आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टगुजरातेतील उना पुन्हा चर्चेत:जामिनावर सुटताच आरोपींकडून धमक्या, मृत गायीचे कातडे काढण्यावरून झाला होता वाद

लेखक: अक्षय वाजपेयी आणि किशन बमभानिया6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

11 जुलै 2016 रोजी उना येथील मोटा समाधियाला गावात मृत गायीचे कातडे काढणाऱ्या सात दलितांना गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या काही लोकांनी जबर मारहाण केली. त्यांना वाहनाच्या मागील बाजूला बांधून रस्त्यावरून ओढत पोलिस ठाण्यात नेले. तिथे जमावाने मारहाण केली, व्हिडिओ व्हायरल झाला, आंदोलन झाले, मोठ-मोठे नेते गावात आले आणि 43 आरोपी तुरुंगात गेले. 35 आरोपी जामिनावर बाहेर आले आणि यानंतर 25 एप्रिल 2018 रोजी संध्याकाळी पुन्हा 2 पीडितांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पुन्हा कारागृहात पाठवले.

25 जुलै 2022 रोजी गुजरात उच्च न्यायालयाने 4 आरोपींना जामीन दिला. त्यानंतर दोन आरोपी पीडितांकडे गेले. केस मागे घेण्याच्या धमक्या आणि जातीवाचक शिवीगाळ केली. पीडितांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना 14 नोव्हेंबर रोजी पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

हे असे चक्र आहे, ज्यात गुजरातमध्ये दलित सतत चिरडले जात आहेत, मारहाण केली जात आहे आणि धमक्या दिल्या जात आहेत. वारंवार मारहाण होत असलेले कुटुंबाला पोलिस संरक्षणात जगावे लागत आहे. गुजरात पोलिसांचे 4 कर्मचारी 24 तास 7 दिवस त्यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. मात्र, आता यापैकी 2 जणांना निवडणुकीच्या ड्युटीवर पाठवण्यात आले आहे.

धर्म बदलला, चामड्याचे काम बंद केले, मात्र जुलै 2016 वारंवार परततो

मोटा समाधीयाल येथे पोहोचताच आम्ही आधी पीडित कुटुंबाच्या घरी जातो. येथे मला वश्राम सरवैय्या भेटले. वश्राम, त्यांचे भाऊ रमेश आणि चुलत भाऊ बेचर आणि अशोक सरवैय्या यांना कथित गोरक्षकांनी भर रस्त्यात विवस्त्र करून निर्दयीपणे मारहाण केली. हे कुटुंब गावाजवळच मृत पडलेल्या गायीचे कातडे काढून विकण्याचे काम करायचे.

केवळ मारहाणीने हल्लेखोरांचे मन भरले नाही. त्यांनी या लोकांना गाडीच्या मागच्या बाजूला बांधून ओढतच उना येथील पोलीस ठाण्यात नेले. उनामध्ये जमाव जमला आणि सुमारे 45 लोकांनी त्यांना मारहाण केली. त्या दिवसाची आठवण सांगताना वश्राम आजही घाबरलेले दिसतात.

वश्राम सांगतात- आम्ही गाईचे कातडे काढण्याचे काम बंद केले आहे. पूर्वी आम्हाला वाटायचे की हे आमचे काम आहे, पण आता कळाले की, ते आमचे काम नाही. आता आम्ही आमच्या मुलांना हे करायला लावणार नाही, तर त्यांना शिक्षण देऊ.

2016 मध्ये हे सर्व घडले तेव्हा राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल घरी आले होते. सर्वांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. आनंदीबेन म्हणाल्या होत्या की मी महिनाभरानंतर पुन्हा येईन आणि मदत मिळाली की नाही ते बघेन, पण आम्हाला फक्त आश्वासने मिळाली.

गुजरात सरकारने म्हटले होते की, जमीन आणि रोजगार दिला जाईल. पण तेही मिळाले नाही. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आम्हाला प्रत्येकी तीन लाख रुपयेच मिळाले आहेत. ते धनादेश घटनेनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच मिळाले. तेव्हापासून कोणीही मदत केली नाही आणि वळूनही पाहिले नाही.

