आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांत धडाधड नोकरकपात:काही महिन्यांतच 80 हजार कर्मचारी काढले; टेक जायंटमध्ये का होतेय कपात?

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंनी 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे. जगातील मोठ्या टेक कंपन्यांतील कर्मचारी कपातीत गुगलचे प्रकरण ताजे आहे. गेल्या काही दिवसांत मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, फेसबुकसारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.

आज दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, मोठ्या टेक कंपन्या सातत्याने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून का काढत आहेत? भारतातील लोकांवर याचा किती परिणाम होत आहे?

ट्विटरने 50 टक्के कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढले

नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वात आधी मोठी टेक कंपनी ट्विटरने एकदाच 3800 कर्मचाऱ्यांना काढण्याची घोषणा केली. ही आकडेवारी ट्विटरमध्ये काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के होती. यानंतर काही दिवसांतच एलॉन मस्क यांनी 4500 कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे नोटिस न देताच अचानक या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते. यांना नोकरीवरून काढल्याचे तेव्हा कळाले जेव्हा त्यांच्या डिटेल्सनी त्यांचे अकाऊंट लॉगईन झाले नाही. यादरम्यान मस्क यांनी भारतीय टीममध्ये काम करणाऱ्या 230 पैकी 180 कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढले.

फेसबुकने 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले

नोव्हेंबर 2022 मध्ये फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने एकदाच 11 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना ले ऑफची माहिती देताना लिहिले की, मोठ्या टेक कंपन्या अडचणीच्या काळातून जात आहे. कंपन्यांसाठी नफा कमावणे कठीण होत आहे. अशात कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय कंपनीची मजबूरी आहे.

अमेझॉनने 18 हजार कर्मचाऱ्यांना काढले तर अॅप्पलने भरती थांबवली

ट्विटर आणि फेसबूकशिवाय अमेझॉन तिसरी मोठी कंपनी आहे, जिने 18 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. यात 1000 भारतीय होते. या श्रृंखलेत स्नॅपचॅट आणि मायक्रोसॉफ्टचेही नाव आहे. तर अॅप्पलने नव्या लोकांची भरती थांबवली आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे होते की लेऑफ म्हणजेच कपातीचा परिणाम गूगलसारख्या कंपनीवर कमी होईल. मात्र डिजिटल जाहिरातींतून होणारी कमाई कमी झाल्याने गूगलही कपात करणाऱ्या कंपन्यांत सहभागी झाली आहे. 2022 मध्ये एकूण 50 मोठ्या टेक कंपन्यांनी जगभरात 1 लाख लोकांना नोकरीवरून काढले आहे.

आता समजून घेऊया की या मोठ्या टेक कंपन्या असे का करत आहेत? यामागील 4 मोठी कारणे...

1. कोव्हिडदरम्यान मास हायरिंग, मात्र आता मागणी नाही

टेक कंपन्यांनी कोव्हिड महामारीदरम्यान जवळपास प्रत्येक गोष्ट ऑनलाईन उपलब्ध करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली. यादरम्यान ऑनलाईन क्लास, मीटिंग्ससारख्या व्यासपीठांपासून ऑनलाईन शॉपिंग आणि जेवणाची डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनी आपला व्यवसाय वाढवला.

या कंपन्यांनी मोठ्या संख्येने लोकांना नोकरी देत बाजाराची मागणी पूर्ण केली. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या 13 टक्के म्हणजेच 11 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचे कारण कोव्हिड महामारीदरम्यानची मास हायरिंग असल्याचे सांगितले होते.

झुकरबर्ग यांनी पोस्ट शेअर करत लिहिले होते की महामारीदरम्यान टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात वाढती मागणी पाहता आम्ही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या दिल्या. आम्हाला वाटत होते की ही मागणी पुढेही राहील, मात्र असे झाले नाही. मेटाच्या डिजिटल जाहिराती कमी झाल्याने सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. कोव्हिड महामारीचा परिणाम कमी झाल्यावर मोठ्या टेक कंपन्यांचा नफा कमी होऊ लागला.

