आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Hardik Patel BJP Vs Gujrat Patidar Voters । BJP On Patidar Voters In Gujarat Assembly Election | Patidar Could Affect 70 Seats

दिव्य मराठी एक्सप्लेनर:हार्दिक पटेल यांच्या माध्यमातून 1.5 कोटी पाटीदारांना जोडणार BJP, विधानसभेच्या 70 जागांवर नजर

लेखक: नीरज सिंह8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर गुजरातमधील प्रसिद्ध तरुण पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हार्दिक यांनी नुकताच 17 मे रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पाटीदार आंदोलनामुळे 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका सहन करावा लागला होता. अशा परिस्थितीत गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजप पुन्हा एकदा हार्दिक यांच्या माध्यमातून राजकीय समीकरणे जुळवत आहे. गुजरातमध्ये पाटीदारांची लोकसंख्या दीड कोटीच्या आसपास आहे आणि जवळपास 70 विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

अशा परिस्थितीत जाणून घेऊया की, हार्दिक पटेल यांच्या प्रवेशाचा भाजपला किती फायदा होईल? 2017च्या निवडणुकीत हार्दिकमुळे भाजपला फटका बसला होता का? गुजरातच्या निवडणुकीत पाटीदारांचे इतके महत्त्व का आहे?

2017च्या विधानसभा निवडणुकीचे हार्दिक कनेक्शन काय होते?

2015ची गोष्ट आहे. गुजरातमधील पाटीदार समाज ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवत होता. दरम्यान, हार्दिक पटेल या तरुणाने ओबीसी आरक्षणासाठी पाटीदार अनामत आंदोलन समिती स्थापन केली होती. हार्दिक यांच्या नेतृत्वाखाली पाटीदार आंदोलन इतके मजबूत झाले की लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या सभांमध्ये सहभागी होऊ लागले आणि दोन दशकांहून अधिक काळ गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला निवडणुका हरण्याची भीती वाटू लागली.

या आंदोलनाचा परिणाम 2017च्या विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. विधानसभा निवडणुकीत भाजपने नक्कीच विजय मिळवला, परंतु मागील निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला 16 जागा कमी मिळाल्या आणि केवळ 99 जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसला गतवेळच्या तुलनेत 16 जागा जास्त मिळाल्या. या काळात काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमधील काँग्रेसची तीन दशकांतील ही सर्वोत्तम निवडणूक कामगिरी होती.

याचे बक्षीसही हार्दिक यांना मिळाले. मार्च 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी पटेल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि जुलै 2020 मध्ये गुजरातमध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष बनले. मात्र, दोन वर्षांत काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोठे निर्णय घेताना त्यांना विचारलेही नाही, असा आरोप करत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

हार्दिक यांच्या प्रवेशाने भाजपला किती फायदा होणार?

गुजरातमध्ये पाटीदार मतदार 14 टक्के आहेत. यामध्ये कडवा आणि लेवा पटेल यांचा समावेश आहे. पाटीदार समाज ही 1984-85 पासून भाजपची एकनिष्ठ व्होट बँक आहे. काँग्रेसचे नेते आणि गुजरातचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले माधवसिंह सोलंकी यांची KHAM सिद्धांत हे त्याचे कारण मानले जाते. KHAM म्हणजेच क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम युतीमुळे सोलंकी 4 वेळा मुख्यमंत्री झाले. यामुळे पाटीदार काँग्रेसपासून दूर होत गेले.

2015 मध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखालील पाटीदार आंदोलनापासून भाजप पटेल मते टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. अशा स्थितीत हार्दिक पटेल यांच्या आगमनाने भाजप 2017च्या विधानसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढू शकते, कारण नाराजी असतानाही पाटीदार समाजाचा मोठा वर्ग भाजपशी जोडला गेला आहे. अशा परिस्थितीत हार्दिक यांच्या आगमनाने भाजपपासून दूर गेलेले पाटीदार पुन्हा एकदा पक्षात प्रवेश करतील, असे मानले जात आहे.

नरेश पटेल यांच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी हार्दिक यांच्या आगमनामुळे भाजपलाही मदत होईल, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. नरेश पटेल हे राजकोटचे व्यापारी आहेत. नरेश पटेल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच भाजप पाटीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. 1.5 कोटी लोकसंख्येसह, 182 विधानसभा जागांपैकी 70 जागांवर पाटीदारांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. गुजरातमध्ये अनेक मुख्यमंत्री पाटीदार समाजातून आले आहेत. यामध्ये चिमणभाई पटेल, केशुभाई पटेल, बाबूभाई पटेल, आनंदीबेन पटेल आणि विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा समावेश आहे.

'आप'चा मुकाबला करण्यासाठी आणि सौराष्ट्रात भाजपला मजबूत करण्यासाठी हार्दिक किती उपयोगी ठरतील?

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा (आप) मुकाबला करण्यासाठी भाजपचे नेतृत्वही हार्दिक यांच्याकडे एक शस्त्र आणि एक प्रभावी नेता म्हणून पाहत आहे. भाजपने हार्दिक यांचा पक्षात समावेश करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्सने आधीच म्हटले आहे.

याद्वारे भाजपला माधवसिंह सोलंकी यांचा 1985 मध्ये 149 जागा जिंकण्याचा विक्रम मोडून सौराष्ट्रात मोठा प्रभाव पाडायचा आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाचा राज्यातील वाढता शिरकाव हाणून पाडण्याचीही त्यांचा हेतू आहे. गुजरातमधील सौराष्ट्र हा 1995 पासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.

मात्र, पाटीदार आंदोलनासोबतच पाणीटंचाई आणि शेतीची समस्या यामुळे 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका सहन करावा लागला होता. 2017च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 47 जागांपैकी काँग्रेसने 28 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 19 जागा जिंकता आल्या. त्याचवेळी 2012च्या निवडणुकीत भाजपने येथे 30 जागा जिंकल्या होत्या.

यावेळी हार्दिक यांना आणण्याची भाजपची योजना 2012च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी आहे, तेव्हा भाजपने सौराष्ट्रात 30 जागा जिंकल्या होत्या. सौराष्ट्रात लेवा पाटीदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोघेही उद्योगपती नरेश पटेल यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नरेश हे श्री खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. खोडलधाम ट्रस्ट ही राजकोटमधील लेवा पटेल समाजाची महत्त्वाची संस्था आहे.

बातम्या आणखी आहेत...