आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Gyanvapi Masjid Vs Shivling Case Updates । Hindu Lawyer Harishankar Jain, Places Of Worship Act | Gyanvapi Case

ज्ञानवापीत मुस्लिमांचा युक्तिवादच हिंदूंची ताकद:हिंदूंचे 110 खटले लढणारे वकील म्हणाले- शिवलिंगाने बदलला खेळ, निकाल अयोध्येसारखा

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानवापी मशिदीला प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट म्हणजेच प्रार्थनास्थळ कायदा लागू होतो, असे मुस्लिम वारंवार सांगत होते. त्यामुळे याप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणीच होऊ नये.

आता शिवलिंग आढळल्यानंतर हीच बाब हिंदूंची बाजू भक्कम करणारी झाली आहे. जर प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट लागू होत असेल आणि जर तिथे शिवलिंग आढळले असेल, तर याचा अर्थ तिथे आधी मंदिर होते आणि नंतर मशीद बांधली गेली. त्यामुळे मशीद पाडली पाहिजे. म्हणून या प्रकरणात अयोध्येप्रमाणेच निकाल लागणार आहे.

33 वर्षांत हिंदूंचे 110 खटले लढणारे वकील हरिशंकर जैन यांनी ही माहिती दिली. ते म्हणतात की, 4 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

1989 पासून फक्त हिंदूंचे खटले लढत आहेत जैन

69 वर्षीय हरिशंकर जैन 1989 पासून केवळ हिंदूंचेच खटले लढत आहेत. तेही कोणतेही शुल्क न घेता. हिंदू पक्षांशी संबंधित असलेल्या लहान-मोठ्या अशा 110 केसेस त्यांनी आतापर्यंत लढल्या आहेत. सध्या चर्चेत आहेत, कारण ज्ञानवापी मशीद प्रकरणात त्यांना हिंदू बाजूने लॉबीमधून काढून टाकण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या होत्या.

हरिशंकर जैन दिव्य मराठीला म्हणाले– मला कोणीही काढू शकत नाही. 5 पैकी 4 क्लायंट माझ्यासोबत आहेत. माझा विश्वासघात करणाऱ्यांनाही मीच नेमले होते. त्यामुळे या अफवांचा विचार करू नका. माझ्याकडे सध्या ज्ञानवापी, कुतुबमिनार, ताजमहाल, मथुरा, टिलेवाली मस्जिद आणि भोजशाळा यासह 7 मोठ्या केसेस आहेत. देशभरातील अनेक ठिकाणांहून दररोज कॉल्स येतात. ज्या ठिकाणी मंदिरे पाडली गेली आहेत आणि त्यासाठी सबळ पुरावे आहेत, मी त्यांच्या बाजूने लढणार आहे. जिथे ठोस पुरावे नाहीत तिथे मी लढाई लढत नाही.

हरिशंकर जैन यांनी दिव्य मराठीशी सर्व गोष्टी शेअर केल्या. यासोबतच त्यांच्याकडे असलेल्या 6 मोठ्या खटल्यांची कायदेशीर स्थितीही सांगितली. वाचा आणि पाहा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

कोणत्या खटल्याची काय आहे कायदेशीर स्थिती?

तळघराच्या मधोमध आदि विश्वेश्वर

खटला : ज्ञानवापी मशीद

स्थिती : हा खटला वाराणसी जिल्हा न्यायालयात सुरू आहे. मुस्लिम पक्षाच्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर खटला चालणार आहे.

सुनावणीची तारीख : 4 जुलै

जैन यांचा दावा : येथे वस्तुस्थिती अगदी स्पष्ट आहे. मंदिर तोडून जबरदस्तीने ताब्यात घेतल्यानंतर त्यावर नमाज अदा करण्यात आली.

तळघराच्या मध्यभागी आदि विश्वेश्वराचे स्थान आहे, जिथे पहिले शिवलिंग स्थापित केले गेले. मशिदीचा खालचा भाग आजही जुन्या मंदिराच्या रचनेवर उभा आहे.

पहिल्या मजल्यावर मंदिराच्या वरच्या बाजूला घुमट ठेवण्यात आला होता. हिंदूंशी संबंधित सर्व प्रतीके तीन घुमटांखाली सापडली आहेत.

व्हिडिओग्राफी झालेली आहे. शिवलिंगाचीही शास्त्रीय तपासणी झाली, तर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे गप्प बसतील.

कुव्वत-उल-इस्लाम म्हणजे इस्लामची ताकद

खटला : कुतुब मिनार

स्थिती : हा खटला दिल्लीच्या साकेत न्यायालयात सुरू आहे. कुतुब मिनार संकुलात पूजा करण्याचा अधिकार मागणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

सुनावणीची तारीख : 24 ऑगस्ट

जैन यांचा दावा : 27 हिंदू-जैन मंदिरे तोडून त्यांच्या अवशेषांमधूनच हे बांधले गेले. त्याला कुव्वत-उल-इस्लाम, म्हणजेच इस्लामची ताकद म्हणतात.

