्या फील्डवरील असल्याने त्यानंतर सातत्याने कामावर लक्ष केंद्रित करत अाहे. मेट्राेच्या कामात तरुण-तरुणी असा काेणता भेद केला जात नसून समान पद्धतीची वागणूक सर्वांना देण्यात येत असल्याचे साडेतीन वर्षांच्या कामाच्या अनुभवातून समजले. कष्ट करण्याची तयारी, मनातील जिद्द, नवीन गाेष्टी शिकण्याची इच्छा, शिस्त अादी गुण जवळ बाळगल्यास केवळ मुलगी म्हणून अापण मागे न पडता जीवनात यशस्वीरीत्या वाटचाल करू शकताे हे पहिल्या नाेकरीतून शिकावयास मिळाले.

शब्दांकन - मंगेश फल्ले

बातम्या आणखी आहेत...