आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या देशात शुद्ध तुपाशिवाय जेवणाचा विचारच केला जाऊ शकत नाही. घरी पाहुणे आल्यास जेवणावर शुद्ध तुपाची धार धरलीच जाते. देवाच्या नैवेद्यातही तूप वापरले जाते. प्रसूतीनंतर शुद्ध तुपातले लाडू खायला दिले जातात. अशक्तपणा आल्यावरही डाळीत तूप टाकून पिण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र काही लोक असेही आहेत, जे तुपाचे नाव ऐकले की घाबरतात. एक वाक्य तर तुम्ही हमखास ऐकले असेल. मी तर तूप खाण्याचा विचारच करू शकत नाही. तुपाच्या वासानेही माझे वजन वाढते.
आज आपण याच तुपावर बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खरेच तूप खाल्ल्याने वजन वाढते का? सोबतच तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की कोणत्या लोकांनी तूप खायला नको.
सर्वात आधी जाणून घेऊया की तूप का खायला हवे?
आयुर्वेदात तुपाविषयी काय सांगितले आहे
आयुर्वेदानुसार, आहारात रोज तुपाचा समावेश आरोग्यासाठी लाभकारक आहे. तुपामुळे जेवणाची चवच वाढत नाही, तर यामुळे शरीरातील पेशींना पोषणही मिळते.
स्टीडफास्ट न्युट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांच्यानुसार तूप अनेक प्रकारे हेल्दी आहे. याने हाडे मजबूत होतात. मानसिक आरोग्यासाठी हे चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते.
प्रश्न - लोकांना सामान्यपणे वाटते की तुपात केवळ फॅट आहे. याव्यतिरिक्तही तूप खाल्ल्याने काय फायदे होतात?
उत्तर - तुपात गूड कोलेस्ट्रॉल असते. हे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे. यात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के सुद्धा असते. यामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते. तूप रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे शरीराची पचनसंस्था सुधारून बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करते.
प्रश्न - तूप रोज खाल्ल्याने वजन वाढत नाही. यात किती तथ्य आहे?
उत्तर - तूप खाल्ल्याने वजन वाढतेही आणि घटतेही. तुम्ही तूप कसे खात आहात यावर हे अवलंबून आहे. तुपात हेल्दी फॅट असते. रोज 2-3 चमचे तूप खाल्ल्याने वजन कमी होण्यात मदत होते. तुपात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि ओमेगा 6 असते. यामुळे वजन कमी होण्यात मदह होते. तूप शरीरातील फॅट सेल्स गोळा करून त्या जाळते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अशा प्रकारे हे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी ऊर्जेत बदलते. यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.
तुपात आवश्यक अमिनो अॅसिड असतात. ते पेशींचा आकार छोटा करतात. त्यामुळेच जर तुमच्या शरीरात लवकर चरबी गोळा होत असेल तर तूपाचे सेवन फायदेशीर ठरते. याशिवाय तुपात ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात.
प्रश्न - एका दिवसात किती तूप खाऊ शकता?
उत्तर - आयसीएमआरच्या संशोधनानुसार सामान्य काम करणारा पुरुष 25 ग्रॅम तूप खाऊ शकतो. जे पुरुष कठोर मेहनत करतात ते 40 ग्रॅम तूप खाऊ शकतात. असेच सामान्य काम करणारी महिला 20 ग्रॅम तर मेहनत करणारी महिला 30 ग्रॅम तूप खाऊ शकते. स्तनपान देणाऱ्या महिलाही 30 ग्रॅम तूप खाऊ शकतात.
प्रश्न - तूप कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये?
उत्तर - तुम्ही जो आहार घेत आहात तो तुमच्या शरीरानुसार असायला हवा. गरजेचे नाही की ज्या गोष्टी हेल्दी आहेत त्या तुमच्या शरीरासाठीही हेल्दी असतील. तसेच योग्य पद्धतीने कुणीही तूपाचे सेवन करू शकते. मात्र काही आजार असलेल्यांनी तूप खाऊ नये. कुणी तूप खाऊ नये हे जाणून घेण्यासाठी खालील क्रिएटिव्ह वाचा...
प्रश्न - गायीचे तूप चांगले आहे की म्हशीचे?
उत्तर - दोन्हीही चांगले असतात. मात्र गायीचे तूप आरोग्यासाठी अधिक चांगले आहे. गायीच्या तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि के, कॅल्शियम, मिनरल्स, पोटॅशियम आणि फॉस्फोरससह अँटिऑक्सिडन्टही असतात. याशिवाय गायीच्या तुपात ओमेगा 9 फॅटी अॅसिडही असते.
गाय आणि म्हशीच्या तुपाचे वेगवेगळे फायदे आहेत
गायीच्या तुपाचे फायदे
म्हशीच्या तुपाचे फायदे
प्रश्न - काही लोक म्हणतात की तूप गरम खाल्ले पाहिजे, असे का?
उत्तर - हे अगदी बरोबर आहे. तूप नेहमी गरम करूनच खाल्ले पाहिजे. थंड तूप पचनक्रिया सुधारू शकत नाही. यामुळे पचनाची समस्या होईल. म्हणून तूप नेहमी गरम पोळी, पराठा, रोटी, डोसा, इडली, सांबर आणि डाळीसोबतच घेतले पाहिजे.
जाता-जाता
तुपातील पोषक घटक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.