आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात निवडणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी मी 10 नोव्हेंबरला अहमदाबादला पोहोचलो, तेव्हा 20 दिवसांनी इथे निवडणुका होणार आहेत, असे मला वाटत नव्हते. रस्त्यावर कुठेही झेंडे, बॅनर, नेते दिसत नव्हते. चहाच्या टपरीवरही निवडणुकीची चर्चा झाली नाही. अहमदाबादपासून सुरू झालेल्या या प्रवासात एकूण 7 टप्पे होते. यामध्ये वडनगर, मानसा, पिपलिया, द्वारका, जामनगर, गोध्रा आणि मोरबी यांचा समावेश होता.
पहिला मुक्काम : वडनगर
वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव आहे आणि येथील रिपोर्ट देणे हा आमच्या नियोजनाचा एक भाग होता. मी अहमदाबादहून वडनगरला जात होतो, त्यामुळे आतील मतदार संघात निवडणुकीचे वातावरण असेल असे वाटत होते, पण वडनगरमध्येही असे काही दिसले नाही की, इथे निवडणुका होणार आहेत. मात्र, वडनगरचा सुनियोजित विकास पाहता गावाचा वेगळ्या दृष्टीकोणातून विकास होत असल्याचे निश्चितच दिसत होते.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
दुसरा मुक्काम : मानसा
मानसा हे गृहमंत्री अमित शहा यांचे गाव आहे. मी आधी त्यांच्या जुन्या वाड्यात पोहोचलो. येथे भाजप कार्यकर्ते पप्पू व्यास यांची भेट घेतली. वातावरण इतके शांत का आहे, असे विचारले. निवडणुकीचा गोंगाट का दिसत नाही? पप्पू व्यास म्हणाले - सर्व काही दिल्लीतूनच ठरवले जाते. तिथून मिळणाऱ्या सूचनांनुसार आम्ही काम करत आहोत. उमेदवाराचे नाव अद्याप ठरलेले नाही. प्रचार सुरू होतातच ते निश्चित होईल. (नंतर भाजपने जयंती पटेल यांना येथून उमेदवारी दिली)
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
तिसरा मुक्काम : पिपलिया
त्यानंतर मी आम आदमी पार्टीचा सीएम पदाचा चेहरा इसुदान गढवी यांच्या पिपलिया गावात पोहोचलो. प्रचारासाठी बाहेरगावी गेल्याने इसुदान घरी भेटले नाहीत. मात्र, त्यांची पत्नी आणि कुटुंबीयांशी बोललो. गावात विकासापेक्षा जातीचीच जास्त चर्चा होत असल्याचे समोर आले.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
चौथा मुक्काम : द्वारका
मग मी द्वारकेला आलो. झेंडे आणि बॅनर इथे दिसले. भाजपचे उमेदवार प्रभुबा मानेक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. द्वारकेतील लोकांशी बोलताना निवडणुकीपेक्षा बेट द्वारकेतील अतिक्रमणे पाडण्याबाबत त्यांच्यात चर्चा अधिक होती.
लोकांचे म्हणणे ऐकून मी बेट द्वारकेला पोहोचलो. भगवान श्रीकृष्णाचा महाल बेट द्वारकेतच आहे. असे मानले जाते की त्यांली द्वारकेवर राज्य केले, परंतु बेट द्वारकेत वास्तव्य केले. येथे 80% पेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिमांची आहे.
