आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:पर्यटन हंगाम, श्रावणासाठी केलेली लाखोंची गुंतवणूकही वाया गेली

वेरूळहून महेश जोशी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल आव्हाडांप्रमाणे प्रत्येक व्यावसायिकाचा एकच प्रश्न- आता कुटुंब कसे पोसायचे?

सुमारे ४ हजार पर्यटकांच्या गर्दीने गजबजणारी वेरूळ लेणी १८ मार्चपासून बंद आहे. सध्या इथली भयाण शांतता काळीज चिरून टाकते. ८-१० सुरक्षा रक्षक लेणीचे रक्षण करत आहेत. वेरूळच्या अर्थव्यवस्थेचा पाया लेणी आणि घृष्णेश्वर, दोन्ही बंद असल्याने हा पायाच कोलमडला आहे.

मे महिन्यापासून सुरू होणारा पर्यटनाचा सीझन आणि श्रावण मासासाठी वेरूळचे व्यावसायिक अनिल आव्हाड यांनी पितळीच्या मूर्ती, फोटो फ्रेम आणि दगडाच्या वस्तू असा ८ लाख रुपयांच्या मालाचा स्टॉक केला होेता. घृष्णेश्वर मंदिराबाहेरील त्यांच्या दुकानात एकट्या श्रावणात वर्षभराचा व्यवसाय होतो. लॉकडाऊन लागल्यानंतर १५-२० दिवसांत सर्वकाही सुरळीत होईल असा अंदाज होता. पण १०३ दिवसांनंतरही लेणी आणि मंदिर बंद आहे. ते लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत. घृष्णेश्वर मंदिर आणि लेणीने आमच्या पिढ्यान््पिढ्यांचे घर चालवले. लॉकडाऊनमुळे त्यांची माया ओसरली आहे. कुटुंबातील ११ सदस्यांचे पोट कसे भरायचे, या चिंतेने आव्हाड यांना घेरले आहे. अशी चिंता त्यांची एकट्याची नाही. या भागात वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला अशाच समस्येने ग्रासले आहे.

२५ हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न

लेणी परिसरातील “एलोरा केव्हज शाॅपकीपर्स अँड हॉटेल ओनर्स असोसिएशन’ या १९९१ पासूनच्या संघटनेचे अध्यक्ष आणि व्यावसायिक मकरंद आपटे म्हणाले, ५८ दुकानदार आमचे सदस्य आहेत. याव्यतिरिक्त येथे ३०-४० फोटाेग्राफर, २२-२५ हस्तकला विक्रेते, २०-२२ लेणीचे अल्बम-फोटो विक्रेते, १५ व्हीलचेअर देणारे, तर लहान-मोठे २२ हॉटेल आहेत. लेणीत एएसआय प्रमाणित २८, तर अन्य १२ गाइड आहेत. घृष्णेश्वर मंदिर परिसरात शिवपार्वती दुकान असोसिएशनसोबत घृष्णेश्वर देवस्थान हॉटेल संघटना आहे. यात १०४ बेल-फुलाची दुकाने, १०-१२ हस्तकला विक्रेते, २०-२२ फोटोग्राफर आहेत. मंदिरात पूजा करणारे २५ पुरोहित आहेत. देवस्थानचे १२ कर्मचारी आहेत. गावात ६० रिक्षा धावतात. सर्व मिळून ५ हजार लोक मंदिर आणि लेणी परिसरात व्यवसाय करतात. त्यांचे कुटंुबीय मिळून तब्बल २५ हजार लोकांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसलाय.

बातम्या आणखी आहेत...