आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Madhya Pradesh Gwalior Samitary Pad Innovation Story; Pad Rag Innovations Startup Story | Sanitary Pad

पॉझिटिव्ह स्टोरीलोक म्हणत- पुरुष असून सॅनिटरी पॅड विकतोस:आज पॅड निर्मिती मशीन आणि पॅड विक्रीतून वर्षाला 2.5 कोटींची उलाढाल

लेखक : नीरज झाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मोहरीची शेती आणि पिवळ्या रंगाच्या चादरी पसरलेले चंबळचे क्षेत्र दिसून येते. एकेकाळी लोक येथे येण्यासाठी घाबरायचे, पण आता हा परिसर आता 'पॅडवाला' मुळे लोकांना माहीत झाला आहे. हेच जाणून घेण्यासाठी मी ग्वाल्हेरपासून 90 किमी अंतरावर असलेल्या भिंडच्या मनेपुरा गावात पोहोचलो. जे गाव चंबळ नदीपासून 2 किमी अंतरावर आहे.

भिंड ते ग्वाल्हेर या गावांना जोडणारा रस्ता या मोहरीच्या शेतातून जातो.
भिंड ते ग्वाल्हेर या गावांना जोडणारा रस्ता या मोहरीच्या शेतातून जातो.

या गावात मोठे युनिट आहे, त्या युनिटच्या भींतीवर मासिक पाळी, स्वच्छता, रक्तस्त्राव, सॅनिटरी पॅडसह स्त्रियांशी संबंधित व मार्गदर्शन करणारे स्लोगन लिहलेले आहेत. पण हे युनिट कोण्या एका महिलेचे नसून एका पुरूषाचे आहे, हे विशेष आहे.

अनुराग बोहरे यांना स्वत:ला 'पॅडवाला' म्हटलेले आवडते. कारण तो सॅनिटरी पॅड्स तसेच सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी लागणारी मशीनची निर्मिती करणारे आहे. ज्या विषयावर स्त्रीया, लोक, समाज उघडपणे बोलू शकत नाही, अशा मुद्द्यावर अनुराग तासनतास बोलतो, कंपनीच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतची त्यांची वाटचाल अनुराग सहज सांगतात.

अनुराग बोहरे हे सॅनिटरी पॅड्स आणि पॅड्स बनविणाऱ्या मशीन कंपनी 'राग इनोव्हेशन्स' चे संस्थापक आहेत. आता ते त्यांचा भाऊ विराग बोहरे यांच्यासोबत पॅड बनवतात आणि विक्री करतात.

अनुराग आम्हाला कंपनीच्या सुरुवातीच्या काळात घेऊन जातात, ते म्हणाले की, विराग आणि मी 2012 मध्ये जयपूरच्या कॉलेज ट्रेड फेअरला गेलो होतो. या ठिकाणी सोलर पॅनल बसविण्याचे आम्ही प्रशिक्षण घेतले. याचवेळी आम्हाला सॅनिटरी पॅड बनविण्याच्या मशीनची माहिती मिळाली.

जेव्हा मी मशीन बघायला गेलो तेव्हा तिथे बसलेली एक महिला म्हणाली की, या मशीनने तयार केलेले पॅड आरामदायी नाही. पंख असलेले सॅनिटरी पॅड चांगले असतात, जे त्यात बनवलेले नसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक निराशा होती, ज्याने आम्हाला हादरवून टाकले.

अनुराग मला त्यांच्या युनिटमध्ये घेऊन जातात आणि पुढची कहाणी सांगतात. की त्या काळात अनेक ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी संघर्ष करित होतो. तेव्हा त्या महिलेशी महिलेशी बोललो तेव्हा कळाले की गावात अजूनही या समस्या आहेत. मासिक पाळीत महिला कपड्याचा वापर करतात. यामध्ये आम्हाला व्यवसायाचा दृष्टीकोन दिसला. आम्ही दोन्ही भाऊ जयपूरहून परतलो आणि दुसऱ्याच दिवसापासून सॅनिटरी पॅड बनवण्याचा विचार करू लागले.

अनुराग काही मशीन्स दाखवतो, ज्यात अनेक भाग असलेले स्टँड आणि सॅनिटरी पॅडच्या आकाराची अॅल्युमिनियम फ्रेम असते. यामध्ये सॅनिटरी पॅडशी संबंधित कच्चा माल टाकल्यानंतर पॅड तयार केले जातात.

अनुराग सांगतात की, मी इंदूरमधून फॅशन डिझायनिंगमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा केला आहे. काही काम मिळत नव्हते म्हणून काही महिन्यांसाठी मुंबईला गेलो. फॅशन-बॉलिवूड इंडस्ट्रीतही नशीब आजमावले, पण काही झाले नाही. तेथून पुन्हा गावी परतलो. तेव्हा लोकांनी तसेच नातेवाईकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. म्हणायचे- शाहरुख खान बनला अन् पुन्हा बनून परत आला. ग्रामस्थांनी तर मला काही कामाचा नाही, नालायक आणि भटकंती करणारा ठरवलं होत. मात्र, विराग अभ्यासात चांगला होता, त्याने भोपाळ येथून बी.टेक आणि नंतर एम.टेकचे शीक्षण घेतले होते.

