आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड झीरो रिपोर्ट:नाशकात पाच हजार अॅक्टिव्ह रूग्ण, अन् फक्त 14 व्हेंटिलेटर शिल्लक; राज्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा शहरांमध्ये चौथ्या क्रमांकावर नाशिक शहराची नोंद

भूषण महाले | नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात

जिल्ह्यात साधारण ६५ हजार रुग्ण.. त्यापैकी साधारण ४२ हजार रुग्ण नाशिक शहरामधील आहेत. गत महिनाभरात दिवसाला सरासरी हजार रुग्ण आढळत आहेत. यातील गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची गरज भासत आहे. सद्य:स्थितीत नाशिक शहराचा विचार केला तर केवळ १४ व्हेंटिलेटर बेड शिल्लक आहेत. आयसीयू लागल्यास फक्त ५५ खाटा आहेत. रोज साधारण ॲक्टिव्ह रुग्ण पाच हजाराच्या घरात यातील शेकडो रुग्णांना कधी व्हेंटिलेटर वा ऑक्सिजनची गरज कधी पडेल सांगता येत नाही. अठराशे कोटी रुपये बजेट असलेल्या एका श्रीमंत महापालिकेची ही दुर्दैवी कहाणी. मे महिन्यातच राज्याच्या आरोग्य विभागाने घसा फोडून जुलैनंतर रुग्ण वाढतील असे सांगितल्यानंतरही पुरेशा उपाययोजनांच्या अभावी आजघडीला काही तरुणांचे झालेले मृत्यूही सुन्न करणारे आहेत.

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात :

एकीकडे व्हेंटिलेटर वेळेवर मिळत नसल्यामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दुसरीकडे मात्र पीएम केअर फंडातील जवळपास २३ व्हेंटिलेटर नवीन बिटकोत धूळ खात पडून आहेत.

९० किमीवर यशस्वी ‘मालेगाव पॅटर्न’...

मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यात कोरोनाने एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम मालेगावसारख्या दाट लोकवस्तीला तडाखा बसला. एप्रिलमध्ये दिवसाला तीनशे रुग्ण सापडत होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर घेतलेली दक्षता, आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष दिल्यानंतर येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. किंबहुना राज्य कोरोना नियंत्रणाचा ‘मालेगाव पॅटर्न’ चर्चेमध्ये आहे. मात्र या शहरापासून ९० किमी अंतरावर असलेले नाशिक शहर चिंतेचे कारण ठरत आहे.

ही आहेत प्रमुख आव्हाने

> कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी आवश्यक दिशा निर्देशांचे पालन न करणे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे

> ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवणे

> सरकारी रुग्णालयांच्या उपचारांविषयी जनजागृती करणे आणि रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करणे.

या आहेत चुका

> डॉक्टर ,नर्सेस, इतर स्टाफ, सरकारी अधिकारी, कर्मचारीही केवळ कारवाईच्या भीतीने काम करतात. त्यांचीही मानसिकता बदलणे आवश्यक असले तरी वरिष्ठ अधिकारी तसे करताना दिसत नाहीत. प्रशिक्षित मनुष्यबळाची कमी आहे.

> साधनसामग्री नादुरुस्त झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी संबंधित व्यक्ती कोरोना वाॅर्डात जाणेही टाळत असल्याने त्यास लागणारा वेळ चिंतेचे कारण आहे.

> कोरोना बरा होतो, घरीही काळजी घेतल्यास रुग्णालयात जाण्याची गरज नाही, अशी शहरातील लोकांची मानसिकता तयार करण्यात प्रशासनाला अपयश.

सप्टेंबरअखेर ऑक्सिजन पुरवठा होणार समृद्ध

ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची समस्या आता भासत असली तरी आता नवीन बिटको रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयांमध्ये ३० केएल क्षमतेच्या नवीन ऑक्सिजन टाक्या बसवल्या जाणार असून सप्टेंबरअखेर ऑक्सिजन व्हेंटिलेटरची समस्या राहणार नाही. कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

बातम्या आणखी आहेत...