आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Harish Rawat Interview| Marathi News |Senior Congress Leader Harish Rawat On Narendra Modi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi And Amrinder Singh In Bhaskat Exclusive Interview

एक्सक्लूझिव्ह:उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींमुळे राजकीय चित्र बदलेल; पीएम मोदींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडे राहुल गांधी; ज्येष्ठ काँग्रेस नेते हरीश रावत यांची मुलाखत

रवी यादव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजकीय डावपेचांना धोबी-पछाड देणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिलखुलासपणे आपली मते मांडली. कॅप्टन पंजाबातून काँग्रेसचा सफाया करण्यासाठी गुंतले होते. अशात काँग्रेसचे पंजाबमधील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री बदलणे गरजेचे होते असे रावत म्हणाले आहेत.

काँग्रेस किंवा गांधी कुटुंबियांच्या विरोधात पक्षातून आवाज उठवणे यात काही चुकीचे नाही. परंतु, नटवर सिंह आणि त्यांच्यासारखे लोक काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत असताना मलई खातात आणि नंतर मात्र सवाल उपस्थित करतात असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून राहुल गांधी आहेत आणि अशाच विविध गोष्टींवर त्यांनी मनमोकळ्यापणाने आपले विचार मांडले.

प्रश्न : तुम्ही आतापर्यंत पंजाबमध्ये होता. तर उत्तराखंडमध्ये आता निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या तयारीला आता उशीर झाला असे वाटते का?
उत्तर - मला वाटते उशीरा का होत नाही आपण तयारीला लागलो. कार्यकर्ते आणि समर्थक हीच माझी ताकद आहे. मला उशीर झाला तरीही यालाच माफीनामा समजून ते जास्तीत जास्त जोर लावत आहेत. जेणेकरून या विलंबाचा निकालांवर वाइट परिणाम होऊ नये.

प्रश्न : पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतरही वाद शमलेला नाही. अमरिंदर सिंग यांना हटवून काँग्रेसने चूक केली का?
उत्तर : अमरिंदर सिंग यांना हटवणारे आणि त्यांना अकाली दलाची टीम B म्हणणारे सगळेच आमदार काँग्रेसचे होते. त्या सर्वांनाच वाटत होते की अमरिंदर सिंग अकाली दलाला झुकते माप देतात. त्यांच्या सरकारमध्ये प्रशासकीय अधिकारी अकाली दलाचेच ऐकत होते. निवडणुकीत एका मुख्यमंत्र्याने एक नेता म्हणून जशी कामे करणे अपेक्षित असतात तशी कॅप्टन अमरिंदर सिंग करत नव्हते. ते तर विरोधी पक्षाची भूमिका बजावत होते.

अमरिंदर सिंग आपल्या फार्महाउसमधून बाहेर सुद्धा पडत नव्हते. भाजपच्या दबावात येऊन काँग्रेसला पराभूत करूनच सोडणार अशी त्यांची वृत्ती होती. पक्षाने त्यांना सुधारणेसाठी खूप वेळ दिला. त्यांना पंजाबसाठी 18 सूत्री कार्यक्रम सुद्धा दिला होता. त्यामध्ये व्यसन मुक्ती आणि त्याच्याशी संबंधित काळ्या धंद्याचा नायनाट याचा समावेश होता. परंतु, तो लागूच झाला नाही.

पंजाबमध्ये 43 आमदारांनी विरोधाचा सूर उमटवला. बैठक बोलावण्याची मागणी ठेवली. त्यामुळेच आम्हाला काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवावी लागली. या बैठकीत कॅप्टन यांना सुद्धा बोलावण्यात आले होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी परिस्थितीच अशी केली होती की काँग्रेसचे अस्तित्व पंजाबमध्ये टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री बदलावा लागला. चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले तेव्हा अख्ख्या पंजाबमधून त्यांचे स्वागत करण्यात आले. नवज्योत सिंग सिद्धू यांचेही या बाबतीत दुमत नव्हते.

प्रश्न : उत्तर प्रदेशात काँग्रेसचे समिकरण काय? तिथे चेहराच नाही. अशात केवळ प्रियंका गांधी वाड्रा सक्रीय झाल्यास काँग्रेसला फायदा होईल का?
उत्तर : होय, नक्कीच. प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशची जनता एक नवीन पर्याय आणि नवी उमेद म्हणून पाहत आहे. आमची संघटनात्मक ताकद यूपीत कमी असेल. परंतु, जनता नेहमीच इतिहास घडवत असते. 1977 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता, तेव्हा जनता पक्षाची परिस्थिती मजबूत नव्हती. परंतु, जनतेनेच त्यांना दोन तृतियांश बहुमत मिळाले. प्रियंका गांधींना साथ देऊन उत्तर प्रदेशचे जुने गौरव पुन्हा मिळवता येईल हे जनतेला कळाले आहे.

प्रश्न : प्रियंका गांधी निवडणूक लढवतील का हे अजून स्पष्ट झालेले नाही. अशात जनता भ्रमित होणार नाही का?
उत्तर : प्रियंका गांधींनी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरीही त्याने फारसा फरक पडणार नाही. कारण, नेतृत्व त्याच करत आहेत. निश्चितच त्यांच्या नेतृत्वाचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा होईल. पक्षाचा आलेख सातत्याने वर जात आहे.

