आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टमी शुद्धीवर आलो, तेव्हा अम्मी मेलेली होती:तिच्या अंगावर कपडे नव्हते, तिच्या छातीवर तलवारीच्या जखमा होत्या

संध्या द्विवेदी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 दोषींची 18 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका करण्यात आली आहे. मात्र या सुटकेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ती देखील घटनापीठासमोर, यात 2 दिवसांची सुनावणीही झाली आहे.

आता या प्रकरणातील केवळ दोनच व्यक्ती जिवंत आहेत, त्यातील एक बिल्किस स्वतः आणि दुसरा सद्दाम, घटनेच्या वेळी तो फक्त 7 वर्षांचा मुलगा होता. बिल्किस बानो प्रकरणात बिल्किस व्यतिरिक्त संपूर्ण घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला सद्दाम हा एकमेव व्यक्ती आहे. तुम्ही बिल्किसची कथा वाचली आणि ऐकली असेल, आज सद्दामची गोष्ट वाचा…

'जेव्हा मी शुद्धीवर आलो, तेव्हा अम्मीच्या छातीवर तलवारीच्या जखमा होत्या. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. मी मोठ्याने ओरडलो, उठो अम्मी, उठो अम्मी. पण, ती उठली नाही. ती मेली होती', थरथरत्या आवाजात सद्दाम शेख म्हणतो. सद्दाम आता 27 वर्षांचा झाला आहे, पण हे सांगताना एक 6-7 वर्षाचा मुलगा घाबरलेला दिसतो, ज्याच्या समोर त्याच्या आईचा मृतदेह पडलेला होता.

सद्दामचा हा लहानपणीचा फोटो आहे. या वयातच त्याने दंगेखोरांचा क्रूरपणा पाहिला होता. सद्दाम हा बिल्किसचा नातेवाईक आणि घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे.
सद्दामचा हा लहानपणीचा फोटो आहे. या वयातच त्याने दंगेखोरांचा क्रूरपणा पाहिला होता. सद्दाम हा बिल्किसचा नातेवाईक आणि घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे.

27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून गुजरातकडे येणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली होती. यामध्ये 59 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 9 पुरुष, 25 मुले आणि 25 महिलांचा समावेश होता. काही तासांतच गुजरातच्या अनेक भागांतून हिंसाचार भडकल्याच्या बातम्या येऊ लागल्या. रात्री उशिरापर्यंत हा हिंसाचार गोध्रापासून 50 किमी अंतरावर असलेल्या दाहोदच्या रंधिकपूर गावात पोहोचला.

ज्या दिवशी गोध्रा येथे रेल्वे जाळण्यात आली, त्याच दिवशी संध्याकाळी शस्त्रे घेऊन एक जमाव रंधिकपूर गावात आला. गावातील लोक समोर उभे राहिले, त्यामुळे दंगलखोरांना परतावे लागले. चित्रण: गौतम चक्रवर्ती
ज्या दिवशी गोध्रा येथे रेल्वे जाळण्यात आली, त्याच दिवशी संध्याकाळी शस्त्रे घेऊन एक जमाव रंधिकपूर गावात आला. गावातील लोक समोर उभे राहिले, त्यामुळे दंगलखोरांना परतावे लागले. चित्रण: गौतम चक्रवर्ती

वृद्ध चाचांनी दंगलखोरांना रोखले तर त्यांनाही लोखंडी पाईपने मारहाण झाली

हे सांगतांना सद्दाम शेख त्यांच्या 4 वर्षाच्या चिमुरड्याला छातीशी आवळतात. नंतर सांगायला सुरूवात करतात. '27 फेब्रुवारी 2002 रोजी संध्याकाळ झाली होती, अंधार पडला होता आणि मी माझ्या मित्रांसोबत खेळत होतो. अचानक 4-5 मोठ्या वाहनातून लोक आले. मारा, जाळून टाका अशा घोषणा देत होते. मात्र, वस्तीतील तरुण, महिला, वडीलधारे समोर उभे राहिले त्यामुळे त्यांना परतावे लागले.

