आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कंपन्या तयार करून 158 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी कार्यालयात तसेच नातेवाईकांच्या घरांवर छापा टाकला आहे. हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीयांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ नेमके कोण आहेत? त्यांच्यावर कोणते आरोप करण्यात आले आहेत? आणि ईडीने धाड टाकण्यामागचे कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षभरापासून इडीकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हा छापा टाकण्यात आल्याची चर्चा आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी देखील माध्यमांसमोर तसेच स्पष्ट केले आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला होता. या दोन्ही कंपन्यांमध्ये 2020 मध्ये करार झाला होता. हसन मुश्रीफ यांचे जावई या कंपनीचे मालक असल्यामुळे अनुभव नसताना देखील त्यांना हा कारखाना चालवण्यासाठी दिला असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
मुश्रीफ यांचे भागीदार आणि नातेवाईक टारगेटवर
ईडीकडून कागल तसेच पुणे परिसरात देखील छापे टाकण्यात आले आहेत. मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये देखील छापे टाकण्यात आले आहेत. तसेच मुश्रीफ यांचे जावई आणि गायकवाड यांच्या मालकीची कंपनी असलेल्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावरही ईडीने धाड टाकली आहे.
कोण आहेत हसन मुश्रीफ
40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात सक्रिय
विकास कामांच्या माध्यमातून मिळवली लोकप्रियता
मुश्रीफ यांच्यावरील भष्ट्राचाराचे आरोप नेमके कोणते
मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता?
हसन मुश्रीफ यांच्या घरावर छाप पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील प्राप्तिकर विभागाने 2019 मध्ये त्यांच्या घरावर छापा टाकला होता. मात्र, त्यानंतर कारवाई करण्यात आली नव्हती. आता सोमय्या यांच्या वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर ईडीने पुन्हा छापा टाकला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
या आधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक झाली होती. त्यानंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे मुश्रीफ यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्पर्शभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी कागल बंदची हाक दिली आहे. तसेच मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
या संदर्भात आणखी बातम्या वाचा..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे:विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय का? छाप्यांवर मुश्रीफांची प्रतिक्रिया पूर्ण बातमी वाचा...
छाप्यांवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया:आधी नवाब मलिक, आता मी, नंतर अस्लम शेख; विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय का? पूर्ण बातमी वाचा...
आम्ही सर्व हसन मुश्रीफांसोबत:ईडीच्या छाप्यावरुन संजय राऊत यांची भाजपवर टीका, म्हणाले - दबावाचं राजकारण केले जातंय पूर्ण बातमी वाचा...
सरकारविरोधात बोलल्याने मुश्रीफांवर कारवाई:सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; सोमय्यांनी हेडलाइनसाठी पवारांचे नाव घेतल्याचा दावा पूर्ण बातमी वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.