आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरचीनमध्ये ऊन, दुष्काळ, वीजटंचाईने कहर:61वर्षातील भीषण गरमीने लोक त्रस्त, मॉल-कारखाने बंद, शहरांत अंधार

लेखक: अभिषेक पाण्डेय / नीरज सिंह3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये 61 वर्षांतील भीषण उष्णता आणि दुष्काळामुळे वीज टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अनेक शहरे अंधारात बुडालीत. वीज टंचाई दूर करण्यासाठी चीनमध्ये शॉपिंग मॉल्स फक्त 5 तास सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. शांघायमधील प्रसिद्ध स्कायलाईन बूंदमध्ये दोन रात्रींसाठी दिवे बंद असतील. फॉक्सवॅगन, अॅप्पल, टोयोटासारख्या कंपन्यांचे कामही बंद झाले आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया, चीनमध्ये वीजसंकट का निर्माण झाले. याचे उष्णता आणि दुष्काळाशी काय कनेक्शन आहे. हे दूर करण्यासाठी चीन काय उपाय करत आहे...
चीनमध्ये 18 ऑगस्ट रोजी सिचुआन प्रांतातील चोंगक्विंग शहरातील तापमान 45 अंशांवर पोहोचले होते. चीनच्या वाळवंटी भागातील शिंजियांग प्रांताबाहेरील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे.
20 ऑगस्ट रोजी चोंगक्विंग शहराचे किमान तापमान 34.9 अंश नोंदविण्यात आले. जे चीनमधील ऑगस्टमधील सर्वाधिक तापमान आहे. त्या दिवशी कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस होते.

शांघायच्या या फोटोत लोक कडाक्याच्या उन्हापासून बचावासाठी छत्री घेऊन जाताना दिसत आहेत. चीनच्या अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे.
शांघायच्या या फोटोत लोक कडाक्याच्या उन्हापासून बचावासाठी छत्री घेऊन जाताना दिसत आहेत. चीनच्या अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे.

देशातील मध्य आणि दक्षिण-पश्चिम भागातील अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. सर्वात जास्त फटका बसलेल्या सिचुआन प्रांतातील शहरे यात जास्त आहेत. यांगत्से नदीच्या खोऱ्यातील शांघायलाही उष्णतेचा फटका बसत आहे. मंगळवारी चीनच्या 165 शहरे आणि कौंटीसाठी रेड अलर्ट हीट वॉर्निंग जारी करण्यात आली होती. चीनच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस या शहरांतील तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाढते तापमान पाहता नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

या फोटोत चीनच्या चोंगकिंग शहरातील एका डोंगरावरील जंगलात प्रचंड उष्णतेमुळे लागलेली आग दिसत आहे. 5000 नागरिक आणि लष्कराचे जवान आग विझवण्यात गुंतले असून हेलिकॉप्टरमधून पाण्याचा वर्षावही करण्यात येत आहे. 1500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

24 लाख लोकांना दुष्काळाचा फटका
भयंकर उष्णतेसह कमी पावसामुळे चीनमधील संकट आणखीन गडद झाले आहे. जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 40 टक्के कमी पाऊस झाला. 1961 नंतर जुलै महिन्यातील हा निचांकी पाऊस आहे.
दुष्काळामुळे चीनच्या सिचुआन, हुबेई, हुनान, जियांग्शी, अनहुई आणि चोंगक्विंग प्रांतातील 24.6 लाख नागरिक आणि 22 लाख हेक्टर शेतीला फटका बसला आहे. चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयानुसार, दुष्काळामुळे 7.8 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सरकारकडून थेट मदतीची गरज आहे. यांगत्से ही चीनची सर्वात लांब आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. तिबेटच्या पठाराहून निघणारी ही नदी 4 हजार मैलांचा प्रवास करून शांघायच्या पूर्वेकडे चीन सागराला येऊन मिळते. चीनमधील सर्वात जास्त सुपीक जमीनीला पाणी पुरवण्याचे काम ही नदी करते. यांगत्से नदीमुळे चीनमधील 40 कोटी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळते. पण सध्या दुष्काळामुळे या नदीच्या मुख्य प्रवाहातील पाण्याचे प्रमाण गेल्या 5 वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षाही कमी राहिले आहे.