दुसऱ्या दिवशी, 28 फेब्रुवारी, गुरुवारी सकाळी, हल्ल्याच्या भीतीने, आम्ही एकत्रीत समूह करुन गाव सोडले. माझी आई आणि मी ज्या समूहात होतो त्याच समूहात बिल्किसही होती. घाईगडबडीत आम्ही सामानही सोबत घेतले नव्हते.

वस्तीतील लोकांना आता गावात राहणे सुरक्षित नाही असे वाटू लागले होते. त्यामुळे 28 फेब्रुवारीला सकाळी वेगवेगळ्या समूहाने आम्ही गावाबाहेर पडलो. यापैकी एक समूह सद्दाम आणि बिल्कीस यांचा होता. चित्रण: गौतम चक्रवर्ती
वस्तीतील लोकांना आता गावात राहणे सुरक्षित नाही असे वाटू लागले होते. त्यामुळे 28 फेब्रुवारीला सकाळी वेगवेगळ्या समूहाने आम्ही गावाबाहेर पडलो. यापैकी एक समूह सद्दाम आणि बिल्कीस यांचा होता. चित्रण: गौतम चक्रवर्ती

केसरबागेच्या जंगलात 3 दिवस आम्ही 40 किलोमीटर चाललो होतो. 3 मार्च 2002 चा रविवार होता, जेव्हा आम्ही काही लोक आमच्या दिशेने येताना पाहिले. त्याच्या हातात तलवारी, विळा, कुऱ्हाडी आणि लोखंडी पाईप होते. ते आले आणि आम्हाला मारायला लागले. एक म्हातारे चाचा होते, त्यांनी आम्हाला जाऊ द्या म्हणून हात जोडले. सर्वजण विनवणी करू लागले, पण त्यांनी त्याच चाच्यांच डोक्यावर पाईप मारला. ते तिथेच पडले.

एक दिवसापूर्वी शमीमच्या मुलीचा जन्म झाला होता, तिला खाईत फेकून दिले

सद्दाम प्रत्येक घटना सांगतांना थोडे थांबतो आणि स्वत:ला सावरतो आणि पुढे सांगायला सुरूवात करत होता. 'दंगलखोरांनी सगळ्यांना मारायला सुरुवात केली. चेंगराचेंगरी झाली. आईने माझा हात हातात धरला होता. ती जीवाच्या आतंकाने पळू लागली. तेव्हा कोणीतरी मला आईपासून वेगळे केले आणि मला खड्ड्यात फेकून दिले. आमच्यासोबत शमीम देखील होती, जीने एकाच दिवसापूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. त्यांनी शमीमच्या मुलीलाही माझ्यासमोर खड्ड्यात फेकले. माझ्यावर दगड ठेवला त्यामुळे मी बेशुद्ध पडलो.

3 मार्च रोजी दंगलखोरांच्या जमावाने बिल्किसच्या समूहाला घेरले. हातात शस्त्रे घेऊन या जमावाने मारहाण सुरू केली. महिलांवर सामूहिक बलात्कार केला. मुलांना मारले. सद्दामवरही हल्ला झाला, पण तो वाचला. चित्रण: गौतम चक्रवर्ती
3 मार्च रोजी दंगलखोरांच्या जमावाने बिल्किसच्या समूहाला घेरले. हातात शस्त्रे घेऊन या जमावाने मारहाण सुरू केली. महिलांवर सामूहिक बलात्कार केला. मुलांना मारले. सद्दामवरही हल्ला झाला, पण तो वाचला. चित्रण: गौतम चक्रवर्ती

शुद्धीवर आल्यावर माझ्या कानात आवाज आला. पाणी पाणी. तो माझ्या मामाचा मुलगा होता. माझ्यापेक्षा जरा लहान कदाचित 5 वर्षांचा असेल. मी त्याला पाणी आणायला नदीवर गेलो. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच्या बाजूला एक नदी होती. मी पाणी आणले तोपर्यंत तो मेला होता.'

