आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Elections In Five State Governors In 4 Of The 5 States Associated With The RSS BJP Will Change The Equation If A Rift Arises

जर राज्यपालांच्या कोर्टात गेला चेंडू:निवडणुकीच्या 5 पैकी 4 राज्यांतील राज्यपाल RSS-BJPशी संबंधित, तिढा निर्माण झाल्यास बदलतील सत्तेची समीकरणे

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

10 मार्चला निकाल लागल्यानंतर, निवडणुकीच्या राज्यांमध्ये तिढा अडकला, तर प्रत्येकाला राज्यपाल आठवतील. ज्यांची सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका असेल. अशा परिस्थितीत, निवडणूक सुरू असलेल्या पाच राज्यांच्या राज्यपालांच्या प्रोफाइलवर एक नजर टाकूया. तिढा अडकला तर राज्यपाल काय निर्णय घेऊ शकतात याचा हा अंदाज...

सर्वप्रथम पाहू, राज्यपालांची विशेष भूमिका काय असते?

विधानसभा निवडणुकीनंतर, राज्यपाल एखाद्या राजकीय पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात, त्यामुळे निवडणुकीत समान स्पर्धा असताना राज्यपाल खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत राज्यपाल दोन मुख्य कारणांवर निमंत्रण देतात. प्रथम, सर्वात मोठ्या पक्षाला.

दुसरे, राज्यपाल एखाद्या युतीलाही निमंत्रित करू शकतात, त्यांच्या विवेकबुद्धीनुसार हे ठरवू शकतात की, सरकार स्थापन करण्यासाठी युती किंवा आघाडीकडे पूर्ण पाठिंबा आहे. त्यासाठी आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रांसोबतच त्यांची राजभवनात परेडही होऊ शकते. यामुळेच एखाद्या राज्यात बरोबरीची टक्कर असताना राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरते.

1. उत्तर प्रदेश : राज्यपाल आनंदीबेन पटेल, गुजरातेत भाजप सरकारच्या मुख्यमंत्री होत्या

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडल्यानंतर आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत.
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडल्यानंतर आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत.

ही 1987ची गोष्ट आहे. अहमदाबादमधील मोहिनीबा कन्या विद्यालयाच्या प्रिन्सिपल आपल्या विद्यार्थिनींसोबत सहलीला गेल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या दोन विद्यार्थिनी नर्मदा नदीत पडल्या. त्यांना बुडताना पाहून प्रिन्सिपलनी मागचा-पुढचा विचार न करता नदीत उडी मारून दोघींनाही बाहेर काढले. या प्रिन्सिपल होत्या आनंदीबेन पटेल.

आनंदीबेन यांचे पती मफतभाई पटेल हे त्या काळात भाजपचे मोठे नेते होते. नरेंद्र मोदी आणि शंकरसिंह वाघेला यांनीही आनंदीबेन यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले. त्याच वर्षी आनंदीबेन भाजपमध्ये दाखल झाल्या आणि गुजरात प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा झाल्या.

यानंतर त्या 1994 मध्ये गुजरातमधून राज्यसभा खासदार, 1998 मध्ये आमदार आणि शिक्षणमंत्री झाल्या. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतरही आनंदीबेन मंत्री राहिल्या. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. आनंदीबेन यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द भाजपमध्ये आणि विशेषतः मोदींच्या गोटात गेली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होण्यापूर्वी त्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या राज्यपाल होत्या.

2. पंजाब : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित 1999 पासून भाजपशी संबंधित

1978 पासून राजकारणात सक्रिय असलेले बनवारी लाल पुरोहित (उजवीकडे) सध्या पंजाबचे राज्यपाल आहेत. ते दोन दशकांपासून BJP शी संबंधित आहेत.
1978 पासून राजकारणात सक्रिय असलेले बनवारी लाल पुरोहित (उजवीकडे) सध्या पंजाबचे राज्यपाल आहेत. ते दोन दशकांपासून BJP शी संबंधित आहेत.

ही 2018 ची गोष्ट आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित पत्रकार परिषद घेत होते. परिषदेत एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. पुरोहित यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता महिला पत्रकाराच्या गालावर थोपटले. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला आणि पुरोहित यांना माफी मागावी लागली.

पुरोहित हे सध्या पंजाबचे राज्यपाल आहेत. ते महाराष्ट्रातील विदर्भाच्या एका जिल्ह्यातील प्रसिद्ध नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. 1978 मध्ये ते प्रथमच नागपूर पूर्वमधून आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 1984 मध्ये 8व्या लोकसभा निवडणुकीत पुरोहित काँग्रेस पक्षाकडून खासदार झाले.

