आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गोव्यातून ग्राउंड रिपोर्ट:गाेवा पर्यटकांसाठी खुले जरूर, पण रेल्वे-बस बंद; राेज आता 80 ऐवजी 5 विमाने, 4 हजार हॉटेलपैकी केवळ 160 सुरू

गोवा- पणजीहून मनीषा भल्ला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो कॅन्डोलिम बीचचे असून तेथील पर्यटक पावसाळ्याचा आनंद लुटत आहेत. (फोटो- ताराचंद गवारिया)
  • पर्यटकांची प्रतीक्षा करणाऱ्या गोव्यात बार-रेस्तराँ, बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे; कोरोना चाचणी अनिवार्य, निगेटिव्ह आल्यास प्रवेशबंदी

अंजुना कँटाेलिम, कलंगूट, बागा इत्यादी ४८ किनारपट्या माणसांनी नेहमी गजबजलेल्या असत. परंतु आता येथे नुसतेच सागरी लाटांचे आवाज एेेकायला मिळतात. खरे तर गाेवा पर्यटकांसाठी खुला आहे. परंतु बार, रेस्तराँ, कॅसिनाे आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. चार महिन्यांनंतर लाॅकडाऊननंतर आता लाेकांचा संयम संपला आहे. पर्यटन असाेसिएशनचे उपाध्यक्ष जॅक अजित सुखिजा म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७० टक्के वाटा पर्यटनाचा आहे. ४० टक्के लाेकसंख्येची उपजीविका त्यावरच चालते. येथे ४ हजार हाॅटेलपैकी १६० हाॅटेलला व्यवसायासाठी परवानगी देण्यात आली आहे. दाेन जुलैपासून आतापर्यंत हाॅटेल क्षमतेच्या ७ टक्के भरल्या आहेत. पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ४० टक्केच जीएसटीचे संकलन झाले. सुखिजा म्हणाले, पर्यटक नसल्यामुळे रेस्तराँ सुरू हाेऊ शकले नाहीत. स्थानिक लाेक तेथे जात नाहीत. काेराेनासह पर्यटनाला प्राेत्साहन देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्रॅव्हल अँड टूरिझम असाेसिएशन आॅफ गाेवाचे (टीटीएजी) अध्यक्ष नीलेश शहा यांनी सांगितले.

गाेवा पूर्णपणे सुरक्षित आहे, असा विश्वास नागरिकांना देणे गरजेचे आहे. लाॅकडाऊनपूर्वी विविध शहरांतून दरराेज ८० विमाने येत हाेती. आता केवळ ५ विमाने येतात. २०१८ मध्ये ८८ लाख पर्यटकांनी गाेव्याला भेट दिली हाेती. सुमारे २० लाख लाेकसंख्येच्या गाेव्यात दरराेज २ हजार काेविड चाचण्या हाेत आहेत. राज्यात २ हजार ९५१ रुग्ण आढळले असून १८ जण मृत्युमुखी पडले आहेत.

आयटी कंपन्या हाेताहेत गाेव्यात शिफ्ट, १५० व्हिला घेतले भाड्याने

गाेव्यात काेराेना महामारीने आणखी एक बिझनेस माॅडेल तयार केले आहे. हायर विलाचे व्यवस्थापक सिधांशू पाटील म्हणाले, देशात जवळपास सर्व आयटी कंपन्या वर्क फ्राॅम हाेम करत आहेत. मुंबई, कर्नाटक, हैदराबादच्या माेठ्या कंपन्यांत काम करणारे नाेकरीमध्ये या शहरांत राहत हाेते. तेथे ते भाड्याने राहायचे. परंतु आता ते गाेव्यात घर भाड्याने घेऊ लागले आहेत. आतापर्यंत १५० व्हिला भाड्याने घेण्यात आले. त्यांचे मासिक भाडे सुमारे दीड ते दाेन लाख रुपये आहे. आयटी व्यावसायिक, कंपन्यांचे सीईआे, एमडी आपल्या छाेट्या स्टाफसह विला भाड्याने घेत आहेत.

गोवा सुरू होईल तेव्हा वेळही नाही मिळणार

गोव्याच्या स्थानिक लोकांना मात्र पर्यटन क्षेत्रात मोठा प्रतिसाद मिळेल, अशी आशा वाटते. सिंगापूर, बाली, मलेशिया, बँकाक व युरोपात झालेल्या लोक गोव्यालाच येतील. कारण त्यांच्यासाठी गोवा सुरक्षित व स्वस्त असेल. वाहतूक संस्थेचे मालक दामोदर म्हणाले,गोवा सुरू झाल्यानंतर वेळ मिळणार नाही. राज्यातील अर्थव्यवस्थेला ७० टक्के महसूल पर्यटनाद्वारे मिळतो. ४० टक्के लोकसंख्येचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून असतो.