अम्मीचा मृतदेह जमिनीवर होता, अंगावर एकही कपडा नव्हता

सद्दामचा आवाज पुन्हा जड झाला होता, मी कॅमेरा बंद केला. त्यांना धीर दिला आणि काही वेळाने पुन्हा ते बोलू लागले. मग मी अम्मीकडे गेलो. अम्मी जमिनीवर पडलेली होती. मी त्यांना हालवले मी म्हणालो- उठो अम्मी- उठो अम्मी, पण ती उठली नाही. तीच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिथेले सर्वजण मेलेले होते.

आम्ही गाव सोडले तेव्हा बिल्किसही आमच्यासोबत होती, पण शुद्धीवर आल्यानंतर मला ती दिसली नाही. आजूबाजूला मृतदेह पडलेले होते. मी तिथेच बसलो. थोड्या वेळाने गावातले काही लोक आले, मग पोलिस आले आणि मला घेऊन गेले. अम्मी तिथेच पडली होती. मी त्यांना सोडले, मला जावेच लागले.'

बिल्किस, अम्मीसह 6 महिलांवर सामूहिक बलात्कार

सद्दाम सांगतो- त्या ठिकाणी 6 महिलांवर सामूहिक बलात्कार झाला, बिल्किस, मेरी अम्मी अमीना याशिवाय आणखी 4 महिलाही तिथे होत्या. बिल्किस आणि मी वगळता सर्वजण मारले गेले. माझ्यावर दाहोद कॅम्पमध्ये उपचार झाले. त्यानंतर मी माझ्या भावांसोबत कॅम्पमध्ये राहू लागलो. माझे भाऊ रंधीकपुर सोडतांनाच वेगळ्या समूहासोबत निघाले होते, त्यामुळे ते वाचले.

पोलिसांनी सद्दामला दाहोद रिलीफ कॅम्पमध्ये सोडले. कुटुंब संपले, त्यामुळे सद्दाम भावांसोबत छावणीत राहिला. येथून त्याचे मामा मुख्तार त्याला सोबत घेऊन गेले. चित्रण: गौतम चक्रवर्ती
पोलिसांनी सद्दामला दाहोद रिलीफ कॅम्पमध्ये सोडले. कुटुंब संपले, त्यामुळे सद्दाम भावांसोबत छावणीत राहिला. येथून त्याचे मामा मुख्तार त्याला सोबत घेऊन गेले. चित्रण: गौतम चक्रवर्ती

एके दिवशी मुख्तार मामा तिथे आले. त्यांनी मला थंडीत बाहेर बसलेले पाहिले. मी कमी कपडे घातलेले होते. तिथून ते मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. मी त्यांच्यासोबत राहू लागलो. अहमदाबादचे रहिवासी मुख्तार मोहम्मद बिल्किसच्या लढाईत प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत होते. बिल्कीस अनेक महिने मुख्तारच्या मामाच्या घरी राहिली. त्यांनी मलाही सोबत घेतले.

बिल्कीसप्रमाणे सद्दामनेही सर्वस्व गमावले, त्याची दखल घेतली गेली नाही

बिल्कीसने दीर्घकाळ लढा दिला. दंगलीत त्यांनी आपली दोन मुले गमावली. एक पोटात, तर दुसरी मुलगी साडेतीन वर्षांची होती. अब्बू, अम्मी, दोन बहिणी, दोन भाऊ. कुटुंबातील इतर सदस्यही या हल्ल्यात बळी पडले. सद्दामची आई अमीना या नात्यात बिल्किसची बहीण होती.

सरकारने बिल्कीसला घर, नोकरी आणि 50 लाखांची घोषणा केली. घर आणि नोकरी अजून मिळाली नाही, पण पैसे मिळाले आहेत. इतर गोध्रा दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई मिळाली, पण सद्दामला काहीच मिळाले नाही. अर्जही केला, पण काहीच परिणाम झाला नाही.

हे मुख्तार मोहम्मद आहेत. अहमदाबादचे रहिवासी असलेले मुख्तार हे बिल्कीसला सुरुवातीपासूनच मदत करत होते. त्यांनी सद्दामलाही पाठिंबा दिला. सद्दाम अजूनही त्यांच्यासोबत व्यवसाय करतो.
हे मुख्तार मोहम्मद आहेत. अहमदाबादचे रहिवासी असलेले मुख्तार हे बिल्कीसला सुरुवातीपासूनच मदत करत होते. त्यांनी सद्दामलाही पाठिंबा दिला. सद्दाम अजूनही त्यांच्यासोबत व्यवसाय करतो.