यांगत्से नदीचा हा फोटो चीनच्या वुहानमधील आहे. चीनच्या जलसंसाधन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वात मोठ्या चिनी नदीची पाण्याची पातळी १३ ऑगस्ट रोजी ५७.५ फुटांवर आली, जी १८६५ नंतरची सर्वात कमी आहे.
यांगत्से नदीचा हा फोटो चीनच्या वुहानमधील आहे. चीनच्या जलसंसाधन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वात मोठ्या चिनी नदीची पाण्याची पातळी १३ ऑगस्ट रोजी ५७.५ फुटांवर आली, जी १८६५ नंतरची सर्वात कमी आहे.

काही विश्लेषकांच्या मते, दुष्काळ आणि उष्णतेमुळे चीनच्या सेंट्रल आणि यांगत्से नदी खोऱ्यातील भागात तांदूळ आणि मका पिकाच्या उत्पादनाला फटका बसेल. तज्ज्ञांच्या मते, मक्याचे पिक आता ज्या अवस्थेत आहे त्या वेळेस जास्त पाण्याची गरज असते अन्यथा उत्पादन घटू शकते. अशात चीनला ब्राझील व अमेरिकेकडून मका आयात करावी लागू शकते.

हा फोटो दुष्काळाचा सामना करणार्‍या चीनमधील सर्वात मोठ्या यांगत्से नदीच्या आजूबाजूच्या भागातील आहे, जिथे पाण्याअभावी जमिनीला तडे गेले आहेत.
हा फोटो दुष्काळाचा सामना करणार्‍या चीनमधील सर्वात मोठ्या यांगत्से नदीच्या आजूबाजूच्या भागातील आहे, जिथे पाण्याअभावी जमिनीला तडे गेले आहेत.
पोयांग सरोवर, जिआंग्शी प्रांतातील चीनमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, सुमारे 75% कोरडे पडले आहे. ते कोरडे पडल्याने स्थानिक भागात पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.
पोयांग सरोवर, जिआंग्शी प्रांतातील चीनमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, सुमारे 75% कोरडे पडले आहे. ते कोरडे पडल्याने स्थानिक भागात पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.

भाजीपाला, अंडे महागले
वृत्तानुसार, उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे सिचुआन आणि यांगत्से नदीलगतच्या अनेक प्रांतांत भाजीपाल्याचे दर खूप वाढलेत. जूनमधील 3.7 टक्क्यांच्या तुलनेत जुलैमध्ये भाजीपाल्यांच्या किंमती 12.9 टक्क्यांनी वाढल्या. ऑगस्टमध्ये हे प्रमाण आणखीन वाढले आहे.
उष्णतेमुळे अंड्यांचे उत्पादन 2 ते 3 टक्क्यांनी घटले आहे. ज्यामुळे अनहुईसारख्या काही प्रांतांत अंड्यांच्या किंमती 30 टक्क्यांपर्यंत वाढल्या.
वीजसंकटामुळे चीनमधील अनेक मोठ्या कंपन्या बंद, हजारो कोटींचे नुकसान
चीनमध्ये एकूण वापरापैकी 15 टक्के वीजेचे उत्पादन जलविद्युत प्रकल्पांतून होते. कमी पावसामुळे या प्रकल्पांच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.
8.4 कोटी लोकसंख्या असलेल्या सिचुआन प्रांताने 2021 मध्ये आपल्या गरजेपैकी 80 टक्के वीजेचे उत्पादन जलविद्युत प्रकल्पांतून केले होते. यावर्षी सिचुआन प्रांतात जलविद्युत प्रकल्पांसाठी पाण्याची उपलब्धता 50 टक्क्यांनी घटली आहे. दुसरीकडे उष्णतेमुळे वीजेची मागणी 25 टक्क्यांनी वाढली आहे.
उष्णतेपासून बचावासाठी चीनमध्ये AC ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे पॉवर ग्रीडवर अतिरिक्त लोड येत आहे.

