आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Growing Football Craze Among Kashmiri Girls; Player coach Performance In The State, Now Dream Of Playing For The Country

ग्राउंड रिपोर्ट:काश्मिरी मुलींत वाढतेय फुटबॉलची क्रेझ; राज्यात खेळाडू- प्रशिक्षक म्हणून कामगिरी, आता देशासाठी खेळण्याचे स्वप्न

मुदस्सीर कुलू | श्रीनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला फुटबॉल संघाची प्रशिक्षक नादिया. - Divya Marathi
महिला फुटबॉल संघाची प्रशिक्षक नादिया.
  • क्रीडा क्षेत्रात नाव कमावण्याची खोऱ्यातील तरुणांची जिद्द, पालकांचेही प्रोत्साहन
  • 2017 मध्ये दगडफेकीचा चेहरा, फुटबॉल प्रशिक्षक झाली अफ्शा

जम्मू-काश्मिरात दहशतवादाचा कणा मोडल्याने आणि कलम ३७० हटल्यानंतर स्थिती बदलत चालली आहे. कधीकाळी लष्करावर दगडफेक करणारे तरुण क्रीडा क्षेत्रात आपले उज्ज्वल भविष्य शोधत आहेत. विशेषत: काश्मिरी मुलींमध्ये फुटबॉलची क्रेझ वाढली आहे. जे आई- वडील कालपर्यंत त्यांना खेळण्यापासून रोखायचे तेच आज त्यांना फुटबॉल व इतर खेळात नाव कमवावे म्हणून प्रोत्साहन देत आहेत. हे पाहता श्रीनगरमध्ये फक्त मुलींसाठी पहिली अकादमी नुकतीच स्थापन झाली आहे.

श्रीनगरमध्ये मागील तीन दशकांपासून राहणारे संदीप चट्टू आणि त्यांची पत्नी पूनम चट्टू यांनी रिअल काश्मीर फुटबॉल क्लब स्थापन केला आहे, जो खास मुलींसाठी आहे. येथे प्रशिक्षणही खोऱ्यातील मुलीच देत आहेत. सध्या या ठिकाणी ४५ मुली आहेत. २३ वर्षांची नादिया निगहत खोऱ्यातील पहिली महिला फुटबॉल प्रशिक्षक झाली आहे. आता त्यांची स्वत:ची फुटबॉल अकादमीदेखील आहे. त्यांच्यासारखीच २१ वर्षांची आयनम जम्मू-काश्मीर महिला फुटबॉल संघाची कर्णधार झाली आहे. इतर मुलींसारखेच तिचेही भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात खेळण्याचे स्वप्न आहे.

२०१७ मध्ये दगडफेकीचा चेहरा, फुटबॉल प्रशिक्षक झाली अफ्शा

२४ वर्षांची अफ्शा आशिक २०१७ मध्ये श्रीनगरमध्ये दगडफेक करताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र, आज तिची दुसरी ओळख आहे. अफ्शा आता फुटबाॅल प्रशिक्षक आहे. ती नुकतीच पंतप्रधान मोदींसोबत वेबिनारमध्येही सहभागी झाली होती. तिच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येत आहे.

बातम्या आणखी आहेत...