टेक कंपन्यांच्या कमाईचा मोठा भाग डिजिटल जाहिरातींतून येतो. महामारीनंतर मार्केटची डिमांड कमी झाल्याचा परिणाम जाहिरातींवरही झाला आहे. एका वर्षात फेसबूक मेटाची वार्षिक कमाई 756 कोटींहून 351 कोटींवर आली आहे.

2. स्टार्टअप्सना गुंतवणुकदार मिळत नाहीये

वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या संस्थांकडून सातत्याने जागतिक मंदीचा इशारा मिळत असल्याने स्टार्टअप्सचे इकोसिस्टिम अडखळत आहे. स्टार्टअप्स सामान्यपणे गुंतवणुकदारांकडून मिळणाऱ्या रिस्क कॅपिटलच्या भरवश्यावर आपला व्यवसाय पुढे नेतात.

ट्रक्सन, ग्लोबल स्टार्टअप डेटा प्लॅटफॉर्मनुसार वर्ष 2022 मध्ये भारतात 266 टेक स्टार्टअप कंपन्या फंडिंग न मिळाल्याने बंद झाल्या.

तर स्टॅटिस्टिक ब्रेन रिसर्च इन्स्टिट्युटच्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये 90 टक्के स्टार्टअप्स जे फेल झाले, ते आयटी सेक्टरशी निगडित होते. याचे कारण आहे जागतिक मंदीच्या दरम्यान गुंतवणुकदार आणि निधी न मिळणे.

3. कंपन्यांवर खर्च कमी करण्यासाठी दबाव टाकत आहेत गुंतवणुकदार

एखादी स्टार्टअप किंवा कंपनीला निधी मिळाल्यानंतर होणाऱ्या फायद्यातून गुंतवणुकदारांना परतावा द्यावा लागतो. बाजारात मागणी कमी झाल्याने कंपन्यांची कमाई घटली आहे. अशात परतावा देण्यासाठी कंपन्या खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. याचा परिणाम आहे की लोकांना नोकरीवरून काढले जात आहे.

गूगलचे गुंतवणुकदार टीसीआय फंड मॅनेजमेंटचे संचालक क्रिस होन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत गूगलला आपले प्रॉफिट मार्जिनचे ध्येय फिक्स करणे, कंपनीचा वाटा वाढवण्याचा आणि नुकसान कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी गूगलमध्ये गरजेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याचा आणि या कर्मचाऱ्यांवर गरजेपेक्षा जास्त खर्चाचा उल्लेख केला होता.

4. जागतिक मंदी

कपातीचे सर्वात मोठे कारण जागतिक मंदी मानले जात आहे. मार्केटमध्ये संथपणा आला आहे. महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्यात खूप चढ-उतार आले. चीन, ब्रिटन, अमेरिका, भारत आणि जपानसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांवर याचा परिणाम बघायाला मिळाला आहे.

गरजेचे सामान जसे धान्य, औषधे, क्रूड ऑईलची पुरवठा साखळी बिघडली आणि मागणी वाढत गेली. यामुळे महागाई वाढली. गेल्या वर्षी भारतात महागाई दर सतत 9 महिने आरबीआयच्या निश्चित 6 टक्के मर्यादेच्या वर राहिला. 1982 नंतर जून 2020 मध्ये अमेरिकेत महागाई दर 9.1 टक्क्यांच्या सर्वाधिक पातळीवर होता.

सोप्या शब्दांत समजून घेतले तर महागाई दर निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असण्याचा अर्थ आहे की लोकांना 10 रुपयांच्या वस्तूसाठी 50 रुपये मोजावे लागतात. यामुळे पैशांची किंमत कमी होते. अशात लोकांची खर्च करण्याची क्षमताही कमी होते.

हे नियंत्रणात आणण्यासाठी सेंट्रल बँक रेपो रेट वाढवते. रेपो रेट म्हणजेच ज्या व्याजदराने आयबीआय दुसऱ्या बँकांना कर्ज देते. रेपो रेट जास्त झाल्याने कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवण्यात अडचणी येतात. अशात नेट प्रॉफिट जास्त व्हावे यासाठी कंपन्या आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार कापते किंवा त्यांना नोकरीवरून काढतात.

बातम्या आणखी आहेत...