1 शांघायमधील प्रसिद्ध स्कायलाईन बूंदमध्ये दोन रात्री दिवे बंद राहतील
वीज संकटामुळे शांघायमध्ये बूंद नावाने प्रसिद्ध असलेल्या स्कायलाईनमध्ये 22 ऑगस्टपासून पुढच्या दोन रात्रींसाठी दिवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे चीनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

22 ऑगस्ट रोजी, शांघायमधील बूंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्कायलाईनचे दिवे चिनी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आले. ऐतिहासिक आणि भविष्यकालीन इमारतींसाठी प्रसिद्ध असलेला हा पाणवठ्याचा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो.

हा फोटो १२ जुलैचा आहे. यात शांघायची स्कायलाईन बूंद दिव्यांच्या रोषणाईने उजळलेली दिसते.
हा फोटो १२ जुलैचा आहे. यात शांघायची स्कायलाईन बूंद दिव्यांच्या रोषणाईने उजळलेली दिसते.

2 शॉपिंग मॉल फक्त 5 तासांसाठीच सुरू राहणार
वीज संकटामुळे चीनच्या चोंगक्विंग शहरात मॉल सुरू ठेवण्याचा वेळ कमी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की तापमान आणि मागणी कमी होईपर्यंत सर्व शॉपिंग मॉल्स केवळ सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंतच सुरू राहतील.
3 फॉक्सवॅगन व अॅप्पलसारख्या कंपन्यांमध्ये काम बंद
चीनच्या अनेक शहरांमध्ये कंपन्यांना एक आठवड्यासाठी काम बंद किंवा उत्पादन कमी करण्याचे आदेश देण्यात आलेत. जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनने म्हटले आहे की, सिचुआनची राजधानी चेंग्दूमधील त्यांचा कारखाना वीज कपातीमुळे बंद आहे. यामुळे कंपनीच्या कारच्या डिलिव्हरीत विलंब होऊ शकतो असे फॉक्सवॅगनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पुरवठादारांशी संपर्कात आहोत असे ते म्हणाले.
अॅप्पलच्या सप्लायर फॉक्सकॉननेही सिचुआनमधील आपला प्लान्ट बंद केला आहे. टोयोटाचा प्लान्टही बंद आहे. सिचुआन आणि चेंगक्विंगमधील इलेक्ट्रीग गाड्यांच्या मालकांनी चार्जिंग स्टेशन्स बंद असल्याबद्दल तक्रार केली आहे. टेस्लाने म्हटले आहे की चेंग्दूमधील त्यांचे 14 पैकी केवळ दोन स्टेशन्सच सुरू आहेत.
चीनमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोगही अयशस्वी
भीषण उष्णतेवर उपाय म्हणून यांगत्से नदीच्या आसपासच्या दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पावसासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोगही चीनने करून बघितला. हुबेई आणि इतर प्रांतांत केमिकल घेऊन जाणारे रॉकेटही सोडले जात आहेत. मात्र ढगं नसल्याने हा प्रयोग अयशस्वी ठरला.
कृत्रिम पद्धतीने ढगांमधून पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला क्लाऊड सीडिंग म्हणतात. क्लाऊड सीडिंगसाठी सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि ड्राय आईस (सॉलिड कार्बन डायऑक्साईड) सारखी रसायने हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या सहाय्याने ढगांवर फवारली जातात.
हे पार्टिकल्स हवेतील बाष्प आकर्षित करतात, ज्यामुळे पावसाचे ढग (cumulonimbus cloud) तयार होतात आणि पाऊस पडतो. या तंत्रज्ञानाने पावसासाठी किमान अर्धा तास लागतो.

हा फोटो १६ ऑगस्टचा आहे. यामध्ये चीनच्या हुबेई प्रांताचे अधिकारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी रसायन वाहून नेणारे रॉकेट सोडत आहेत.
हा फोटो १६ ऑगस्टचा आहे. यामध्ये चीनच्या हुबेई प्रांताचे अधिकारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी रसायन वाहून नेणारे रॉकेट सोडत आहेत.
बातम्या आणखी आहेत...