आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ground Report From Ground Zero Where Assam And Mizoram Clashed, Assam Mizoram Border Police And CRPF Latest News And Updates

एक्सक्लूझिव्ह:आसाम-मिझोरम सीमेवर दोन राष्ट्रांच्या सीमेसारखे दृश्य; दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी जंगलात बनवले कॅम्प, सशस्त्र जवान तैनात

अक्षय वाजपेयी, आसाम-मिझोरम सीमावर्ती भागातून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान्य भारतात झालेल्या वादंगानंतर आसाम आणि मिझोरम दरम्यानच्या रस्त्यावर परिस्थिती सामान्य दिसत आहे. पण, जंगलात मात्र तणाव अजुनही कायम आहे. मिझोरमच्या कोलासिब जिल्ह्यात असलेल्या वेरेंगटे येथून 20 किमी दूर बुराचेपमध्ये दोन्ही राज्यांचे पोलिस समोरा-समोर आहेत.

डोंगराळ भागांच्या टेकड्यांवर आसाम पोलिसांनी आपले शिबीर लावले आहे. या ठिकाणी जवानांच्या हातात थेट LMG (लाइट मशीन गन) आहेत. तर डोंगराच्या खालच्या भागांवर मिझोरम पोलिसांचे कॅम्प आहेत. या जवानांकडे सुद्धा LMG आहेत. 26 जुलै रोजी दोन्ही देशांच्या पोलिसांनी एकमेकांवर सीमेवर गोळीबार केला. यात आसामच्या 6 पोलिसांसह 7 जणांचा जीव गेला. याच ग्राउंड झीरोवर आमच्या प्रतिनिधींनी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

आसामचच्या कछार जिल्ह्यात असलेल्या लैलापुरमधध्ये पोलिसांच्या पेट्रोलिंग पोस्टवर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) जवान तैनात आहेत. याच रस्त्यावरून आसाम आणि मिझोरम जोडले जातात. 2 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 8 वाजता आम्ही लैलापूर पोहोचलो तेव्हा CRPF च्या जवानांनी आम्हाला थांबवले. नाव आणि प्रेस कार्ड पाहिल्यानंतर त्यांनी पुढे जाण्याची परवानगी दिली.

काही अंतरावर आम्हाला CRPF चे आणखी एक बॅरिकेड दिसले. या ठिकाणी आमच्या एंट्रीची सविस्तर नोंद करून घेण्यात आली. जागो-जागी बॅरिकेडसह CRPF जवान बंदूका घेऊन रस्त्यावर गस्त लावत होते. मिझोरममध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्हा CRPF चे तिसरे बॅरिकेड दिसून आले. या ठिकाणी पुन्हा चौकशी करून पुढे निघण्याची परवानगी दिली.

तिसऱ्या तपास नाक्यानंतर आम्ही 26 जुलै रोजी घडलेल्या संघर्षाच्या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर जळालेल्या अवस्थेतील वाहने दिसून आली. त्यात एक बस देखील होती. त्याच्या काचा फुटलेल्या होत्या. यावर लाल अक्षरांमध्ये मिझोरम असे लिहिले होते. येथून पुढे गेल्यानंतर आम्हाला मिझोरम पोलिसांचा एंट्री गेट सापडला.

विशेष म्हणजे, मिझोरमची सीमा ज्या ठिकाणी सुरू होते तेथे CRPF नाही तर मिझोरमचेच पोलिस दिसून आले. सुरुवातीला आम्हाला आत जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर मीडिया असल्याचे सांगितल्यावर काही कागदी कारवाई पूर्ण करून आम्हाला पुढे जाण्यासाठी सोडण्यात आले. हा तपास नाका पार केल्यानंतर आम्ही वेरेंगटे पोलिस चेक पोस्टजवळ पोहोचलो. येथे पुन्हा आमची लेखी एंट्री करण्यात आली.

वेरेंगेट पोलिस चेक पोस्टवर आम्हाला मिझोरम सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या मीडिया ऑफिसर मेजर कॅरोलीन भेटल्या. त्यांनी सांगितले की "लैलापूरमध्ये दोन्ही राज्यांच्या पोलिसांत 26 जुलै रोजी संघर्ष झाला. पण, वादाची सुरुवात 10 जुलै रोजीच झाली होती. कारण, याच दिवशी आसामचे पोलिस आमच्या हद्दीत दाखल झाले होते. त्यांनी डोंगराळ भागात बनवलेल्या बागा उद्ध्वस्त केल्या. आणि आपले कॅम्प थाटले. यामुळे स्थानिक संतापले आणि 26 जुलै रोजी त्याचेच पडसाद उमटले."