ही मशीद नाही, इस्लामच्या ताकदीचे प्रतीक आहे की, पाहा हिंदूंनो, आम्ही तुमचे मंदिर तोडू शकतो. 27 मंदिरे पाडून बांधली गेल्याचे सबळ पुरावे आहेत.

माँ सरस्वतीचे भोजशाळा मंदिर

खटला : भोजशाळा

स्थिती : इंदूर उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. 11 मे रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. सर्व पक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सुनावणीची तारीख : जुलै-ऑगस्टची तारीख मिळू शकते.

जैन यांचा दावा : 1034 मध्ये राजा भोज यांनी येथे एक भव्य गुरुकुल बांधले होते, जेथे संस्कृत व्याकरण, ज्योतिषशास्त्र शिकवले जात होते. भोजशाळा अलाउद्दीन खिलजीने पाडली होती.

नंतर दिलावर खान घोरीने 1401 मध्ये भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. 1514 मध्ये महमूद शाह खिलजीने उर्वरित भागावरही मशीद बांधली.

नंतर भोजशाळा पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) कडे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी आहे.

2003 पासून हिंदूंना दर मंगळवारी आणि बसंत पंचमीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूजा करण्याची परवानगी आहे आणि मुस्लिमांना शुक्रवारी प्रार्थना करण्याची परवानगी आहे.

हे हिंदूंचे ठिकाण असल्याने आम्ही येथे मुस्लिंच्या नमाजाच्या विरोधात आहोत. या संपूर्ण परिसराचे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्याची मागणीही आम्ही न्यायालयाकडे केली आहे.

जेथे जन्म झाला, त्याच जागेवर मशीद

खटला : मथुरा

स्थिती : हा खटला मथुरा जिल्हा न्यायालयात सुरू आहे. खटला क्रमांक 353 आहे. सर्व पक्षांकडून उत्तर मागविण्यात आले आहे.

सुनावणीची तारीख : 1 जुलै

जैन यांचा दावा : 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि मस्जिद ईदगाह यांच्यात करार झाला होता. यानंतर हिंदूंच्या बाजूने मोठी जमीन मुस्लिमांना देण्यात आली. हा करार पूर्णपणे बोगस आहे.

मशीद पाडावी अशी आमची मागणी आहे, कारण जगाला माहिती आहे की, श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या तुरुंगात झाला होता.

आणि ज्या ठिकाणी मशीद बांधली आहे, तेच खरे जन्मस्थान आहे. आता जिथे मंदिर बांधले आहे, ते खरे ठिकाण नाही. यासाठी आमच्याकडे सर्व तथ्ये आणि पुरावे आहेत.

22 खोल्यांमध्ये लपली सर्व रहस्ये

खटला : ताजमहाल

स्थिती : हा खटला आग्रा दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. असा दावा करण्यात आला आहे की हे तेजोमहालय आहे आणि पूर्वी येथे हिंदू मंदिर होते. त्यामुळे हिंदूंना पुन्हा ताबा मिळावा.

सुनावणीची तारीख : अद्याप ठरलेली नाही

जैन यांचा दावा : हा खटला 2015 पासून प्रलंबित आहे. याबाबत सर्व पक्षकारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून लवकरच सुनावणी होणार आहे.

ते म्हणतात, ताजमहालच्या 22 खोल्यांमध्ये सर्व रहस्ये दडलेली आहेत. ज्या दिवशी या खोल्या उघडल्या जातील आणि पुरातत्त्व सर्वेक्षण होईल, तेव्हा सर्व सत्य बाहेर येईल.

स्वत:च्या खर्चाने लढतो खटले, कमाईच्या 50% यातच खर्च

जैन म्हणतात, हिंदूंच्या हितासाठी मी सर्व खटले स्वखर्चाने लढतो. माझ्या कमाईपैकी 50% हे खटले लढण्यासाठी खर्च होतात.

भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत समाविष्ट केलेल्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांच्या दुरुस्तीच्या वैधतेलाही मी आव्हान दिले आहे.

सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वालाही आव्हान देण्यात आले होते. यासोबतच चुकीच्या पद्धतीने वाटण्यात येणारे हजचे अनुदान बंद करण्याचे आवाहनही करण्यात आले. मोदी सरकार आल्यानंतर हज सबसिडीही बंद झाली आहे.

वडील आणि मुलगा मिळून लढतात केस

हरिशंकर जैन यांचे सुपुत्र विष्णू जैनही 2010 पासून वडिलांसोबत हिंदूंचा खटला लढत आहेत. त्यांची प्रॅक्टिस श्री रामजन्मभूमी खटल्यापासून सुरू झाली. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी खटला पिता-पुत्राच्या जोडीने सांभाळला.

लखनऊमधील टिलेवाली मशिदीच्या ठिकाणी गुहेचा दावाही या पिता-पुत्रांकडून केला जात आहे.

हरिशंकर जैन म्हणतात - आमच्या मागे कोणतीही संस्था नाही आणि आम्ही कोणाकडून देणगी घेत नाही. आम्ही सुरक्षेची मागणीही करत नाही, कारण सुरक्षा हे एक प्रकारे स्टेटस सिम्बॉल आहे, जे मला आवडत नाही.

बातम्या आणखी आहेत...