आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:दिवाळीपर्यंत 1 टन सोन्याचे दागिने येथून संपूर्ण देशभर जाणार, आतापर्यंत 28 हजार ऑर्डर पूर्ण

के. ए. शाझी | कोझिकोड (केरळ)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील 130 वर्षे जुने ज्वेलरी हब केरळच्या कोडूव्हॅली येथून ग्राउंड रिपोर्ट
  • आखाती देशांतून येते सोने, पंजाब-बंगालचे पारंपरिक दागिने प्रसिद्ध

केरळचे कोडूव्हॅली गाव सध्या खूप व्यग्र आहे. येथील बाजारात खरेदीसाठी देशभरातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांचे येणे-जाणे सुरू आहे. यंदा करवाचौथ आणि दिवाळीसाठी १ टन सोन्याच्या (अंदाजे किंमत ५०० कोटी रु.) दागिन्यांची ऑर्डर पूर्ण होणार आहे.

कोविडमुळे बहुतांश ऑर्डर आॅनलाइन मिळाल्या आहेत. त्यापैकी पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, यूपी यांसारख्या राज्यांतून मिळालेल्या २८ हजार लहान-मोठ्या ऑर्डर पूर्णही झाल्या आहेत. ५० हजार लोकसंख्येच्या कोडूव्हॅली गावात १ किमीच्या कक्षेत सोन्या-चांदीची १२० पेक्षा जास्त दुकाने आहेत, तेथे दागिन्यांचे डिझायनिंग आणि निर्मिती होते. गोल्ड असोसिएशनचे प्रमुख के. सुरेंद्रन यांनी सांगितले,‘करवाचौथ व दिवाळीव्यतिरिक्त अक्षय्यतृतीया आणि धनत्रयोदशीला केरळबाहेरील व्यापारी मोठ्या ऑर्डर घेऊन येतात. या वर्षी आम्हाला वर्षभराच्या ऑर्डर मिळत आहेत.’ आणखी एक ज्वेलर के. राघवन यांनी सांगितले की, कमी वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कारागीर सतत काम करत आहेत. कोडूव्हॅलीच्या या दागिन्यांच्या बाजारपेठेचा इतिहास १३० वर्षे जुना आहे. २० व्या शतकापूर्वी केरळमध्ये दागिन्यांची दुकाने नव्हती, असे मानले जाते.

आखाती देशांतून येते सोने, पंजाब-बंगालचे पारंपरिक दागिने प्रसिद्ध

कोडूव्हॅलीत दुबई, कतार यांसारख्या आखाती देशांतून सोने येते. राज्यांची संस्कृती लक्षात घेऊन दागिने बनवले जातात. १३० वर्षांपूर्वी व्यापारी घरोघरी जाऊन महिलांना दागिने विकत असत. आता हे गाव सोन्याच्या डिझायनिंगचे सर्वात मोेठे केंद्र झाले आहे.