1999 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2003 मध्ये बनवारीलाल यांनी विदर्भ स्टेट पार्टी या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. 2009 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. ऑगस्ट 2016 मध्ये बनवारीलाल यांची आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर 2017 मध्ये त्यांची तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 27 ऑगस्ट 2021 रोजी त्यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

3. गोवा : राज्यपाल एस. श्रीधरन पिल्लई दोन वेळा केरळ भाजपचे अध्यक्ष होते

दीर्घकाळपर्यंत केरळच्या राजकारणात सक्रिय राहिलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई सध्या गोव्याचे राज्यपाल आहेत.
दीर्घकाळपर्यंत केरळच्या राजकारणात सक्रिय राहिलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई सध्या गोव्याचे राज्यपाल आहेत.

कोरोना महामारीच्या काळात 24 मार्च 2020 रोजी प्रथमच देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर पीएस श्रीधरन पिल्लई यांनी मार्च ते ऑगस्ट या चार महिन्यांत 13 पुस्तके लिहिली. सध्या श्रीधरन हे गोव्याचे राज्यपाल आहेत. श्रीधरन यांना ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदा मिझोरामचे राज्यपाल बनवण्यात आले. त्यानंतर त्यांना गोव्यात राज्यपालपदाची जबाबदारी मिळाली.

पीएस श्रीधरन पिल्लई 2003 ते 2006 पर्यंत केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. या दरम्यान, 2004 मध्ये पहिल्यांदा भाजपने केरळ आणि लक्षद्वीपमध्ये संयुक्तपणे लोकसभेच्या 2 जागा जिंकल्या. 2018 मध्ये त्यांची पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

पीएस श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ABVP मधून केली होती. श्रीधरन हे तारुण्यापासून भाजपच्या अगदी जवळ होते, त्यामुळेच त्यांना राज्यपालपद भेट म्हणून मिळाले आहे.

4. मणिपूर : ला गणेशन यांनी राजभवनाला दिलेल्या प्रोफाइलमध्ये सांगितले आरएसएसशी कौटुंबिक संबंध

ला गणेशन मणिपूरचे राज्यपाल आहेत. ते यापूर्वी BJP चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले आहेत.
ला गणेशन मणिपूरचे राज्यपाल आहेत. ते यापूर्वी BJP चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले आहेत.

ही 2003ची गोष्ट आहे. तामिळनाडू भाजपचे तत्कालीन अध्यक्ष किरुबानिधी आणि भाजप नेते ला गणेशन एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशात पोहोचले होते. यादरम्यान गणेशन यांनी अंतर्गत मतभेदानंतर जातीचा उल्लेख करून किरुबानिधी यांच्यावर टीका करणे सुरू केले. त्यानंतर ते वादात सापडले होते.

सध्या ला गणेशन हे मणिपूरचे राज्यपाल आहेत. 27 ऑगस्ट 2021 रोजी त्यांनी हे पद स्वीकारले. ला गणेशन हे आणीबाणीनंतर 1970 पासून भाजपशी जोडले गेले आहेत. गणेशन यांनी भाजपमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिवपद भूषवले आहे. 5 दशकांहून अधिक काळ पक्षाशी असलेल्या त्यांच्या सखोल संबंधामुळेच त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्यपालांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरील प्रस्तावनेत RSS सोबत असलेल्या त्यांच्या संबंधांची माहिती दिली आहे.

5. उत्तराखंड : सैन्याचे माजी उपप्रमुख होते राज्यपाल गुरमीत सिंग

गुरमीत सिंग भारतीय सैन्यात माजी उपप्रमुख पदावर राहिलेले आहेत. त्यांना चीन प्रकरणातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.
गुरमीत सिंग भारतीय सैन्यात माजी उपप्रमुख पदावर राहिलेले आहेत. त्यांना चीन प्रकरणातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.

ही 2002ची गोष्ट आहे. भारतीय लष्कराचे माजी उपप्रमुख गुरमीत सिंग हे एका शिष्टमंडळासह बीजिंगला गेले होते. यादरम्यान दोन्ही सैन्यांना त्यांचे नकाशे शेअर करायचे होते. दोन्ही देशांच्या सीमा नकाशांमध्ये हिमाचल, उत्तराखंड आणि लडाख वेगवेगळे होते.

यादरम्यान गुरमीत यांनी चिनी अधिकाऱ्यांसोबत हिमाचल आणि उत्तराखंडमधील सीमा विवाद सोडवण्यात यश मिळवले, परंतु लडाखच्या बाबतीत करार होऊ शकला नाही. हेच कारण आहे की, ले. जनरल गुरमीत सिंग हे चीनशी बोलणी करण्यात तज्ज्ञ मानले जातात. एलएसीवरील तणावाच्या काळात त्यांनी 7 वेळा चीनला भेट देऊन हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला.

राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर 15 सप्टेंबर 2021 रोजी गुरमीत सिंग यांना उत्तराखंडचे राज्यपाल बनवण्यात आले. पहिल्यांदाच लष्करी पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्याला राज्यपाल करण्यात आले, ज्यांचा भाजपशी कोणताही संबंध नव्हता.

बातम्या आणखी आहेत...