आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टH3N2 विषाणूचे रुग्ण वाढणार:मास्क घालण्याची सवय लावा, सॅनिटायझर न वापरल्यास थेट रुग्णालयात पोहोचाल

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

उत्तर भारतात H3N2 विषाणूची प्रकरणे नोंदवली जात आहेत. ICMR नुसार, गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

या विषयीचा डाटा पाहिला की लक्ष्यात येते की, 15 डिसेंबरपासून H3N2 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

ICMR ने असेही नोंदवले आहे की गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) ग्रस्त अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये H3N2 विषाणू आढळले आहेत. हा सर्व माहितीचा विषय झाला आहे.

मुद्दा असा आहे की जर तुम्हीही गर्दीत होळी खेळली असेल, तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल, तुम्ही आधीच अस्थमा आणि हृदयाचे रुग्ण आहात, तर आज कामाची गोष्टमध्ये जाणून घ्या की, तुम्हाला H3N2 विषाणूचा धोका आहे. आणि ते कसे टाळावे, त्यावर काय उपाय आहेत...

आजचे तज्ञ डॉ. राजीव गुप्ता, वरिष्ठ सल्लागार, औषधी, सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्ली आणि डॉ. संदीप बुधिरजा, मॅक्स हेल्थकेअर हे आहेत.

प्रश्नः H3N2 विषाणू म्हणजे काय?

उत्तरः H3N2 विषाणू हा इन्फ्लूएंझा व्हायरसचा एक प्रकार आहे ज्याला इन्फ्लूएंझा ए व्हायरस म्हणतात. हा श्वसनसंबंधित विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे दरवर्षी आजार होतात. इन्फ्लुएंझा ए हा विषाणूचा उपप्रकार आहे जो 1968 मध्ये सापडला होता.

प्रश्न: H3N2 विषाणूमुळे ताप किती दिवसांत उतरतो?

उत्तर: इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे मत आहे की, संसर्गाची लक्षणे पाच ते सात दिवस टिकू शकतात. H3N2 मुळे येणारा ताप तीन दिवसात कमी होतो. परंतु खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो.

प्रश्न: काही लक्षणे पाहून तुम्हाला H3N2 इन्फ्लूएंझा आहे हे कळणे शक्य आहे का?

उत्तर: नाही, केवळ लक्षणे पाहून याची पुष्टी होत नाही. तुम्हाला H3N2 किंवा दुसरा आजार आहे की, नाही हे सांगण्यासाठी प्रयोगशाळेत रक्ताचा नमुना आणि इतर चाचण्या केल्या जातात.

प्रश्न - प्रकरण गंभीर झाले आहे आणि रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक आहे हे कधी समजावे?

उत्तर: बहुतेक प्रकरणांमध्ये, इन्फ्लूएंझा वैद्यकीय काळजी आणि ओव्हर-द-काउंटर औषधांनी बरा होऊ शकतो. डोकेदुखी, ताप यावर दुकानदाराकडून औषध खाण्यात काहीही नुकसान नाही. दुसरीकडे, जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स खाल्ले तर धोका जास्त असतो. काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक देखील होऊ शकते. रुग्णाला पाहून त्याची योग्य तपासणी करूनच त्या बाबत सांगता येते.

खालील लक्षणे दिसल्यास रुग्णाला विलंब न करता रुग्णालयात दाखल करा.

 • धाप लागणे
 • ऑक्सिजन पातळी 93 पेक्षा कमी
 • छाती आणि ओटीपोटात वेदना आणि दाब जाणवणे
 • खूप उलट्या होणे
 • रुग्ण गोंधळलेला असतो किंवा भ्रमात असतो
 • रुग्णाची प्रकृती सुधारल्यानंतर, ताप आणि खोकला पुन्हा आल्यास.

खालील लोकांनी सर्दी-खोकला हलक्यात घेऊ नये, H3N2 चा धोका असू शकतो

 • वृद्ध
 • दम्याचे रुग्ण
 • हृदयरोग किंवा संबंधित समस्या
 • मूत्रपिंडाचे रुग्ण
 • गर्भवती स्त्री
 • जे लोक डायलिसिसवर आहेत

प्रश्न: याचा अर्थ कोविडच्या काळात आपण ज्या प्रकारे मास्क घालून जगत होतो, त्याच पद्धतीने मास्क घालण्याची गरज आहे का?

उत्तरः जेव्हा जेव्हा हवामान बदलते तेव्हा इन्फ्लूएंझा होण्याची शक्यता वाढते. आपण सर्वांनी मास्क घालणे बंद केले आहे. गर्दीच्या ठिकाणी निर्भयपणे हिंडताये.

होळीची खरेदीही मास्कशिवाय केली. अशा परिस्थितीत जे लोक आधीच आजारी आहेत किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ते नक्कीच आजारी पडतील. त्यांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. या लोकांनी मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. जे निरोगी आहेत त्यांनीही मास्कशिवाय घराबाहेर पडू नये.

प्रश्न: होळीच्या दिवशी लोकांनी खबरदारी घेतली नाही हे उघड आहे, H3N2 चे रुग्ण किती वाढतील ते सांगा?

