आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरइम्रान यांच्या दोन मागण्या-निवडणूक आणि सैन्यावर अंकुश:हल्ल्याप्रकरणी तिघांवर संशय; सैन्य रॅलीविरोधात

लेखक: अभिषेक पाण्डेयएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'देशात एका क्रांतीचा जन्म होत असल्याचे मी सहा महिन्यांपासून पाहतोय. प्रश्न एवढाच आहे की ती मतपेटीतून सहज घडेल की रक्तपाताच्या माध्यमातून विनाशकारी होईल?'

इम्रान खान यांच्या 31 ऑक्टोबरच्या वक्तव्यानंतर तीन दिवसांनी त्यांच्या लाँग मार्चवर हल्ला झाला. इम्रान यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी या रॅलीत एका महिला पत्रकाराचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया की, अखेर पाकिस्तानचे माजी पंतप्रधआन असे काय करत आहेत, की ज्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि या पूर्ण गदारोळात पाकिस्तानी सैन्य कोणत्या बाजूने उभे आहे?

इम्रानने तीन जणांवर केला त्यांच्यावर हल्ल्याच्या कटाचा आरोप

इम्रान खान यांनी गुरुवारी (3 नोव्हेंबर) त्यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर या प्रकरणी तीन जणांना जबाबदार धरले आहे. इम्रान यांच्या वतीने, त्यांचा पक्ष पीटीआयचे नेते असद उमर आणि मिलन अस्मल इक्बाल यांनी एक निवेदन जारी केले की, इम्रान यांचा असा विश्वास आहे की हा हल्ला तीन लोकांमुळे झाला आहे. हे लोक आहेत शाहबाज शरीफ (पंतप्रधान), राणा सनाउल्ला (आंतरिक मंत्री) आणि मेजर जनरल फैसल (ISI).' इम्रान यांनी लाहोर ते इस्लामाबाद लाँग मार्च सुरू केल्यापासून शाहबाज शरीफ आणि लष्कर या दोघांच्याही टीकेचे लक्ष्य बनले आहे.

इम्रान यांनी लाहोरमधून केली हकीकी आझादी मार्चला सुरुवात

28 ऑक्टोबर रोजी, इम्रान यांनी पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोर येथून देशाची राजधानी इस्लामाबादकडे विशाल मोर्चा काढला आहे. शाहबाज शरीफ सरकार उलथवून लवकरच नव्याने निवडणुका घेणे हा या मोर्चाचा उद्देश आहे. हकीकी आझादी मार्च-२ असे या मोर्चाचे नाव असून या मोर्चाद्वारे इम्रान खान पाकिस्तानींना रियासते-मदीना किंवा 'खरे स्वातंत्र्य' मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत. ही रॅली 4 नोव्हेंबरला इस्लामाबादला पोहोचणार होती, मात्र संथ गतीने सुरू असलेली रॅली आता 10 नोव्हेंबरला इस्लामाबादला पोहोचेल, असे मानले जात आहे.

लाहोर ते इस्लामाबाद लाँग मार्चमध्ये समर्थकांचे अभिवादन स्वीकारताना इम्रान खान.
लाहोर ते इस्लामाबाद लाँग मार्चमध्ये समर्थकांचे अभिवादन स्वीकारताना इम्रान खान.

इम्रान यांच्या दोन मागण्या- निवडणूक आणि लष्करावर अंकुश

इम्रान आपल्या दोन प्रमुख मागण्यांवर ठाम आहे. पहिली आहे पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका घ्याव्यात आणि नव्या सरकारला हे अधिकार द्यावेत की सरकारचे प्रमुख ठरवतील की लष्कराचा प्रमुख कोण असेल. वास्तविक, इम्रान यांना खात्री आहे की ते पाकिस्तानातील नव्या सरकारचे प्रमुख म्हणजेच पंतप्रधान होतील.

सध्याचे लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपत आहे. इम्रान यांना त्यांचे जवळचे मित्र आणि बहावलपूर कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल फैज हमीद पुढचे लष्करप्रमुख हवे होते. पण इम्रान यांच्यासाठी अडचण अशी आहे की हमीद पुढच्या वर्षी 30 एप्रिलला निवृत्त होत आहेत.