बौद्ध धर्म स्वीकारला, होळी-दिवाळी साजरी करणे बंद केले

वश्राम यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्म सोडून 2018 मध्येच बौद्ध धर्म स्वीकारला. उनामध्ये सुमारे 300 लोकांनी हिंदू धर्म सोडला. वश्राम म्हणतात- गेल्या 6 वर्षांपासून आम्ही होळी-दिवाळी साजरी करणे बंद केले आहे. आता आम्ही दोनच सण साजरे करतो. पहिला 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि दुसरा बुद्ध पौर्णिमा.

वश्राम सांगतात- त्या घटनेनंतर परिसरातील दलित तरुणांनी डॉ.बी.आर.आंबेडकर ग्रुपची स्थापना केली आहे. गावाच्या मधोमध एक अंगणवाडी आहे, त्याच्या समोर सरकारी जागा रिकामी आहे. तिथे बाबासाहेबांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी आंबेडकर भवन बांधण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक आमदारांशी बोलणी झाली असून, लवकरच ते याची परवानगी मिळवून देतील.

आता गावात मेलेल्या जनावरांना विचारणारे कुणी नाही

वश्राम सरवैय्या यांच्यासोबत आम्ही ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यावर मला दिसले की मेलेल्या गाई-म्हशी पडलेल्या होत्या. दुर्गंधी इतकी तीव्र होती की तिथे क्षणभरही थांबणे कठीण होते. वश्राम यांनी सांगितले की, आता गावकरी मेलेली जनावरे तशीच फेकून देतात. जमिनीत गाडण्याचे काम कोणी करत नाही. त्यासाठी जेसीबी मागवावा लागतो आणि मोठा खर्च करावा लागतो.

पूर्वी सुद्धा लोक प्राणी असेच फेकायचे. आम्ही कातडे काढायचे आणि बाकीचा भाग पुरायचो. चामडे विकून आमचा उदरनिर्वाह चालायचा. आम्ही हे काम पूर्णपणे बंद केले आहे. आता या प्राण्यांचे मांस वन्य प्राणी थोडे थोडे खात आहेत. रात्री वाघही येतो.

गावात आता मृत जनावरांना उघड्यावरच फेकून देता. यातून सतत दुर्गंधी येते आणि आजार पसरण्याची भीती असते.
गावात आता मृत जनावरांना उघड्यावरच फेकून देता. यातून सतत दुर्गंधी येते आणि आजार पसरण्याची भीती असते.

भेदभाव कमी झाला, आता बरोबरीत बसवले जाते

वश्रामसोबतच, रमेश आणि अशोक भेटतात. ते म्हणतात की 2016 च्या घटनेनंतर गावातील दलित कुटुंबांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. आता गावात त्यांच्याविरुद्धचा जातीभेद मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आम्हालाही गावात बरोबरीने बसवले जाते. ज्या ग्लासात सवर्ण लोक पाणी पितात, ते आता आम्हालाही त्यातच पाणी द्यायला लागले आहेत. पूर्वी ते आम्हाला दुसऱ्या ग्लासात द्यायचे आणि स्वतः दुसऱ्या ग्लासात प्यायचे.

वश्राम यांचे म्हणणे आहे की दलितांना मारहाणीच्या घटनेनंतर गावात खूप बदल झाला आहे. आता त्यांच्यासोबत भेदभाव केला जात नाही.
वश्राम यांचे म्हणणे आहे की दलितांना मारहाणीच्या घटनेनंतर गावात खूप बदल झाला आहे. आता त्यांच्यासोबत भेदभाव केला जात नाही.

घटना घडलेल्या मोटा समाधीयाल गावात आणि उनामध्येही यावेळी निवडणुकीत दलित अत्याचार हा मोठा मुद्दा नाही. 2016 मध्ये गुजरातमध्ये पटेल आंदोलनाव्यतिरिक्त दलित अत्याचार हा एक मोठा मुद्दा होता. याने भाजपचे मोठे नुकसान झाले आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष 100 पेक्षा कमी जागांवर घसरला आणि काँग्रेस 77 जागांवर पोहोचली.