उत्तर: तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. लोक सणांमध्ये दुसरीकडे दुर्लक्ष करतात, विशेषत: जेव्हा होळी, दिवाळी असते. भारतीय सांस्कृतिक मूल्यांसमोर रोगाकडे दुर्लक्ष करतात. लोक सोसायटी, क्लब, हॉटेलमध्ये जाऊन होळी खेळतात, पार्ट्या करतात. अशा स्थितीत H3N2 विषाणू पसरतो.

सध्या केसेस वाढत आहेत, त्यामुळे आजपासूनच ही खबरदारी घ्या, कॉमनसेन्स वापरा..

काही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका

 • फ्लू शॉर्ट्स हा अमेरिकेत ट्रेंड आहे. आपल्या देशातही ते उपलब्ध आहे पण माहितीच्या अभावामुळे आपण ते घेत नाही. लगेच घ्या. विशेषत: तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक आणि मुले असतील तर त्यांना द्या.
 • तुम्ही केलेली चूक पुन्हा करू नका, म्हणजेच मास्कशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पार्ट्यांमध्ये जाणे टाळा.

H3N2 व्हायरसपासून वाचण्यासाठी खालील 6 उपाय करा

 • आपले हात नियमितपणे साबणाने धुत राहा.
 • सॅनिटायझर सोबत ठेवा आणि त्याचा वापर करा.
 • आजारी व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा.
 • जर तुम्हाला शिंक येत असेल किंवा खोकला येत असेल तर तुमचे तोंड झाकून ठेवा कारण व्हायरल इन्फेक्शन लवकर पसरते.
 • डोळे आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा.
 • तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्क घाला.

प्रश्न: H3N2 विषाणूवर उपचार काय आहे?

उत्तर:

 • स्वतःला हायड्रेटेड ठेवा, द्रवरुप पदार्थ पिणे सुरू ठेवा.
 • ताप, खोकला किंवा डोकेदुखी असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
 • इन्फ्लूएंझा विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी फ्लूचे शॉट्स घ्या.
 • जेव्हा तुम्हाला ताप, सर्दी, खोकला असेल तेव्हा स्वतः अँटिबायोटिक्स घेऊ नका.
 • घराबाहेर मास्क लावा, गर्दीची ठिकाणे जाणे टाळा.

अखेरीस पण महत्त्वाचे

ICMR नुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये H3N2 विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी 92% रुग्णांना ताप होता, 86% लोकांना खोकला होता, 27% लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होता, 16% लोकांना घरघर होत होती. संस्थेला आपल्या अहवालात असे आढळले की 16% रुग्णांना न्यूमोनिया आणि 6% रुग्णांना फेफरे होते. विषाणूमुळे तीव्र श्वसन संक्रमण झालेल्या सुमारे 10% रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि 7% रुग्णांना ICU काळजीची आवश्यकता असते.

कामाची गोष्ट या मालिकेतील अशाच आणखी बातम्या देखील वाचा...

चेहऱ्यापासून रंगात रंगलेल्या टाइल्सपर्यंत:सोनेरी केसही झाले खराब, हे उपाय करा, रंग काढण्यात कोणतीही अडचण नाही

होळी असेल तर रंग आणि गुलालाची मजा असते. पण ही मजा काही वेळा आपल्यासाठी अडचणी वाढवते. आता हजारो रुपये खर्च करून तुमचे केस हायलाइट केले होते. माझ्या केसांना लावू नका असे ओरडून देखील तुम्हा सर्वांना सांगत होता.

एवढेच ऐकून मित्रांनी केसांनाच त्यांचे लक्ष्य केले. याच प्रमाणे बाहेर सगळे रंग खेळत होते आणि कोणीतरी आत आले आणि सगळा ग्रुप त्याच्या मागे लागला. मग चेहराच काय, केस, फरशी, भिंत सगळे रंगीबेरंगी झाले.

आज कामाची गोष्टमध्ये आम्ही रंगांपासून सुटका करण्याचे काही उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे घरही स्वच्छ राहील आणि होळीच्या रंगात ते खराब होणार नाही. पूर्ण बातमी वाचा..

सावधान! होळीचे रंग पोहोचवेल रुग्णालयात:त्वचेचा कर्करोग, अर्धांगवायूचा धोका; होळी रंगहीन न ठरण्यासाठी करा उपाय

होळी खेळताना थोडीशी चूक तुम्हाला रुग्णालयात दाखल करू शकते. अधिक नफा मिळविण्यासाठी रंग बनवणाऱ्या कंपन्या रंगात भेसळ करत आहेत, हे विसरू नका. यामुळे आपल्या त्वचेवर आणि डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.

सिंथेटिक रंग अजिबात वापरायचा नाही. जर कोणी जबरदस्तीने तुमच्यावर खोटा किंवा बनावटी रंग लावत असेल तर तुम्हाला त्याचा स्पष्ट विरोध करावा लागेल.

कामाची गोष्ट मध्ये आम्ही तुम्हाला होळी खेळताना रासायनिक रंगांपासून कसे वाचवायचे ते सांगत आहोत. पण लक्षात ठेवा, प्रकरण गंभीर वाटत असले तरी लगेच डॉक्टरकडे जा. पूर्ण बातमी वाचा...