आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणे प्रत्येकालाच आवडते. या ऋतूत ऊन तुम्हाच्या शरीराला उष्णता देते. हिवाळ्यात ऊन मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी एखाद्या टॉनिकपेक्षा कमी नाही. मात्र हे टॉनिक जास्त वापरणे तुमच्यासाठी हानिकारकही ठरू शकते. म्हणूनच हिवाळ्यात उन्हाविषयीच्या या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्या.
केव्हा आणि किती वेळ उन्हात बसावे?
डॉक्टरांच्या मते एका निरोगी व्यक्तीने दिवसातून 30 ते 50 मिनिटांपर्यंत उन्हात बसणे लाभदायी आहे. हे यावर अवलंबून आहे की, ऊन किती प्रखर आहे आणि हवामान कसे आहे. उन्हाच्या प्रखरतेनुसार ही वेळ कमी किंवा जास्त केली जाऊ शकते. उन्हातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डी मुळे हाडे मजबूत होतात.
त्वचेच्या संसर्गावर ऊन आहे रामबाण
पावसाळ्यात फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप वाढते. हिवाळ्यात उन्हाने यावर मात करता येते. त्वचा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट व्हायला लागतात. एक्झिमा, सोरायसिसच्या रुग्णांनी उन्हात शेकणे खूप फायदेशीर ठरू शकते.
चांगल्या झोपेसाठी उन्हात बसावे
जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा तुम्हाला झोपेचा दर्जा वाढवायचा असेल तर रोज उन्हात शेकणे सुरु करा. उन्हात बसल्याने मेलाटोनिन नावाचे हार्मोन रिलीज होते. हे मेंटल स्ट्रेस दूर करून झोपेचा दर्जा सुधारते.
वर्षभर आजारांशी लढण्याची शक्ती देईल
जर हिवाळ्याचे काही महिने तुम्ही सातत्याने उन्हात शेकले तर तुम्हाला वर्षभर आजारांशी लढण्याची शक्ती मिळेल. ऊन प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया सुधारते.
या स्थितीत ऊन हानिकारक
अनेकदा लोक कित्येक तास उन्हात बसणे सुरु करतात. यामुळे उष्णता तर मिळते पण ही सवय त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. दिवसातून 50 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसल्याने एजिंग म्हणजेच सुरकुत्यांची समस्या येऊ शकते. याशिवाय उघड्या अंगाने उन्हात बसल्याने टॅनिंग होते. युरोपीय वंशाचे लोक हे चांगले मानतात. मात्र भारतात हे चांगले मानले जात नाही. सूर्यकिरणे अनेकदा कर्करोगाचे कारण ठरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.