आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाचा नवा शोध:कठीण विचारही न दडवता स्वीकारा, आपण लहान अडचणी संकट मानतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आनंदी राहण्याविषयी सांगताहेत उद्योगपती हर्ष गोयंका

तुम्हाला बॉबी मॅक्फेरिनचे सुपरहिट गीत ‘डोंट वरी, बी हॅप्पी’ आठवतच असेल...जेव्हा मी हे गीत ऐकले, माझा दृष्टिकोन असा होता की, बोलणे सोपे, पण करणे अवघड! पण कोरोना महामारीच्या १८ महिन्यांत मला मी पुन्हा आनंद शोधल्याचे जाणवले. सायंकाळी आकाशात इंद्रधनुष्य बघून माझे मन आनंदाने भरून आले. काळ्या दाट ढगांच्या सावलीत प्रकाश आणि रंगांचे मनमोहक धनुष्य आकाशात हसत होते आणि मी विचार करत होतो की चारही बाजूंनी नैराश्य पसरलेले असताना निसर्ग आम्हाला आनंद देत आहे. निसर्ग नेहमीच आपल्याला आशा आणि आनंदाचा संदेश देत आला आहे. परंतु आयुष्याची आंधळी धावपळ, आपले काम, कमाई आणि विविध लक्ष्ये साधण्याच्या अपेक्षेने आम्ही यापासून दुरावतो.

महामारी आली आणि आपले जीवन अचानक थांबले. सुरुवातीला मी जगात पसरलेली महामारी आणि भविष्याबाबत अत्यंत चिंतित होतो. आपण काहीही होऊ शकते या अनिश्चिततेतच जगतो. त्यानंतरही काही सुंदर आणि आश्चर्यकारक घटना घडल्या. असे वाटले की निसर्गाने रोखले आणि जीवनाकडे एक नजर टाकण्यास सांगितले असावे. आम्ही लहानसहान गोष्टींत आंनद शोधण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांशी नाते आणि दृढ होत गेले. पहिल्यांदाच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले गेले. एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करणे किंवा गंभीर रुग्णासाठी रुग्णालयात बेडची व्यवस्था करणे, हे आनंदाचे कारण ठरू शकते, याचा एका वर्षापूर्वी कोणी विचार केला असेल का? जसजशी माणसे वाचत गेली, आम्ही गरजवंतांपर्यंत पाेहोचलो, मदत आणि दानासारख्या छोट्या कार्यांतूनही आनंद मिळाला. महामारीने मला डेनिश शब्द ‘Hygge’ चे महत्त्व कळाले. त्याचा उच्चार ‘hoo-guh’ आहे. याचा अर्थ आहे आराम, सांत्वन, रोज घडणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींपासून आनंदी होणे, प्रिय व्यक्तींत मिसळणे, कुणाची प्रेमाने गळाभेट घेणे, जीवन सफल बनवणे.

परिस्थितीत सुधारणा होत आहे. तरीही महामारीची भीती आहे. अशा वेळी नेहमीच नकारात्मकता येते, त्याकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही. मला नेहमीच वाटते की कठीण विचार दडवण्याऐवजी त्यांचा स्वीकार करणेच शहाणपणाचे आहे. दुसरा टप्पा असा की तुम्ही वाईटात वाईट परिस्थितीचा विचार करावा. यात किती वाईट होईल, याची कल्पना करा. एकदा काय सर्वात वाईट परिस्थितीचा अंदाज आला तुम्हाला राईचा पर्वत करत असल्याची जाणीव होईल. बहुतांश समस्या पहिल्याच टप्प्यात संपलेल्या असतात. ज्या उरल्या त्या त्यावर तुम्ही उपाय शोधालच.

आनंदी राहण्याची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे स्वत:शी बोलणे होय. सर्व प्रयत्न करूनही तुम्ही जर स्वत:ला नकारात्मक बाजूकडे झोकून देत असाल तर तुम्हाला स्वत:च्या अंतकरणात डोकावण्याची गरज आहे. सकारात्मक विचाराच्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा पायाभूत विश्वासच काम करतो. बदल स्वीकारले पाहिजेत. आलेली वेळ टळून जाईल, यावर विश्वास ठेवा. आणखी एक गोष्ट माझा विश्वास ढळू देत नाही. ती म्हणजे आपल्याकडून शक्य ते प्रयत्न करणे आणि ईश्वराकडे दुसऱ्यांची काळजी घेण्याची कामना करणे होय. आपल्या जगण्याचा उद्देश शोधणे हर्षाचे अपार स्रोत आहे. या महामारीने सिद्ध केलेय की मोठमोठी उद्दिष्टे गाठणे हा आमचा हेतू नाही तर एकमेकांची काळजी घेणे, मदत करणे हे उद्दिष्ट आहे. आपण अशा विश्वात जगत आहोत जेथे कुणाशी दोन आपलेपणाचे शब्द बोललो तरी ते दयेचे कार्य होऊ शकते. भेट देणे हे आनंद मिळवण्याचे दुसरे महत्त्वाचे साधन आहे.

वैदिक परंपरेत दानाला आनंदाचे स्रोत मानले आहे. देणाराच नव्हे तर आजूबाजूचे सर्व लोक आणि दान स्वीकारणाराही सकारात्मक विचारांनी संपन्न होतो. आज कंपन्या कायदेशीर सीमा ओलांडून समाज आणि त्याचे सामुदायिक हित लक्षात घेऊन आपल्या उद्देशाची नवीन परिभाषा तयार करत आहेत. जसजसी महामारी ओसरत आहे, तसतसे आपण ही लाट शेवटची असावी, अशी कामना करत आहोत. या महामारीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत स्वत:ला झोकण्याची चर्चा सध्या होत आहे. तिला ‘न्यू नॉर्मल’ म्हटले जात आहे. आम्ही कामावर परत जावे का? सुटी घालवण्याच्या जुन्या पद्धती अमलात आणाव्यात का? सर्वसामान्य लग्न समारंभ दाटीवाटीने व्हावेत का? जे काही नियम पुढे बनतील त्यानंतरही आपल्याला नियमित आनंद देणाऱ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल.

खुशी एक निर्णय आहे, जो सर्वांनाच घ्यावा लागतो!
मी एका विचारासह तुमची रजा घेतो, तो म्हणजे खुशी किंवा आनंद असा निर्णय आहे, जो सर्वांनाच घ्यावा लागतो. तो आपल्या धकाधकीच्या जीवनात होणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींना महत्त्व देणारा आणि त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय आहे. आपण निसर्गसौंदर्याचे कौतुक, आपल्या आयुष्यातील प्रियजनांविषयी कृतज्ञतेशी भावना जपणे, दयाळू किंवा उदार होणे अशा गोष्टींचे महत्त्व जाणत नाही. त्यामुळे तुम्ही आनंदी होण्यासाठी असे निर्णय घ्याल, हीच आशा आहे.

हर्ष गोयंका चेअरमन, आरपीजी एंटरप्रायझेस

बातम्या आणखी आहेत...