आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संपूर्ण जगात श्रीरामाची राजा रामांप्रमाणे पूजा केली जाते.. पण त्यांचे सासर असलेल्या जनकपूर धाममध्ये त्यांची पूजा वर रामाच्या रूपात केली जाते. मिथिलेचा राजा जनकाची मुलगी सीतेबराेबर श्रीरामाचा विवाह झाला त्या वेळी ते अयाेध्येचे राजकुमार हाेते. त्यामुळेच येथील मंिदरात विराजमान असलेल्या श्रीरामाचे वय १८ वर्षे असून सीता १६ वर्षांची आहे. श्रीराम हे मिथिलेचे जावई (स्थानिक भाषेत पाहुन) असल्याने मिथिलेतील प्रसिद्ध पाहुणचाराची परंपरा कायम राखताना आजही येथे श्रीरामाला दिवसभरात ५ वेळा नैवेद्य दाखवला जाताे. हा नैवेद्य प्रसादाच्या स्वरूपात भाविकांना दिला जाताे. संत आणि गरीब लोकांसाठी भंडारादेखील ठेवला जातो, ज्यामध्ये दररोज २०० लोक जेवतात. मुख्य महंत राम तपेश्वर दास म्हणतात की, सकाळी जावई उठताच खिरीचा नैवेद्य दाखवला जाताे. यानंतर सकाळच्या न्याहारीला बाल नैवेद्य म्हणतात. यात दहीकाला आणि मिठाई वाढली जाते. त्यानंतर दुपारी जावयाला प्रामुख्याने ५६ वा १०६ प्रकारचे जिन्नस तयार करून दाखवले जातात. त्याला राजभाेग म्हणतात. संध्याकाळी फळांचा नैवेद्य दाखवला जाताे. नंतर रात्री राजभाेग दाखवला जाताे. या मंदिराचे मुख्य आचारी राम नगेंद्र मिश्रा म्हणाले, या विविध प्रकारच्या नैवेद्यावर महिन्याला ३ लाख रुपये खर्च केला जाताे. मंदिरात दरवर्षी दिवाळीला विशेष सजावटीची परंपरा राहिली आहे. २०१९ मध्ये येथे १.२५ लाख दिव्यांनी सजावट करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे लॉकडाउन आहे. त्यामुळेच दिवाळीला भाविकांची संख्या कमी आहे. पण मंदिर यंदाही सजवण्यात आले आहे.
१९६१ मध्ये जनकपूरमध्ये दुष्काळ पडलेला असताना जनकधाममध्ये अखंड श्री सीताराम महायज्ञ करण्यात आला हाेता. हा महायज्ञ सलग आजही सुरू आहे. काेराेनासारख्या महामारीतही हा महायज्ञ सुरू आहे. वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये एकूण १६ व्यक्तींनी हा सीताराम महायज्ञ सुरू ठेवला आहे. त्यांना मंदिर व्यवस्थापनाकडून भाेजन, घर, वस्त्र व मासिक मानधन दिले जाते.
दिवाळीला घर, दुकानाची केळीच्या खांबांनी सजावट, ८ काेटी खांबांची विक्री
दीपाेत्सवाच्या दिवशी जनकपूरमध्ये सर्व व्यापारी आपल्या दुकानांसमाेर केळीच्या खांबांची सजावट करतात. स्थानिक एम्पाेरियमचे संचालक निरंजन केडिया म्हणाले की, लहान - माेठी मिळून १२ हजारपेक्षा जास्त दुकाने आहेत. ६ ते ८ खांब लावून दुकानाची सजावट हाेते. दिवाळीला एक खांब ५०० ते १००० रुपयांपर्यंत विकला जाताे. दरवर्षी या दिवशी ५ ते ८ काेटी रुपयांच्या केळीच्या खांबांची विक्री हाेते.
गर्भगृहात राम-सीतेच्या 3 जोडी मूर्ती, राम विवाहाचे दृश्य वेगळे
मुख्य पुजाऱ्यानुसार गर्भगृहात राम-सीतेच्या ३ जोडी मूर्ती आहेत. एक जोडी मूर्ती प्रकट झाली होती. दुसरी मंदिर बनवणाऱ्या टिकमगढच्या महाराणींनी आणि तिसरी जनकपूरचे राजे माणिकसेन यांनी स्थापित केली होती. मंदिर परिसरात राम-सीता विवाह मंडपही आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.