आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Gurupornima Special | On Gurupornima Day Lord Shiva, Gautama Buddha And Lord Mahavira Became Guru, Also Gave The First Sermon

गुरुपौर्णिमा:आजच्याच दिवशी भगवान शिव, गौतम बुद्ध आणि भगवान महावीर गुरू झाले, पहिला उपदेशही दिला

दिव्य मराठीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरूपेक्षा श्रेष्ठ दुसरा देव नाही, गुरूच्या कृपेपेक्षा मौल्यवान दुसरा लाभ नाही, गुरूपेक्षा मोठे काेणते पद नाही
Advertisement
Advertisement

गुरूपेक्षा श्रेष्ठ दुसरा देव नाही, गुरूच्या कृपेपेक्षा मौल्यवान दुसरा लाभ नाही... गुरूपेक्षा मोठे काेणते पद नाही... जीवनात गुरूचे स्थान सर्वोच्च आहे. म्हणूनच हा संदेश... सर्व गुरूंना वंदन!

सद्गुरू : शिवाने सप्तऋषींना योग शिकवला

भगवान शिव यांना आदिगुरू मानले जाते. १५००० वर्षांच्याही पूर्वी पहिल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी सप्तऋषींना पहिले शिष्य म्हणून निवडले, त्यांना योग-विज्ञानाची शिकवण दिली. पहिल्या उपदेशात त्यांनी सांगितले, तुमच्यात खूप पुढे जाण्याची क्षमता आहे. हे ज्ञान घेऊनच सप्तऋषींनी जगभरात संचार केला. धरतीच्या प्रत्येक आध्यात्मिक प्रक्रियेच्या मुळात शिवाचे ज्ञान आहे.

दलाई लामा : भगवान बुद्धांचा ५ भिक्खूंना धर्माेपदेश

सुमारे २६०० वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी सारनाथमध्ये पाच भिक्खूंना धर्माचा पहिला उपदेश केला. याला “प्रथम धर्मचक्र प्रवर्तन’ म्हणतात. गुरुपौर्णिमेला बौद्ध “संघ दिवस’ म्हटले जाते. गौतम बुद्धांनी उपदेशात चार आर्यसत्यांबद्दल सांगितले होते. ही सत्ये आहेत... दु:ख आहे, दु:खाचे कारण आहे, दु:खाचे निदान आहे, निदानाचा मार्ग निर्वाण आहे.

आचार्य विद्यासागरजी : महावीरांनी ५ यम सांगितले

जैन धर्मात आजचा दिवस त्रिनोक गुहा पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनाच “त्रिनोक गुहा’ म्हणजे प्रथम गुरू मानले गेले आहे. भगवान महावीर यांनी याच दिवशी इंद्रभुती गौतम यांना पहिले शिष्य केले. त्यांनी पहिल्या उपदेशात ५ यम -अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अचौर्य (अस्तेय) आणि ब्रह्मचर्य हे जीवनाचे मार्ग असल्याचे सांगितले.

Advertisement
0