आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनर:कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना अचानक ऑक्सिजनची पातळी 50 वर येते; जाणून घ्या काय आहे 'हॅपी हायपोक्सिया...'

भोपाळ(रवींद्र भजनी)एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • तरुणांमध्ये जास्त प्रमाणावर दिसतायत हॅपी हायपोक्सियाची लक्षणे

कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत, तरुणांना गंभीर लक्षणे आणि मृत्यूची बरीच प्रकरणे समोर येत आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नसताना, अचानक ऑक्सिजनची पातळी कमी झाली. काही कळण्याच्या आतच ऑक्सिजनची पातळी 50% पर्यंत कमी झाल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ही ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे- 'हॅपी हायपोक्सिया'. जाणून घ्या काय आहे हॅपी हायपोक्सिया...?

हॅपी हायपोक्सियामध्ये शरीरातील व्हायरल लोडमुळे फुफ्फुसांचा त्रास सुरू होतो. यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होऊन 50% पर्यंत पोहचू शकते. या अवस्थेत श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, घाबरणे, घाम येणे, चक्कर येणे आणि डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. दोन दिवसांपूर्वी सामान्य दिसणारा रुग्ण अचानक व्हेंटिलेटरवर जातो. हा हॅपी हायपोक्सिया काय आहे आणि यामुळे काय त्रास होऊ शकतो, याबाबत आम्ही भोपाळचे डॉ. वीके भारद्वाज, एमडी, हेमेटोलॉजिस्ट यांच्याशी खास बातचीच केली.

काय आहे हॅपी हायपोक्सिया?

 • हे कोरोनाचे एक नवे लक्षण आहे. कोरोना महामारीला आता एक वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नव-नवीन लक्षणे समोर येत आहेत. सर्दी, ताप, खोकल्यापासून सुरू झालेले हे इन्फेक्शन गंभीर निमोनिया आणि श्वास घेण्याच्या त्रासापर्यंत पोहोचले आहे.
 • अभ्यासकांना यात डायरिया, चव न येणे आणि रक्ताच्या गाठी जमण्यासारखे लक्षण दिसले आहेत. कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतरही हे इन्फेक्शन होऊ शकते. नवीन लक्षण 'हॅपी हायपोक्सिया'ने तर अभ्यासकांनाही चकीत केले आहे. हे लक्षण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक तरुणांमध्ये आढळून येत आहे.
 • हायपोक्सियाचा अर्थ आहे- रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे. एका निरोगी व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी 95% किंवा यापेक्षा जास्त असते. पण, कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी 50% पर्यंत कमी होऊ शकते. या हायपोक्सियामुळे किडनी, मेंदू, ह्रदय आणि इतर प्रमुख अवयव काम करणे बंद करू शकतात.

कोरोना रुग्णांमध्ये अचानक ऑक्सिजनची पातळी का कमी होते ?

 • बहुतेक अभ्यासक आणि मेडिकल एक्सपर्ट्स सांगतात की, फुफ्फुसातील नसांमध्ये रक्ताच्या गाठी जमतात. याला हॅपी हायपोक्सियाचे प्रमुख कारण मानने जाते. इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरावर सूज येते. यामुळे सेलुलर प्रोटीन रिअॅक्शन वाढते आणि रक्ताच्या गाठी बनतात. यामुळे फुफ्फुसांना मुबलक ऑक्सिजन मिळत नाही.

ज्यांच्या शरीरात कोरोनाचे लक्षण नाही, त्यांनी हॅपी हायपोक्सियाला कसे ओळखावे ?

 • कोरोना रुग्णांना पल्स ऑक्सीमीटरवर ऑक्सिजन तपासण्याचा सल्ला दिला जातो. लक्षणे नसलेल्या व्यक्तींना हॅपी हायपोक्सिया झाल्यावर त्यांच्या ओठांचा रंग निळा होतो. त्वचा लाल/नारंगी होते. तसेच, सतत घाम येतो. ही रक्तात ऑक्सिजनची पातळी कमी असण्याचे किंवा हायपोक्सियाचे लक्षणे आहेत.

ही समस्या तरुणांमध्ये जास्त प्रमाणात का दिसत आहे ?

 • याची दोन कारणे आहेत. पहिले- तरुणांची प्रतिकारशक्ती चांगली असते. दुसरे- तरुणांची ऊर्जा आणि सहन शक्ती वयस्करांपेक्षा जास्त असते. वयस्करांमध्ये ऑक्सिजनची पातळी 90-95% झाल्यावरही जाणवते. पण, तरुणांमध्ये ऑक्सिजनची पातळी 80% झाल्यावरही जाणवत नाही. त्यांना हायपोक्सिया झाल्याचे कळत नाही आणि ते काही काळ हायपोक्सियाला सहन करतात.
 • सध्याच्या परिस्थितीत तरुण वर्गाला कमाई करण्यासाठी किंवा इतर कारणासाठी घराबाहेर पडावे लागते, लोकांमध्ये मिसळावे लागते. यामुळे तरुणांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. परंतु, आताही सर्वाधिक धोका वृद्ध आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाच आहे.
 • कोरोना 85% लोकांमध्ये माइल्ड, 15% मध्ये मॉडरेट आणि 2% लोकांमध्ये जीवघेणा होत आहे. तरुणांमध्ये माइल्ड लक्षण असतात, त्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात उशीर होतो. यामुळे तरुणांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढत आहे. या आजाराच्या विविध लक्षणांबद्दल वेळोवेळी माहिती देणे गरजेचे आहे.

अशा लक्षणांबाबत जागरुकता पसरवण्यासाठी काय करता येईल ?

 • कोरोनाची जी लक्षणे समोर येत आहेत, माइल्ड ते मॉडरेट आणि क्रिटिकल होत असलेल्या रुग्णांना अलर्ट सिग्नल देणे गरजेचे आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची एक सायंटिफिक कमेटी बनवून या लक्षणांवर दररोज लक्ष्य ठेवण्याची गरज आहे.
 • रॅशेज, डायरिया, कंजंक्टिवाइटिस, सांधेदुखीदेखील कोरोनाचे लक्षणे आहेत. पण, यांना अजून राज्य किंवा केंद्राच्या RT-PCR टेस्टिंग प्रोटोकॉलमध्ये सामील करण्यात आलेले नाही.
 • अनेक केसेस म्यूटेंट व्हेरिएंटमुळे RT-PCR मध्ये सापडत नाहीयेत. डेली मेडिकल बुलेटिन जारी केल्यामुळे माइल्ड केसेसला क्रिटिकल होण्यापासून वाचवता येईल आणि यातून तरुणांचा जीव वाचवता येईल.
बातम्या आणखी आहेत...