आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ:देशाचा आँखो देखा हाल : रस्त्यावरच प्रसूती; मूल जिवंत राहावे म्हणून त्याला तिथेच सोडले

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पडण्याच्या भीतीने सीमा पलंगावर झोपत नाही. दिवसभर जमिनीवर बसते. - Divya Marathi
पडण्याच्या भीतीने सीमा पलंगावर झोपत नाही. दिवसभर जमिनीवर बसते.

लोक कोणत्या परिस्थितीत मुलांना सोडताहेत हे सीमाच्या गोष्टीवरून लक्षात येते. गर्भवती सीमा मनमाडहून अकोलासाठी निघाली होती. वाचा तिच्यावर काय प्रसंग आला ते...

‘मी नाव-पत्ता सांगून-सांगून थकले आहे. तुम्हीही आलात... काय करणार आहात माहिती घेऊन? राउरकेला हॉस्पिटलमध्ये राहत असलेली सीमा अचानक संतापते...’ माझ्यासोबत जे घडले ते सर्व ईश्वर पाहतो आहे, तोच उत्तर देईल. त्यालाच विचारा का केले माझ्यासोबत असे?’ अश्रू आेघळू लागतात आणि मुलांकडे जाते. सीमा २७ दिवसांपासून येथे आहे. घरी जाण्यासाठी जमावासोबत निघाली, मात्र चुकून मनमाडहून राउरकेला येथे आली. तिला अकोला येथे जायचे होते. पायी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसोबत जात होती. गर्भवती होती. रस्त्यातच प्रसववेदना सुरू झाल्या तेव्हा मिशन हॉस्पिटल येथे पोहोचली. कोरोनाची भीती दाखवत रुग्णालयाने प्रसूतीस नकार दिला. वेदनेने सीमाची पावले थबकली. तिने रस्त्यावरच एका मुलाला जन्म दिला. जवळच्या घरातील महिलांना सांगितले की ती मुलाला सोडून जात आहे. गेली नाही तर ती समूहापासून वेगळी होईल. त्या महिलेने विचारले - मुलाला रस्त्यावर का सोडून जात आहेस ? सीमा म्हणाली, लोक स्पर्श करू इच्छित नाही, मुलाला घेऊन चालता येणार नाही. ज्या महिलेला सीमाने हे सर्व सांगितले तिनेही मुलाला स्पर्श केला नाही. अंगणवाडी सेविकेला बोलावले. नंतर प्रशासनाने सीमाचा शोध सुरू केला. सुमारे १४ किमी अंतरावर ती सापडली. आई-मूल आता सरकारी रुग्णालयात आहेत. प्रशासनाने तिचा पत्ता शोधला आहे. ती बुलाडाणा जिल्ह्यातील आहे. तिला लवकरच घरी पाठवण्यात येणार आहे. मुलाचे नाव सोनू ठेवले अाहे.

बातम्या आणखी आहेत...