चौकशी केली असता आम्हाला कळले की, समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर असलेल्या त्या मशिदी आणि कबरी पाडण्यात आल्या आहेत. तथापि, त्याच दिवशी एका RSS नेत्याची भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की, मशीदी आणि कबरी बेकायदेशीर कामांचे अड्डे बनली आहेत. त्यांचा कराचीशी संपर्क आहे. त्यामुळेच ते पाडण्यात आले आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा आणखी अतिक्रमण पाडण्यात येईल.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
पाचवा मुक्काम : जामनगर
द्वारेकनंतर आम्ही जामनगरला पोहोचलो. रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा या येथून भाजपच्या उमेदवार आहेत. रिवाबा घरोघरी प्रचारात व्यस्त दिसल्या. शहरातील भाजप कार्यालयातही कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. भाजप कार्यालयात जशी गर्दी होती, तशीच स्थिती काँग्रेस कार्यालयातही होती. येथे भेट देताना थोडेसे निवडणुकीचे वातावरण जाणवले. मग मी गोध्र्याला निघालो.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
सहावा मुक्काम : गोध्रा
गोध्रा येथे ज्येष्ठ नागरिक मोहम्मद भेटले. मी विचारले, यावेळच्या निवडणुकीत काय होणार… तर ते म्हणाले कोणती निवडणूक. इथे 5 तारखेला मतदान आहे, हेही सर्वांना माहीत असेलच असे नाही. मी विचारले, असे का? तर म्हणाले, त्याने काय बदल होणार आहे. सर्व नेहमीप्रमाणेच तर राहते. ते जसे चालले आहे तसेच चालू राहील. समस्या कायम आहेत.
भाजपचे उमेदवार सीके राउलजी यांच्या घरी गेलो असता त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट झाली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसोबत ते निवडणुकीची रणनीती आखत होते. मी काँग्रेस कार्यालयात गेलो तेव्हा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजितसिंह भाटी एकटेच बसलेले होते.
मी म्हणालो, काँग्रेस निवडणूक लढताना का दिसत नाही, तर ते म्हणाले, तसे नाही. आत सर्व काही चालू आहे. यावेळी आम्ही घरोघरी प्रचार करत आहोत आणि फक्त त्या भागांवर लक्ष केंद्रित करत आहोत जिथे आम्ही जिंकू शकतो. गोध्रा नंतर माझे शेवटचे ठिकाण मोरबी होते.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
सातवा मुक्काम : मोरबी
मला मोरबीला जावे लागले कारण तिथे मोठा अपघात झाला होता. रात्री मोरबीतील भाजप आणि काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचलो तेव्हा कार्यकर्त्यांची जत्राच भासत होती. चहा-पाणी, नाश्ता चालूच होता. निवडणुकीच्या गप्पागोष्टी होत होत्या. दोन्ही ठिकाणी फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख नव्हता, ती म्हणजे मोरबीची घटना. बरं, मी तो तुटलेला पूलही पाहिला, अधिकार्यांना भेटलो, पीडितांशी बोललो आणि जे काही बाहेर आले ते जसेच्या तसे तुमच्यासमोर ठेवले.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
अशी निवडणूक प्रथमच
संपूर्ण ग्राउंड रिपोर्टिंगनंतर मी गुजरातचे ज्येष्ठ पत्रकार आरके मिश्रा यांच्याशी बोललो. ते म्हणाले- 'आम्ही गुजरातमध्ये पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहत आहेत. याचे एक कारण सत्ताविरोधी जनतेचे मत हे आहे. दुसरे म्हणजे लोकांनी निवडणुकीत रस घेऊ नये. भाजपने काँग्रेसवाल्यांना तिकिटे वाटली, त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेच मैदानात उतरत नव्हते.
मतदानाच्या 8 दिवस अगोदर संघाला राजी केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते मैदानात दिसले. भाजपप्रमाणे प्रचारासाठी काँग्रेसकडे पुरेसे साधन नाही. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची रणनीती बदलली. आम आदमी पक्षाची येथे संघटना नाही. ते एका क्षेत्रापुरते मर्यादित होते. आता 'आप'ने कोणाचे किती नुकसान केले आहे, हे निकाल आल्यानंतरच कळेल, बाकी सर्व केवळ नुसत्या शक्यता आहेत.
मात्र, काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरलीहीच नाही. गांधी कुटुंब प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्याचा थेट फायदा 'आप'ला होऊ शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.