त्यामुळे सरकारला पंगू बनवण्याच्या आणि पाडण्याच्या प्रयत्नात आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकांच्या पाठबळाचा आधार घ्यावा लागला. शक्तिप्रदर्शनाद्वारे राजकारण्यांना सत्तेवरून उलथवून टाकण्याचा खेळ पाकिस्तानच्या राजकारणात नवीन नाही. लष्कराने यापूर्वी अनेकदा असे केले आहे.

एकेकाळी इम्रान हे लष्कराची पसंती होती, आता एक वर्ग त्यांच्यावर नाराज

2018 मध्ये इम्रान खान यांना पाकिस्तानचे पंतप्रधान बनवण्यात पाकिस्तानी लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र काही दिवसांनी इम्रान आणि लष्कर यांच्यातील दरी रुंदावत गेली. एप्रिल 2022 मध्ये जेव्हा इम्रान यांना पायउतार व्हावे लागले तेव्हा लष्करही इम्रान यांच्या विरोधात उभे होते असे मानले गेले. सत्ता गमावल्यानंतर इम्रान उघडपणे लष्कराच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

लष्करप्रमुख मीर जावेद बाजवा यांना जाहीरपणे लक्ष्य केल्याने लष्कर इम्रान यांच्यावर नाराज आहे. इम्रान यांनी बाजवा यांना देशद्रोही, मीर जाफर आणि मीर सादिक असे म्हटले होते. मीर जाफर आणि मीर सादिक हे भारतीय इतिहासात आपल्या मालकांना फसवल्याबद्दल ओळखले जातात. मीर जाफरने सिराज-उद-दौलाचा विश्वासघात करून इंग्रजांना साथ दिली, तर मीर सादिकने टिपू सुलतानसोबतही असेच केले होते.

इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयशी जोडलेल्या सोशल मीडिया खात्यांवरून लष्करावर सातत्याने होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर स्वतःहून पुढे आले आहे, जे सहसा अशा प्रकरणांवर टिप्पण्या टाळतात. 27 ऑक्टोबर रोजी लष्कराने पत्रकार परिषदेत इम्रान यांच्यावर टीका केली होती. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (ISI) महासंचालक लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांनी इम्रान यांच्यावर असंवैधानिक मागण्या केल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले की, लष्कराने शाहबाज सरकारला हटवून वेळेपूर्वी निवडणुका जाहीर कराव्यात अशी इम्रान यांची इच्छा आहे.

27 ऑक्टोबर रोजीच्या पत्रकार परिषदेत आयएसआय प्रमुख नदीम अंजुम आणि आयएसआयचे पीआर डायरेक्टर ले.जनरल बाबर इफ्तिरखार यांनी इम्रान यांच्यावर कठोर टीका केली.
27 ऑक्टोबर रोजीच्या पत्रकार परिषदेत आयएसआय प्रमुख नदीम अंजुम आणि आयएसआयचे पीआर डायरेक्टर ले.जनरल बाबर इफ्तिरखार यांनी इम्रान यांच्यावर कठोर टीका केली.

'इम्रान प्रोजेक्ट' गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे ISIने स्पष्ट केले. लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वाशी इम्रान खान यांच्या गुप्त चर्चेबाबतच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त करत जनरल नदीम अंजुम म्हणाले की, एकीकडे इम्रान यांना वाटते की, लष्कराने सत्ता मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करावी आणि दुसरीकडे ते जनरल बाजवा यांना जाहीरपणे लक्ष्य करत आहेत.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. इम्रान यांनी हे टार्गेट किलिंग असल्याचे सांगत याचा आरोप लष्करावर लावला होता. पाकिस्तानी लष्कराने इम्रानचे हे आरोपही फेटाळून लावले होते.

पाकिस्तानी लष्कर इम्रानवर नाराज असूनही, लष्करात असाही एक वर्ग आहे, जो इम्रानला पाठिंबा देतो असे मानले जाते.