25 जुलै रोजी जामीन, धमकीचे दोन आरोपी 14 नोव्हेंबरला पुन्हा तुरुंगात गेले

गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निखिल करिएल यांनी 25 जुलै रोजी या प्रकरणातील चार मुख्य आरोपींना जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने त्यांना गीर सोमनाथ जिल्ह्यात प्रवेशबंदी केली होती. आरोपी रमेश जाधव, प्रमोद गिरी गोस्वामी, बळवंत गिरी गोस्वामी आणि राकेश जोशी हे केवळ सुनावणीसाठी जिल्ह्यात जाऊ शकत होते.

मात्र, वश्राम सरवैय्या आणि त्यांचे वडील बाळूभाई सरवैय्या यांनी उना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे की, जामीनावर बाहेर आलेले दोन आरोपी प्रमोद गिरी गोस्वामी, बळवंत गोस्वामी आणि एका अज्ञात व्यक्तीने त्यांना धमकी दिली आहे.

आरोपानुसार, त्यांना आणि त्यांचा चुलत भाऊ अशोक यांना प्रमोद आणि बळवंत यांनी उना येथे थांबवले. आरोपीने जातिवाचक शिवीगाळ करत 'तुला याआधी कशी मारहाण केली होती ते आठव' असे धमकावले. दोन्ही आरोपींची 14 नोव्हेंबर रोजी पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आरोपीचे भावोजी म्हणाले- कोणालाही धमकी दिली नाही, एफआयआर खोटा आहे

दुसरीकडे, जामीनावर बाहेर आल्यानंतर कोणीही धमकी दिली नसल्याचा आरोप प्रमोद गिरी यांचे भावोजी मुन्ना गिरी यांनी केला आहे. वश्राम सरवैया यांनी खोटा एफआयआर दाखल केला आहे. गाईची घटना घडली आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा गोमांस ताजे होते. यावरूनच वाद होऊन जमावाने त्यांना मारहाण केल्याचा दावाही त्यांनी केला.

विशेष म्हणजे ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी 29 एप्रिल 2018 रोजी होणार्‍या धर्मांतराच्या कार्यक्रमापूर्वी 25 एप्रिल रोजी संध्याकाळी रमेश सरवैय्या आणि अशोक सरवैय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाला होता. हल्लेखोर हा उना प्रकरणातील जामीनावर बाहेर आलेल्या आरोपींपैकी एक होता.

बालूभाई सरवैय्या हे कुटुंबासह उनाहून गावी परतत असताना रमेश आणि अशोक यांच्यावर किरण सिंग दरबारने हल्ला केला. त्यानंतरही आरोपींचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

मात्र, पीडित सरवैय्या कुटुंब कधीही शांततेत राहू शकले नाही. खटला मागे घेण्यासाठी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. उना खटल्यात 350 साक्षीदार असून अजूनही स्थानिक न्यायालयात साक्ष सुरू आहे.

10 वर्षांची कमाल शिक्षा, आधीच 6 वर्षे घालवली आहेत

जुलै 2022 मध्ये, उना प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करताना, न्यायालयाने सांगितले की या सर्वांनी 6 वर्षे तुरुंगात काढली आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कमाल 5 वर्षांच्या शिक्षेच्या तरतुदीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.

याशिवाय खुनाचा प्रयत्न आणि दरोड्यासाठीच्या IPC अंतर्गत कमाल 10 वर्षांची शिक्षा आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणातही या लोकांनी निम्म्याहून अधिक शिक्षा भोगली आहेत. मात्र, कारागृहातून बाहेर येताच आरोपी पुन्हा पीडित कुटुंबीयांना उघडपणे धमकावत असल्याचे प्रकार धक्कादायक आहेत.

उना हा काँग्रेसचा बालेकिल्ला, कमळ एकदाच फुलले

समुद्रकिनारी वसलेली उना विधानसभा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 1962 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून 2017 पर्यंत येथे एकदाच कमळ फुलले आहे. 2007 मध्ये भाजपचे उमेदवार कालूभाई येथे विजयी झाले होते. काँग्रेसचे पुंजाभाई येथून 6 वेळा निवडणूक जिंकले आहेत. यावेळीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.

मात्र, येथे फिरल्यावर कळते की येथे फारसा विकास होऊ शकला नाही. अनेक गावांमध्ये रस्ते, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. भाजपने यावेळीही कालूभाई राठोड यांना उमेदवारी दिली आहे. 2007 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या पुंजाभाई यांचा पराभव केला होता. आता दोघेही पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...