आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र सवयींमुळेही दूर होतो तणाव:आपल्या सवयी ओळखणे आणि समजून घेणे गरजेचे का? जाणून घ्या...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सवय आणि वर्तणुकीचा तुमच्या आरोग्यावर खोल परिणाम होतो. आपल्या सवयींविषयी जाणून घेणे आणि त्याच्या मागील विज्ञान समजून घेणे खूप गरजेचे आहे. सवयी आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्याचे एक महत्वाचे माध्यम असते. सवयी सुधारण्यासाठी हे केले जाऊ शकते -

सर्वात आधी आपल्या सवयींकडे लक्ष द्या. नंतर ठरवा की काय बदलता येईल. नकारात्मक सवयी बदलणे आणि सकारात्मक सवयी लावण्याचा प्रयत्न करा.

मात्र हेही जाणून घ्या की, प्रत्येक विचित्र सवय वाईट नसते. काही विचित्र सवयी प्रमाणात ठेवल्या, तर आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी त्या फायदेशीर ठरू शकतात. विचित्र सवयींमुळे तुमचा तणावही मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकतो. विचित्र सवयी असणे सामान्य आहे. मात्र जर यामुळे तुमची झोप खराब होत असेल किंवा दैनंदिन कामात अडचण येत असेल तर नक्कीच काहितरी केले पाहिजे.

जगातील सर्वात मोठी संस्था चालवणे सोपे काम नाही. टॉप लीडर्ससमोर नेहमी कोणती ना कोणती तरी समस्या असतेच. अशात ते सहज ते स्वतःला विसरू शकतात. काही लीडर्स अनावधानाने काही विचित्र सवयी लावून घेतात. लीडर्सच्या त्या सवयींविषयी जाणून घेणेही तुम्हाला प्रेरित करू शकते.

1. जेफ बेझोस, अमेझॉन - प्रत्येक वेळी एखाद्या मीटिंगच्या सुरुवातीला जेफ बेझोस आणि त्यांची टीम टेबलवर अतिशय शांत बसतात आणि सुमारे 6 पानांचा मेमो वाचतात. नव्या कर्मचाऱ्यांना असे करायला थोडे विचित्र वाटते. कारण ऑफिसमध्ये अशा प्रकारचा प्रसंग सहसा बघायला मिळत नाही.

2. मार्क झुकरबर्ग, फेसबूक - झुकरबर्ग दरवर्षी स्वतःला नवे आव्हान देतात. जसे, 2009 मध्ये त्यांनी ठरवले होते की ते त्या वर्षी दररोज टाय घालून ऑफिसला जातील. पुढच्या वर्षी त्यांनी ठरवले की, दर दोन आठवड्यांनंतर ते एक नवे पुस्तक वाचतील.

3. बिल गेटस्, मायक्रोसॉफ्ट - कोणत्याही व्यावसायिक बैठकीत बिल गेटस् त्यांचा उत्साह लपवू शकत नाही आणि सातत्याने खुर्ची हलवत सतात. हे बघायला थोडे विचित्र वाटते. मात्र तिथे उपस्थित लोकांना हे त्यांच्या उत्साहाचे प्रतिबिंब वाटते.

4. रिचर्ड ब्रॅन्सन, व्हर्जिन ग्रुप - ब्रॅन्सन त्यांच्या सर्जनशीलतेचे इंजिन प्रवासादरम्यान सुरू करतात. ते खूप प्रवास करतात आणि यादरम्यानच त्यांना सर्वोत्कृष्ट कल्पना सुचतात. मात्र जर ते प्रवास करत नसतील तर चालताना आणि व्यायाम करतानाही त्यांना सर्वोत्कृष्ट कल्पना सुचतात.

5. स्टिव्ह जॉब्स, अॅप्पल - स्टिव्ह जॉब्स सहसा एका वेळी एकाच प्रकारचे जेवण घ्यायचे. ते आठवडाभर एक प्रकारचेच जेवण करायचे. असे म्हटले जाते की एकदा त्यांनी एक आठवडाभर सतत गाजरच खाल्ल्यावर ते खूप जास्त लाल दिसायला लागले होते.

बातम्या आणखी आहेत...