आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ground Report From India's Sextortion Village, What Is Sextortion And How Do They Do It From A Rajasthan Village

सेक्सटॉर्शन करणाऱ्यांच्या गावातून ग्राउंड रिपोर्ट:दोन-दोन मोबाईल वापरून भासवायचे तरुणी व्हिडिओ कॉल करत आहे, समोरच्याने कपडे काढले की अडकला; तरुणांकडून असा चालतो सेक्सटॉर्शनचा बिझनेस

पूनम कौशल, भरतपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात लोकांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन सेक्सटॉर्शन प्रकरणांमध्ये 500% वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मोठे घर, कार आणि पैशांचा देखावा करणारे लोक यांचे लक्ष्य ठरतात. एखाद्याला समोरून तरुणीच बोलत आहे असा भास करून देण्यासाठी प्रत्यक्षात युवकच दोन-दोन मोबाईल वापरतात. राजस्थानचे भरतपूर जिल्ह्यातील खोह आणि सिकरीसह काही गाव सेक्सटॉर्शन करणाऱ्यांचा अड्डाच आहे. त्याच गावांमध्ये भास्करच्या प्रतिनिधींनी जाऊन या संपूर्ण चक्राचा खुलासा केला.

डोंगर दऱ्यांवर वसलेल्या या गावांपर्यंत पोहोचणे काही सोपे नव्हते. त्यात बाहेरची व्यक्ती दिसतात गावकरी सतर्क होतात. मोठ्या मुश्किलीने दोन युवक आमच्याशी बोलण्यास तयार झाले. हे दोघेही सेक्सटॉर्शन अर्थात अश्लील फोटो, व्हिडिओ मिळवून त्या बदल्यात पैसे उकळण्याच्या प्रकरणांमध्ये अडकले होते. पण, आता त्यांनी हे काम सोडले आहे. या दोघांनी जे किस्से सांगितले, ते लक्षात ठेवून आपल्याला ऑनलाइन सतर्क राहता येईल.

सेक्सटॉर्शनचा किस्सा #1

पहिल्या युवकाने सांगितले, "मी अडणी होतो आणि कामधंदा काहीच नव्हता. रिकामटेकडे फिरत असताना रिझवान नावाची एक व्यक्ती भेटली. त्याने मला सल्ला दिला की रिकामे फिरण्यापेक्षा मोबाईलवरून पैसे तरी कमव. रिझवाननेच मला एक मोबाईल दिला. त्यात एक सिमकार्ड आणि आधीपासूनच मुलीच्या नावाचे फेसबूक अकाउंट होते. मला काय करायचे होते हे पुढील 4-5 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये समजावून सांगण्यात आले."

"मला सांगितले की कशा लोकांना टार्गेट करायचे. ज्यांची फ्रेंड लिस्ट भली मोठी असेल, जे मोठ्या कार, बंगल्यांचे फोटो पोस्ट करत असतात त्यांच्यावर नजर ठेवायची. इंग्रजीत हाय, हॅलो आणि काही शब्द पाठ करून दिले. यानंतर फेसबूकवर कुणी फोटो टाकल्यानंतर आम्ही कॉमेंट करतो. त्यांच्याकडून कॉमेंटवर लाइक आले की हा माणूस अडकवला जाऊ शकतो असे समजायचे."

रिझवानने आम्हाला तरुणींचे काही व्हिडिओ दिले होते. हे आम्ही चॅटवरून पाठवत होतो. समोरून व्हिडिओ कॉलची विनंती आली की आम्ही दोन मोबाईल अशा पद्धतीने ठेवायचो की समोरच्या व्यक्तीला वाटावे एक तरुणी न्यूड होऊन कॉल करत आहे. या दरम्यान समोरच्या व्यक्तीने कपडे काढले की आम्ही त्याची रेकॉर्डिंग ठेवायचो. याच व्हिडिओचा वापर करून त्यांना कॉल करून नंतर पैसे उकळले जायचे. 5 हजार ते 2 लाखांपर्यंत सुद्धा मागणी केली जाते.

