आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्चमहिलेच्या नेतृत्वातील ब्रिटन 31 वा देश:31 पैकी 26 देशांत जेंडर गॅप 50% पेक्षा जास्त, महिला सक्षमीकरणात राजकारणाचा अडसर

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

लिझ ट्रस पंतप्रधानपदी विराजमान होताच सरकारच्या प्रमुखपदी महिला असणारा ब्रिटन 31 वा देश ठरला आहे. लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. यापूर्वी सरकारच्या प्रमुख म्हणून 3 महिलांची निवड करणारा देश केवळ आईसलँड राहिला आहे. तरिही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जेंडर गॅप इंडेक्स 2022 मध्ये महिलांच्या राजकारणातील समावेशाच्या बाबतीत आईसलँड टॉपवर आहे तर ब्रिटन 24 व्या क्रमांकावर आहे. ब्रिटनसह ज्या 31 देशांमध्ये पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीपदावर महिला आहेत, त्यापैकी 25 जेंडर गॅप इन्डेक्समध्ये आहेत. विशेष म्हणजे यापैकी केवळ 5 देशच राजकीय जेंडर गॅपच्या बाबतीत इन्डेक्सच्या टॉप-10 मध्ये आहेत. उर्वरित सर्व देशांत राजकीय जेंडर गॅप 50% पेक्षा जास्त आहे. या 31 देशांमध्ये भारतही आहे. मात्र एकूण जेंडर गॅप इन्डेक्समध्ये जिथे आपण 146 देशांत 135 व्या क्रमांकावर आहोत, तिथे राजकीय जेंडर गॅप इन्डेक्समध्ये 48 वे स्थान आहे. आपल्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 17.5% आहे. जागतिक स्तरावरही या बाबतीत चांगली स्थिती नाही. संसदेत महिलांची भागीदारीची जागतिक सरासरी 22.9% आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते या दराने जगातील राजकीय जेंडर गॅप संपुष्टात आणण्यास 155 वर्षे लागतील. जेंडर गॅप इन्डेक्स रिपोर्टच्या पडताळणीतून दिसते की, राजकीय निकषांवर देशांचे प्रदर्शनच त्यांना एकूण इन्डेक्समध्ये पुढे ठेवते. राजकीय इन्डेक्सचे टॉप-4 देशच ओव्हरऑल इन्डेक्समध्ये टॉप-4 आहेत. या जेंडर गॅप इन्डेक्सचे उर्वरित तीन निकष, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक भागीदारीत उर्वरित देश केवळ चांगली प्रगती करत नसून त्यांच्या सुधारणेचा वेगही चांगला आहे. त्यामुळे एकूण इन्डेक्समध्ये टॉप आईसलँड तिन्ही निकषांत टॉपवर नाही. तरिही राजकीय निकषांवर आईसलँडचे प्रदर्शन सर्वात चांगले आहे. त्यांनी राजकारणातील जेंडर गॅप 87% संपुष्टात आणला आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या फिनलँडपेक्षा त्यांचा स्कोअर 28% जास्त आहे.

ओव्हरऑल रँकिंगमध्ये जे देश पुढे, तीन निकषांमध्ये त्यापैकी एकही टॉपवर नाही

 • जेंडर गॅप पाहण्यासाठी 4 निकषांपैकी 3 असे आहेत ज्यात टॉप देश नवे आहेत
 • ओव्हरऑल रँकिंगमध्ये जे देश टॉप-10 आहेत, ते केवळ पॉलिटिकल एम्पॉवरमेन्टमध्ये पुढे आहेत.
 • यावरून स्पष्ट होते की, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक हिस्सेदारीत जेंडर गॅप घटला आहे, पण राजकीय सहभागात जेंडर गॅप जास्त आहे.
 • आरोग्य व शिक्षणाच्या बाबतीत परिस्थिती सुधारली आहे. पण आर्थिक भागीदारीत महिला पिछाडीवर आहे, मात्र सुधारणा तेजीने होत आहे.
 • महिलांना राजकीय अधिकारांच्या बाबतीत लैंगिक समानता 2021 आणि 2022 मध्ये 22% इतकीच राहिली आहे. म्हणजे यात कसलिही सुधारणा झाली नाही.
 • हा असा निकष आहे, जिथे देशांचे प्रदर्शन आणि स्कोअरमधील अंतर खूप जास्त आहे. या निकषांत सर्वात खाली असलेल्या वानुआटुचा स्कोअर 0 आहे, तर टॉप आईसलँडचा स्कोअर 87% आहे.
 • या निकषांत टॉपवर असलेल्या आईसलँड आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या फिनलँडमधील स्कोअरमधील अंतर 28% आहे. 146 देशांपैकी केवळ 39% देश असे आहेत जिथे महिलांचे राजकीय अधिकार जागतिक सरासरी 22% पेक्षा जास्त आहेत.