आईतलांग, बुराचेपमध्ये दोन्ही राज्यांचे पोलिस आमने-सामने
आम्ही कॅरोलीनला सोबत घेऊन आईतलांग आणि बुराचेप येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलो. वेरेंगटे पोलिस चेक पोस्टपासून काही अंतरावर एका घराच्या छतावरून आम्ही डोंगरावर बनलेले कॅम्प पाहिले. स्थानिक रॉकीने कॅम्पकडे बोट दाखवताना सांगितले, की तो परिसर वेरेंगटे हद्दीत आहे. आम्ही बागायती शेती करत होतो. परंतु, 29 जून रोजी आसामचे 200 पेक्षा अधिक जवान त्या ठिकाणी येऊन धडकले. त्यांनी आमच्या बागा उद्ध्वस्त केल्या. आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी आपले कॅम्प थाटले.

पावसामुळे आईतलांग पर्यंत जाणे शक्य नव्हते. कारण, तेथे जाण्यासाठी जंगलातील चिखलमय रस्ता पार करावा लागतो. पावसात तेथे कुणीही जाऊ शकत नाही. दुरबिणीतून पाहिल्यास आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांची 5-6 शिबीरे दिसून आली. त्यातील एक मिझोरम पोलिसांचे तर उर्वरीत आसाम पोलिसांचे आहेत.

आईतलांगची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर आम्ही बुराचेपसाठी रवाना झालो. बुराचेप वेरेंगटेमध्ये असलेली एक वस्ती आहे. या ठिकाणी डोंगराळ भागांवर बागा असतात. या ठिकाणी पान आणि सुपारी उगवली जाते. उर्वरीत जागेत धान्य घेतले जाते. हा परिसर वेरेंगटे पोलिस चौकीपासून 20 किमी दूर आहे.

रस्ता कच्चा असल्याने आम्हाला जवळपास 3 किमी पायी जावे लागले. बुराचेपमध्ये पोहोचताच मिझोरम पोलिसांचे 6 ते 7 कॅम्प दिसून आले. तर डोंगरावर उंच ठिकाणी आसाम पोलिसांचे 2 ते 3 कॅम्प दिसत होते. बेराचेप फेनुअम पंचायतीचा भाग आहे. परिस्थितीची आणखी माहिती घेण्यासाठी आम्ही फेनुअम पंचायत सदस्य लफामकिमा यांना सोबत घेऊन गेलो. त्यांच्यासह कैरोलिना, लल्हलिम्पुइया, एच चुनाना, रॉकी लालचंदमा, लालरेमरूता आणि ह्रुइमाविया देखील आमच्या सोबतीला होते. हे सगळेच मिझोरमचे रहिवासी आहेत.

लफाकमिमाने यांनी सांगितले की 10 जुलै रोजी आसाम पोलिसांचे 200 पेक्षा अधिक जवान बुराचेप गावात JCB घेऊन पोहोचले. त्यांनी रस्ता बनवण्यास सुरुवात केली. आमच्या गावाची जमीन असल्याने आमच्यापैकी 10-20 जण त्यांना थांबवण्यासाठी पोहोचलो. कित्येक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी शेती करतो. पण, पोलिसांनी आमचे काहीच ऐकून घेतले नाही. उलट आम्हाला मारहाण केली. आमच्या सुपारीच्या बागांमध्ये त्यांनी तंबू ठोकले. 70 वर्षांपासून आम्ही शेती करतोय, पण असे यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.

आसामातून मिझोरममध्ये पुरवठा करणारी वाहने बंद
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 306 आसाम आणि मिझोरमला जोडतो. मिझोरमला आवश्यक असलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याच मार्गातून होत असतो. पण, 26 जुलै रोजी दोन्ही राज्यांच्या पोलिसांत हिंसाचार झाला, तेव्हापासून कुठलेही मालवाहू वाहन मिझोरममध्ये येऊ दिले जात नाही.

मिझोरम चेक पोस्टवरून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जुलै पासून 2 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मिझोरम येथून आसामात 421 वाहने गेली. यामध्ये खासगी आणि मालवाहू अशा दोन्ही वाहनांचा समावेश होता. पण, आसामातून मिझोरममध्ये केवळ माध्यम आणि CRPF यांचीच वाहने पोहोचली.

बातम्या आणखी आहेत...