अनुराग सांगतात की, सॅनिटरी पॅडसाठी मशीन बनवण्याचा प्रयोग सुरू केला. रोज काहीतरी बनवायचे आणि पुन्हा तोडून टाकायचे. सतत प्रयोग केल्यानंतर आम्ही एक मशीन बनवली, ज्याने सॅनिटरी पॅड बनवायला सुरुवात केली.

मग गावोगावी जाऊन महिला, डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांकडून मासिक पाळीच्या काळात महिलांनी वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या प्रकारांची माहिती गोळा केली. त्यात वापरण्यात येणारा कच्चा माल गोळा करणे हेही आव्हानापेक्षा कमी नव्हते.

पुढे चर्चा चालू असताना अनुराग यांनी सॅनिटरी पॅडशी संबंधित गोष्टी व सांगत असताना एक मनोरंजक घटना सांगितली. ते म्हणतात की, सॅनिटरी पॅडच्या मागे एक पातळ कागद चिकटवला जातो. आमचे सर्वतोपरी प्रयत्न करूनही आम्हाला ते बाजारातून मिळाले नाही.

एके दिवशी आम्ही दोघे भाऊ लग्नाला गेलो होतो. वेटर टेबलावर पेपर रोल पसरवत होता. रोलला स्पर्श केल्यावर आम्हाला असे वाटले की, सॅनिटरी पॅडमध्ये असाच काही कागद वापरला जात असावा. त्या कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही पेपर रोल बनवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला आणि त्यानंतर पॅडमध्ये वापरल्या जाणाऱ्या कागद तयार करण्याची ऑर्डर दिली.

अनुराग सांगतात की, सुरुवातीच्या काळात पॅडमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांची बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी, ऑर्डर आणि विक्री करणे शक्य नव्हते. आमच्याकडे फक्त 25 हजार रुपये होते. त्यावेळी विराग देखील शीक्षण घेत होता.

मी सुमारे 8 हजार रुपयांचे मशीन बनवले, कच्चा माल मागवला आणि भोपाळमध्ये पॅड विक्री करायला सुरूवात केली. सुमारे वर्षभराचा खर्च वसूल करणेही अवघड होते. कोणत्याही महिलेला आमच्याकडून पॅड घ्यायचे नव्हते किंवा तिला आमच्याशी बोलायचे देखील नव्हते. कारण आम्ही पुरूष होतो.

तेव्हा आम्हाला लक्षात आले की, सॅनिटरी पॅडची सर्वाधिक गरज ग्रामीण भागात आहे. कारण आजही ग्रामीण महिलांना सॅनिटरी पॅड्स मिळणे अवघड आहे. दरम्यान, भोपाळमध्ये भाडेही द्यावे लागणार होते, म्हणून आम्ही युनिट गावातच शिफ्ट केले.

भावाचीही साथ मिळाली

एकीकडे अनुरागचा धाकटा भाऊ शिवम बोहरा पॅड बनवत आहे, तर दुसरीकडे काही कामगार पॅड बनवण्यासाठी मशीन तयार करत आहेत. अनुराग जेव्हा युनिट दाखवतो तेव्हा त्याच्या डोळ्यात 2014 मधील तो क्षण आठवतो.

अनुराग म्हणाला की, जेव्हा आम्ही युनिट भोपाळहून भिंडला हलवले तेव्हा आम्हाला काळजी वाटली की, महिलांचे आयुष्य बुरख्यात कैद झालेले आहे. अशा ठिकाणी तुमच्याकडून कोण सॅनिटरी पॅड कोण विकत घेणार, पीरियड्सबद्दल कोण बोलणार, कोण मशीन बसवणार.

अनुराग सांगतात की, तो जेव्हा गावी जायचा तेव्हा बायका गुंगट घालून घरात जायच्या. मग आम्ही आमच्यासोबत काही सुशिक्षित महिला आणि पुरुष जोडले. ते वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे, सॅनिटरी पॅड्सची श्रेणी आणि न वापरल्याने होणारे नुकसान याबद्दल त्यांना माहिती देऊ लागलो. त्यानंतर काही लोक समर्थन करू लागले.

अनुराग म्हणाले की, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. भिंडमध्येच एका गावात पॅड विकायला गेलो होतो. आपण पुरुष असूनही स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल बोलतो आणि पॅड विकतो या गोष्टी गावातील लोकांना पचनी पडले नाही.