प्रश्न : भाजपचे म्हणणे आहे की मोदींना पर्याय नाही. काँग्रेस मोदींसमोर कुणाला उभे करणार आहे?
उत्तर : राहुल गांधी आहेत. या युवा नेत्यामध्ये ती क्षमता आहे. या वेळी देशाला गरज असलेले पर्यायी विचार त्यांच्याकडे आहेत. मोदींच्या विचारांनीच देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे लागलेले आहेत. बेरोजगारी विक्रम तर महागाई शिखरावर पोहोचली आहे. देशाच्या सीमा सुद्धा सुरक्षित राहिलेल्या नाहीत.

अचानक भारताला चारही बाजूंनी शत्रूंनी घेरल्याचे चित्र आहे. अर्थातच मोदींचे परराष्ट्र धोरण फेल ठरले आहे. आधी पाकिस्तान आणि चीन आपले शत्रू होते. आता नेपाळ सुद्धा दुरावला आहे. भूतानसारखे देश आपल्या मैत्रीवर सवाल करत आहेत. एकूणच देशात नैराश्य आहे.

प्रश्न : राहुल गांधींवर तर काँग्रेसमधील लोकच प्रश्न उपस्थित करतात. अशात काँग्रेस G-23 कसे हाताळणार?
उत्तर : पक्षात अंतर्गत मुद्द्यांवर मते मांडण्यात काहीच वाइट नाही. कुणी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावत असेल तर त्यात गैर काय? कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वांनी राहुल गांधींना नेतृत्व करण्यास सांगितले आहे. काहींनी स्पष्ट सांगितले तर काहींनी अप्रत्यक्ष. सगळेच त्यांच्या नेतृत्वावर समाधानी आहेत. सोनिया गांधींच्या विचारांवर सुद्धा सगळेच सहमत आहेत. त्यांच्या मतांवर टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये आनंद शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांचा देखील समावेश होता.

आमच्याकडे भाजपसारखे नाही. तिथे प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा आहे. काँग्रेस हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. एखाद्याने नेतृत्वार सवाल केल्यास आम्ही त्याला प्रक्रियेचा एक भाग समजतो आणि त्यावर तोडगा काढत असतो.

प्रश्न : माजी केंद्रीय मंत्री नटवर सिंह म्हणाले होते की काँग्रेसमध्ये आता लोकशाही उरलेली नाही. सोनिया गांधीच 21 वर्षांपासून अध्यक्ष आहेत. यावर काय वाटते?
उत्तर : नटवर सिंह केवळ आपला राग व्यक्त करत आहेत. ते काँग्रेसचे आहेत की नाहीत मला माहिती नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी काँग्रेसच्या सुकाळात मलई खालली, नंतर जेव्हा काँग्रेस कमकुवत झाला तेव्हा प्रश्न उपस्थित करून विरोधकांची साथ दिली. नटवर सिंह आपल्याच इतिहासाला दगा देत आहेत.

प्रश्न : काँग्रेस वंशवादाला कसे हाताळणार आहे? अध्यक्ष पदाबाबत काँग्रेसच्या संविधानात बदल करायला हवे असे वाटत नाही का?
उत्तर : जोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना सोनिया गांधी यांच्यावर विश्वास आहे त्या अध्यक्ष राहतील. काँग्रेसमध्ये केवळ नेहरू कुटुंबातील सदस्याला अध्यक्ष केले जाते हा आरोप चुकीचा आहे. निम्म्यापेक्षा जास्त काळ अध्यक्ष पदावर राहणारे नेहरू कुटुंबातून नव्हते.

स्वातंत्र्याच्या लढ्यात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जेलमध्ये जाण्याची पहिलीच वेळ असेल. ते कुटुंब नेहरू कुटुंब होते. देशात एकही कुटुंब नसेल ज्यातील एक सदस्य पंतप्रधान असताना आणि पंतप्रधान पदावरून हटल्यानंतर शत्रूंकडून मारल्या गेला. आहुती देण्यात नेहरू कुटुंब नेहमीच पुढे राहिला आहे. स्वतःचे बलिदान देणाऱ्या नेहरू कुटुंबियांचा आदर का करता? हा सवाल करणेच चुकीचे आहे.

प्रश्न : अनेक राज्यांमध्ये काँग्रेस सरकार हटवून भाजपने स्वतःची सत्ता स्थापित केली आहे. भाजपला हे शक्य कसे होत आहे?
उत्तर : पंतप्रधानच देशाच्या राज्यघटनेचा अनादर करत आहेत. लोकशाही संस्थांना कमकुवत केले जात आहे. त्या सुरक्षित राहू नये असेच प्रयत्न केले जात आहेत. जनतेने गप्प राहिल्यास विरोधी पक्ष काय करू शकतो. एक विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला कमकुवत करून सोडणे, मुळात राज्यघटनेला कमकुवत केल्यासारखे आहे. लोकशाही बळ देण्यासाठी काँग्रेसला जनतेची आणि घटनात्मक संस्थांच्या सहकार्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...