महिलांची राजकीय समानता आईसलँडमध्ये ब्रिटनपेक्षा दुप्पट, भारतापेक्षा चौपट

 • राजकीय जेंडर गॅप संपुष्टात आणण्यात आईसलँडचा स्कोअर उर्वरित देशांपेक्षा जास्त आहे.
 • तिथे राजकीय समानता 87%, तर ब्रिटनमध्ये 42.8% आणि भारतात 26.7% आहे.
 • यामुळे राजकीय समानता मोजण्याचे निकष पाहिल्यावर समजतात.
 • आईसलँडच्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 90% पेक्षा जास्त आहे. मंत्रीपदावर महिलांची हिस्सेदारीही 66% पेक्षाही जास्त आहे.
 • तर ब्रिटनमध्ये संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 52% आणि भारतात 17% आहे.
 • मंत्रिपदावर हिस्सेदारीतही ब्रिटन आईसलँडच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच 31% आणि भारतात केवळ 10% आहे.
 • सोबतच आईसलँड गेल्या 50 वर्षांपैकी 16 वर्षे महिला सरकारची प्रमुख राहिली आहे.
 • ब्रिटनमध्ये लिझ ट्रस यांच्यापूर्वी दोन महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे राहिल्या आहेत. मात्र दोन्हींचा कार्यकाळ 15 वर्षही राहिलेला नाही.
 • भारतात केवळ इंदिरा गांधी महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. तरिही राष्ट्रपती पदावर प्रतिभा पाटील आणि आता द्रौपदी मूर्मूंच्या निवडीमुळे या बाबतीत थोडी चांगली स्थिती आहे.

आईसलँड तीन निकषांवर मागे, मात्र नंबर-1 स्कोअरचे अंतर जास्त नाही
ओव्हरऑल रँकिंगमध्ये आईसलँड पहिल्या स्थानी आहे. पण प्रत्येक निकषावर वेगवेगळे बघितले तर आरोग्याच्या बाबतीत बेलीज, शिक्षणात अर्जेंटिना आणि आर्थिक भागीदारीत लाओस क्रमांक एकवर आहे.
आरोग्यात बेलीजसह 28 देश नंबर-1

 • आरोग्याच्या निकषांवर नंबर-1 बेलीजने या क्षेत्रात जेंडर गॅप 98% संपुष्टात आणला आहे. पण असे करणारा तो एकमेव देश नाही. इन्डेक्समध्ये 28 देशांनी जेंडर गॅप 98% संपुष्टात आणला आहे.
 • या तुलनेत आईसलँडने 96.4% जेंडर गॅप आरोग्याच्या क्षेत्रात संपुष्टात आणला आहे. आरोग्याच्या बाबतीतील असमानता इथे थोडी वेगळी आहे.
 • खरंतर, आईसलँडमध्ये महिलांचे सरासरी वयोमान पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळेच इथे आरोग्याचा जेंडर गॅप पुरुषांसाठी आहे.

शिक्षणात अर्जेंटिनासह 29 देशांनी 100% संपुष्टात आणला जेंडर गॅप

 • महिलांना शिक्षण देण्याच्या बाबतीत अर्जेंटिना अग्रस्थानी आहे. पण हा एकमेव देश नाही. एकूण 29 देश असे आहेत जिथे जेंडर गॅप पूर्ण 100% संपुष्टात आला आहे.
 • या निकषात आईसलँड 68 व्या क्रमांकावर आहे. पण त्यानेही 99.3% जेंडर गॅप संपुष्टात आणला आहे. म्हणजे स्कोअरमध्ये ते पिछाडीवर नाही
 • आईसलँडच्या या निकषात पिछाडीवरील सर्वात प्रमुख कारण आहे, प्राथमिक शिक्षणात मुलींचे कमी एन्रॉलमेंट.

महिलांच्या आर्थिक भागीदारीत लाओस सर्वात पुढे

 • लाओसने आर्थिक भागीदारीच्या बाबतीत 88.3% जेंडर गॅप संपुष्टात आणला आहे. मात्र या इंडेक्समध्ये देशांचे प्रदर्शन आणि स्कोअरमध्ये अंतर कमी आहे.
 • आईसलँड या निकषांवर 11 व्या स्थानावर आहे. त्यांनी या क्षेत्रात जेंडर गॅप 80.3% संपुष्टात आणला आहे.
 • या निकषातील टॉप-10 देशांमध्ये स्वीडन सोडून उर्वरित सर्व देश असे आहेत, ज्यांना विकसनशील श्रेणीत ठेवले जाते. यांच्या प्रदर्शनात सुधारणेच दर जास्त आहे. म्हणूनच ते इंडेक्समध्ये पुढे आहेत.
बातम्या आणखी आहेत...