या मुद्द्यांवर तुम्ही आमच्या सुनेशी बोलाल, असे सांगून लोक आम्हाला गावाबाहेर काढू लागले. हळूहळू जेव्हा आम्ही सतत गावोगावी जाऊ लागलो तेव्हा लोकांना समजले की हे लोक फक्त महिलांचे हिताचेच सांगत आहेत.

खरंतर गावांमध्ये ना मेडिकल स्टोअर, ना इथल्या स्त्रिया या गोष्टींबद्दल जागरूक आहेत. पीरियड्सच्या काळात या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे त्यांना कसे कळणार होते? याचा विचार करणे गरजेचे होते, असे अनुराग म्हणाले.

अनुराग म्हणतो, आमचे उद्दिष्ट फक्त पॅड बनवणे आणि विकणे हे नसून ते बनवण्यासाठी मशीन बनवणे आणि देशभरात बसवणे हा आमचा मुख्य उद्देश होता. जेणेकरून महिलाही ते बनवू शकतील आणि वापरू शकतील.

आम्ही 2015-16 मध्ये कंपनीची नोंदणी केली, हळूहळू ऑर्डर येऊ लागल्या. पण नशीब उघडले जेव्हा आम्हाला राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NDMC) कडून छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करण्याची संधी मिळाली.

आम्ही येथे मोठ्या प्रमाणावर सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी मशीन बसवून महिलांना पॅड्सची ओळख करून दिली. त्याला पॅड बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. आता ते देशभरात सुरू आहे.

अनुराग सांगतात की, एक काळ असा होता की कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, पण जेव्हा त्यांनी एनजीओ आणि अनेक राज्यांच्या सरकारसोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा महिलांनीही कंपनीवर विश्वास ठेवायला सुरुवात केली.

ते म्हणतात, आता असं झालंय की, आम्ही गावोगावी पॅड विकायला जातो, टीम मशीन लावायला जाते तेव्हा लोक आम्हाला नावाने नव्हे तर 'पॅडवाला' म्हणतात. कंपनीची सातत्याने विकास होत आहे. आता आम्ही केनिया, नेपाळ, युरोप सारख्या देशांमध्ये काम करत आहोत. एक काळ असा होता की जेव्हा आम्ही वर्षाला 4 ते 5 लाखांची उलाढाल करू शकत नव्हतो.

तर, 2020 मध्ये या व्यवसायाला चालना मिळाली, जेव्हा विरागची पत्नी पलक आमच्यात सामील झाली. वास्तविक पलक महिला असल्यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला. महिलांशी संबंधित अनेक गोष्टी ज्या आपण गावातील महिलांना समजावून सांगू शकत नाही, ते डोळे मिचकावून सांगतात.

छायाचित्रात विराग बोहरे पत्नी पलकसोबत आहेत. पलक आता अनुरागच्या कंपनीची सह-संस्थापक आहे.

अनुराग सांगतात की, आम्ही व्यवसाय वाढीसाठी राज्यातील शाळा-कॉलेजांशी संपर्क साधू लागलो. यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू लागल्या. मग आम्ही देशभरातील ग्रामीण भागात जाऊन महिलांना सॅनिटरी पॅड्सबद्दल सांगू लागलो.

आमच्याकडे आता दर महिन्याला सुमारे 5 मशिन्सच्या आगाऊ ऑर्डर आहेत. तर दर महिन्याला पॅडची 60-70 हजार पाकिटे विकली जातात. गावातील महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. ब्रँडेड कंपन्यांनी बनवलेले सॅनिटरी पॅड महाग असतात. त्यामुळे महिलाही पॅड वापरत नाहीत.

अनुराग म्हणतात की, मशिन्स बसवण्यासोबतच आम्ही सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी कच्चा मालाचाही पुरवठा करतो. ग्रामीण महिलांना सरकारी निकषांनुसार कमी किमतीत चांगल्या दर्जाचे पॅड मिळत आहेत.

जे पॅड ब्रँडेड कंपन्या बाजारात 8 रुपयांना विकतात, ते आम्ही 3 रुपयांना देतो. कारण एक पॅड बनवण्यासाठी फक्त 1.50 रुपये खर्च येतो. या महिलांसाठी यापेक्षा चांगले काय असू शकते ?

कारण मासिक पाळीच्या वेदना या महिलांनाच माहीत असतात. सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी मशिनमध्ये आधीच वापरलेले पार्ट्स तोडून, ​​कोणते पार्ट वापरले जातात हे जाणून घेतले, मग स्वस्त दरात त्याचे मॉडेल तयार केले.

सॅनिटरी पॅड बनविण्यासाठी मशीनमध्ये आधीच वापरलेले पार्ट्स तोडून, कोणते पार्ट वापरले जातात, हे जाणून घेतले. मग स्वस्त दरात त्याचे मॉडेल तयार केले.

बातम्या आणखी आहेत...