आम्हाला रिझवानने एक बँक खाते क्रमांक दिले होते. त्याच खात्यात पीडितांचे पैसे जमा व्हायचे. कित्येकवेळा मोठी रक्कम खात्यात पडताच रिझवान काढून घ्यायचा. नंतर मिळणाऱ्या रकमेतून त्याला आम्ही 20% देण्यास सुरुवात केली. माझ्यासारखे कित्येक तरुण रिझवानसाठी अशाच पद्धतीने काम करत होते. यानंतर गावात पोलिस यायला लागले, चर्चा वाढली आणि माझ्या आई-वडिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. त्यानंतर मी काम सोडण्याचा निर्णय घेतला असे संबंधित तरुणाने सांगितले.

सेक्सटॉर्शनचा किस्सा #2

खोह परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या तरुणाने सांगितले की तो सध्या बारावीला आहे. OLX आणि Facebook मार्केट प्लेसचा वापर करून आम्ही लोकांना बनावट जाहिरातींच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करत होतो. आता हे काम सोडले आहे. एकदा तर कुठल्याही गँगशी संबंध न ठेवता एकट्यानेच एका व्यक्तीकडून 1 लाख रुपये उकळले होते. पण, ज्या खात्यात पैसे मागितले त्याने थोडे पैसे आपल्याकडे ठेवले असे त्याने सांगितले.

नेमकी फसवणूक कशी व्हायची हे सांगताना युवक म्हणाला, आम्ही भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवान असल्याचे सांगत होतो. त्याच स्वरुपाचे फेसबूक आणि सोशल मीडिया प्रोफाइल तयार केले होते. यानंतर ओएलएक्स आणि मार्केटप्लेसवर स्वस्त किंमतींमध्ये घरातील वस्तूंच्या खोट्या जाहिराती देत होतो. समोरच्या व्यक्तीने लालसेपोटी फोन केला आणि कारण विचारले तर सांगायचे की नोकरीची बदली होत असल्याने विकत आहोत. एकदा माणूस अडकला की वस्तू पाठवतो म्हणून पैसे मागवून घ्यायचे आणि मोबाईल बंद करायचे.

हा युवक एकट्यानेच फसणूक करायचा. पण, अनेक जण समूहात राहून हे काम करतात. त्यातील कुणी कस्टमर केअर, तर कुणी ट्रांसपोर्टरचा सोंग करून फोनवर बोलायचे आणि पैसे मागवायचे. आता मात्र मार्केट प्लेसवर ऑनलाइन जाहिराती टाकताना अडचणी येत आहेत. कंपन्यांनी आपले धोरण आणखी कडक केले आहे.

गुन्हेगारीचा पैसा कुठे जातो हे गावात पाहिल्यावर आवश्य दिसून येते. ऑनलाइन फसवणूक करून या युवकांनी झोपड्यांच्या ठिकाणी पक्की आणि बहुमजली घरे बांधली आहेत. या घरांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले. पण, या विषयावर गावकरी मोकळ्यापणे बोलत नाहीत. काही गावकरी तर सेक्सटॉर्शन आणि ऑनलाइन फसवणूक ही गुन्हेगारी आहे हे मान्य करायलाच तयार नाहीत.

कारवाई करताना पोलिसांसमोर आव्हाने
एखाद्या व्यक्तीने फसवणुकीची तक्रार केली की त्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेता-घेता आम्ही भरतपूरच्या या गावांपर्यंत पोहोचतो असे पोलिस सांगतात. स्थानिक पोलिस अधिकारी धारा सिंह मीणा आणि त्यांच्या टीमने उत्तराखंड पोलिसांनी उत्तराखंडच्या पोलिस महासंचालकांची फेक फेसबूक प्रोफाइल बनवणाऱ्या इरशाद, अरशद आणि झाहिद यांना अटक केली. गुन्हेगार इतके पटाइत आहेत की त्यांना पकडण्यासाठी 2200 किमीचा प्रवास करावा लागतो असे उत्तराखंड पोलिसांनी सांगितले.