मुख्तार मोहम्मद सांगतात की, 'दंगलीत सद्दामने त्याची आईही गमावली. सद्दामच्या भावांनी त्याला साथ दिली नाही तेव्हा मी त्याला सोबत घेऊन आलो. बिल्किसच्या खटल्यात सद्दाम साक्षीदार झाला तेव्हा त्याच्या जीवाला असलेला धोका पाहून मी त्याला अहमदाबादला माझ्या आईकडे पाठवले. त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. पण सद्दामला मोठा धक्का बसला होता.

सद्दाम विवाहित असून त्याला 4 वर्षांचा मुलगा आहे. सद्दामने आम्हाला स्वतःचा फोटो काढण्याची परवानगी दिली, पण पत्नीचा फोटो काढण्यापासून रोखले.
सद्दाम विवाहित असून त्याला 4 वर्षांचा मुलगा आहे. सद्दामने आम्हाला स्वतःचा फोटो काढण्याची परवानगी दिली, पण पत्नीचा फोटो काढण्यापासून रोखले.

खूप प्रयत्न करूनही मी त्या मुलाला शिकवू शकलो नाही. तशी त्याची मनस्थिती नव्हती. तो गप्प आणि स्तब्ध होता. इतकं भयंकर दृश्य त्यांनी पाहिलं होतं, जे पाहून मोठ्यांचे हृदय हेलावून जावं, तेव्हा तो 6-7 वर्षांचा लहान मुलगा होता.

सद्दामने मृत्यूच्या भीतीखाली पण चिकाटीने कोर्टाच्या फेऱ्या मारल्या. कदाचित त्या चिमुकल्याची कोणालाच पर्वा नव्हती, ज्याने आपली आई अमिना हिचा मृतदेह जमिनीवर पडलेला पाहिला होता.

अम्मीच्या आठवणीशिवाय कोणतीच खूण नाही, फोटोही नाही.

उदास डोळ्यांनी सद्दाम म्हणतो- 'मी माझ्या अम्मी सोबत गाव सोडले. हल्ल्याची भीती होती, आम्ही रिकाम्या हाताने निघालो. माझ्याकडे माझ्या आईच्या आठवणीची एकही खूण नाही. एक फोटोही नाही.'' जेव्हा मुख्तारने सद्दामची कोणी काळजी घेत नसल्याचे पाहिले तेव्हा त्याने त्यालाही आपल्यासोबत काम करायला घेतले. सद्दाम आता मुख्तारसोबत पादत्राणांचा व्यवसाय करतो.

सद्दाम विवाहित आहे. त्याला 4 वर्षांचा मुलगा आहे. त्यांची पत्नी सांगते, “गेल्या तीन वर्षांत आम्ही तीन घरे बदलली आहेत. स्वतःचे घर असते तर ते कायमस्वरूपी राहू शकले असते. गावाकडे परतणे शक्य नाही. वातावरण चांगले नाही आणि सद्दामला नेहमीच धोका असतो.

बायको गप्प बसते, तेव्हाच सद्दाम म्हणतो - 'तिचा (बायकोचा) फोटो काढू नका, तिचे नाव कुठेही येऊ नये. शक्य असल्यास बातमीत त्यांचा उल्लेख करू नका. यानंतर बराच वेळ खोलीत शांतता पसरली.

(या मालिकेमध्ये वाचा, त्या दिवशी बिल्किसचे काय झाले होते. जंगलातील ग्राउंड रिपोर्ट्स जिथे 6 महिलांवर सामूहिक बलात्कार झाला आणि 13 जणांचा बळी गेला. पोलिस आणि डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार स्वीकारण्यासही नकार दिला.) दिव्य मराठीचे प्रतिनिधी गुन्हेगारांच्या घरी देखील गेले. तिथे काय घडले, हे वाचा तिसऱ्या भागात...)

बातम्या आणखी आहेत...