पाक लष्कराला इम्रानच्या रॅलीला परवानगी द्यायची नव्हती

ISIचे DG नदीम अंजुम यांनी इम्रान आणि त्यांच्या समर्थकांना त्यांच्या लाँग मार्चबद्दल इशारा देताना म्हटले होते की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर शाहबाज सरकारला मदत करेल. विशेष म्हणजे 28 ऑक्टोबरला निघालेल्या त्यांच्या विशाल मोर्चाच्या एक दिवस आधी हा इशारा देण्यात आला होता. तत्पूर्वी, शाहबाज सरकार आणि लष्कर यांच्यातील गुप्त चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही आणि इम्रान यांना रॅली काढण्यापासून रोखता आले नाही.

जाणकारांचे म्हणणे आहे की, देशाच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणांवर प्रत्यक्षात लष्कराचेच नियंत्रण आहे, हे सर्वसामान्यांना पटवून देण्यात अपयशी ठरल्यानेच लष्कर इम्रान यांच्या टीकेमुळे चिंतीत आहे.

इम्रान तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात त्यांनी लष्कराविरोधात केलेल्या आवाहनांचा तरुणांवर सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले तरुण सैन्याच्या विरोधात जोरदार मेसेज शेअर करत आहेत. 'ये जो दहशतगर्दी है, उसके पीछे वर्दी है' अशा घोषणा तरुण वर्ग लष्कराविरोधात देत आहे.

इम्रान खान यांच्या आक्रमक भूमिकेमुळे केवळ शाहबाज शरीफच नव्हे तर पाकिस्तानी सैन्यासाठीही अडचणी निर्माण केल्या आहेत.
इम्रान खान यांच्या आक्रमक भूमिकेमुळे केवळ शाहबाज शरीफच नव्हे तर पाकिस्तानी सैन्यासाठीही अडचणी निर्माण केल्या आहेत.

सत्ता गमावूनही इम्रान खान लोकप्रिय का आहेत?

जाणकारांचे असे मानणे आहे की, भलेही पदावर असताना इम्रान खान आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरले होते, पण यावर्षी एप्रिलमध्ये सत्ता गमावल्यानंतर जेव्हा त्यांनी यामागे अमेरिकेचे षडयंत्र असल्याचा आरोप केला, तेव्हा त्यांची लोकप्रियता वाढली. पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे जनता सध्याच्या सरकारच्या विरोधात आणि इम्रान यांच्या सोबत गेली आहे.

इम्रान यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा पुरावा म्हणजे ऑक्टोबरमध्ये झालेल्या पोटनिवडणुका. ज्यामध्ये इम्रानच्या पीटीआयने नॅशनल असेंब्लीच्या 8 पैकी 6 जागा जिंकल्या. हे निकाल सत्ताधारी मुस्लीम लीग नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या युती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जुलैच्या सुरुवातीला, इम्रान यांच्या पीटीआयने पंजाबमधील 20 पैकी 15 जागा जिंकून प्रांतात पुन्हा सत्तेत वापसी केली. लोकसंख्या आणि राजकीय वर्चस्व या दोन्ही बाबतीत पंजाब हा पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाचा प्रांत मानला जातो.

इम्रान पाकिस्तानमध्ये विशेषतः तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. राजकीय व्यक्तिऐवजी एक महान क्रिकेटपटू अशी त्यांची प्रतिमा आहे, ज्याने 1992 मध्ये पाकिस्तानला त्यांचा एकमेव विश्वचषक जिंकून दिला. त्याच वेळी, इम्रान यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. जी पीपीपीच्या भुट्टो-झरदारी आणि शरीफ कुटुंबाच्या अगदी विरुद्ध आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत.

तसेच, इम्रान ज्या पठाण किंवा पश्तून समुदायातून आले आहेत, तो 18% लोकसंख्येसह पाकिस्तानमधील दुसरा सर्वात मोठा समुदाय आहे. पाकिस्तानात पठाणांची लोकसंख्या 3.5 कोटींहून जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...