भरतपूरचे पोलिस अधीक्षक देवेंद्र कुमार बिश्नोई यांनी मेवाती परिसर, गावांमध्ये होणाऱ्या सेक्सटॉर्शन रॅकेटवर काही गोष्टी स्पष्ट केल्या.

भरतपूर जिल्ह्याच्या सीमा उत्तर प्रदेशातील मथुरा, राजस्थानच्या अलवर आणि हरियाणातील नूह या जिल्ह्यांना लागून आहेत. या संपूर्ण परिसरात मेवात समुदायाची संख्या मोठी आहे.
गुन्हेगारी करणारे लोक सहज एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. त्यामुळे, त्यांना पकडणे कठीण जाते.
भौगोलिक परिस्थिती सुद्धा यांना पकडण्यात अडथळे आणते. डोंगरदऱ्यांपर्यंत पोहोचून आरोपींना पकडणे सोपे नाही.
मेवाती भागात मोठ्या संख्येने ट्रक चालक राहतात. त्यांच्या मदतीने अनेकदा आरोपी ड्रायव्हर किंवा क्लीनर बनून ट्रक चालवतात.
कायद्यापासून पळवाट काढण्यासाठी या टोळ्यांनी अल्पवयीन मुलांचा वापर सुरू केला आहे.

भरतपूर पोलिस स्टेशनचे API चंद्र प्रकाश यांच्याकडेच सध्या 50 सक्रीय प्रकरणे आहेत. त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पकडल्या जाणाऱ्या बहुसंख्या लोकांमध्ये अल्पवयीन तरुण सापडतात. त्यांना कोर्टात हजर करणे, अटक करणे किंवा कारवाई करणे शक्य नसते. पकडले तरीही ते लवकर सुटतात. कठोर कारवाई होऊ नये यासाठीच या फसवणुकीच्या कामांमध्ये अल्पवयीनांचा वापर होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी धारा सिंह मीणा यांनी एका तक्रारीवरून सेक्सटॉर्शन प्रकरणात एकाला पकडले. पण, तो अल्पवयीन निघाला. त्यामुळे, त्याच्याकडून व्हिडिओ डिलीट केला आणि त्याला सोडून दिले.

कागदपत्रे मिळवण्यासाठी लावतात बनावट सरकारी शिबीर
सेक्सटॉर्शन किंवा ऑनलाइन स्कॅम करण्याची सुरुवात बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून होत असते. हे काम अशा लोकांसाठी फार कठीण नाही. या गावांमध्ये स्थानिकांना कागदपत्रे नसतानाही सिम दिले जातात. पण, बाहेरच्या व्यक्तीला असे करता येत नाही.

आमच्या प्रतिनिधींनी बनावट कागदपत्रांवर सिम खरेदी करता येते का एकदा प्रयत्न केला. पण, कुणीही सिम द्यायला तयार झाले नाही. यानंतर एका स्थानिकाच्या मदतीने कागदपत्रे नसताना फक्त एका हजार रुपयांत चालू सिम घेतले.

पोलिस अधिकारी मीणा यांनी सांगितल्याप्रमाणे, नुकतेच एका डीलरला 100 सिमकार्डसह अटक करण्यात आली होती. या बनावट सिमकार्ड प्रकरणांमध्ये कंपन्या देखील असतात. एका वकीलाने सांगितल्याप्रमाणे परिसरात एका नेटवर्क कंपनीचा एरिया मॅनेजवर राहतो. त्याने लवकर पैसे कमवण्यासाठी बनावट सिम विकण्यास सुरुवात केली. सिमकार्ड आणि इतर कामांसाठी डॉक्युमेंट मिळवण्याकरिता गुन्हेगार चक्क बनावट सरकारी कॅम्प सुद्धा सुरू करतात. बनावट सिम विरोधात नेटवर्क कंपन्यांना सुद्धा गंभीर व्हावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...