आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Heart Attack At Young Age| Heart Attack Explainer In Youth In Marathi On World Heart Day | Heart Attack Reasons And Remedies

एक्सप्लेनर:युवकांमध्ये का वाढतेय हृदयरोगाचे प्रमाण? कोविडनंतर 14% ने वाढली हार्ट अटॅकची शक्यता! कारणे आणि उपाय काय? येथे वाचा

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • वर्ल्ड हार्ट डे निमित्त हृदय रोगावर चर्चा

कोरोनानंतर हृदय रोगाच्या समस्या चिंतेचा विषय ठरत आहे. जगभरात एक तृतियांश लोकांचा मृत्यू हृदयविकाराशी संबंधित आहे. वयाची साठी गाठल्यानंतर कर्करोग किंवा इतर गंभीर आजारांच्या तुलनेत हृदयविकाराची शक्यता 3 पटीने वाढते. परंतु, गेल्या काही वर्षांच्या आकड्यांप्रमाणे हृदयविकार केवळ वृद्धांनाच नव्हे, तर युवकांना देखील मोठ्या प्रमाणात झाले आहेत. कोविड-19 नंतर हार्ट डिसीजमध्ये 14% ची वाढ पाहायला मिळाली आहे. त्यातही धोक्याची घंटा म्हणजे यात प्रामुख्याने 30 ते 40 वर्षे वयोगटातील युवकांचा समावेश आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला केवळ 41 वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून युवकांमध्ये वाढणारा हृदय विकार चर्चेचा विषय ठरत आहे. वर्ल्ड हार्ट डे (29 सप्टेंबर) च्या निमित्ताने आम्ही गुडगाव येथील फोर्टीस मेमोरिअल रिसर्च इंस्टिट्यूटच्या हार्ट अँड व्हस्कुलर डिपार्टमेंटचे चेअरमन आणि पद्मभूषण कार्डिओलॉजिस्ट डॉ. टीएस क्लेअर आणि मेदांता मूलचंद हार्ट इंस्टीट्यूटमध्ये सीनिअर कंसल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. एचके चोप्रा यांच्यासह अन्य तज्ज्ञांची चर्चा केली. कमी वयात हार्ट अटॅक का येतो? तसेच कोविड-19 शी याचा काय संबंध आहे? ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

युवकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्याची कारणे?

 • सद्यस्थितीला युवकांमध्ये हार्ट अटॅक जणू सामान्य होत चालले आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण 14% नी वाढले आहे. तंत्रज्ञान आणि औषध संशोधनात आपण खूप प्रगती केली. परंतु, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅकचे प्रमाण कमी करू शकलो नाही.
 • गतवर्षी कोरोना व्हायरसची लागण होऊन बरे झालेल्या युवकांच्या रक्तात कमी, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे पाहण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे, कोरोना व्हायरस संक्रमण प्रोथ्रॉम्बोटिक, प्रो-इन्फ्लेमेटरी, इम्युनोजेनिक आहे. अर्थातच कोरानामुळे रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो आणि रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता बळावते.
 • याच कारणामुळे कोरोनातून बरे झालेलेल्या युवकांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता वाढली. यासोबतच स्थूल, स्मोकिंग करणारे, तणावात राहणारे तसेच अनुत्साही जीवन जगणाऱ्या युवकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. अशात हार्ट अटॅकची भीती देखील वाढते.

आणखी काही कारणे असू शकतात का?

 • हृदयरोग अनुवांशिक सुद्धा असू शकतो. ज्यांच्या कुटुंबात हृदयरोगाने मृत्यूचे प्रमाण असेल त्या कुटुंबात पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा हृदयरोगाची शक्यता बळावते. अशा कुटुंबातील 30 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सदस्यांच्या नियमित चाचण्या करायला हव्या. शरीरात कोलेस्ट्रॉल किती आहे याचे प्रमाण तपासत राहावे. किमान दोन वर्षांत एकदा टीएमटी आणि इको टेस्ट करायला हवे. यातून जितक्या लवकर आजाराचा पत्ता लागेल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हार्ट अटॅक टाळता येईल.
 • काही लोकांमध्ये जन्मतः हृदयात छिद्र असणे, हार्ट वॉल्व खराब होणे, हार्ट इंफेक्शन आणि इतर हृदय विकार असू शकतात. मेडिकल सायन्समध्ये झालेल्या अद्यावत संशोधनातून यापैकी बऱ्याच आजारांवर यशस्वी उपचार करणे शक्य आहे. परंतु, हे आजार लवकरात लवकर शोधून काढणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.

हृदयरोगांचा पत्ता उशीरा का लागतो?

 • शरीर हार्ट अटॅकची चिन्हे देत नाही असे नाही. परंतु, आपण त्या संकेतांना केवळ सामान्य ॲसिडिटी सारखी समस्या म्हणून दुर्लक्ष करतो. त्याचे गंभीर परिणाम काही काळानंतर भोगावे लागतात.
 • सध्याच्या वातावरणात प्रदूषण, खाण्या-पिण्याच्या सवयी, कमी झालेल्या शारीरिक हालचाली पाहता 30 वर्षांचे झाल्यावर नियमित हार्ट चेक अप आणि टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.

कोविडमुळे हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

 • कोविड-19 प्रामुख्याने एक रेस्पिरेटरी इंफेक्शन आहे. काही लोकांमध्ये हा इंफेक्शन हृदयासह अनेक अवयवयांवर वाइट परिणाम करतो. इतर व्हायरल इंफेक्शन प्रमाणेच कोरोना सुद्धा रोगप्रतिकारक क्षमतेवर प्रहार करतो. यातून होणाऱ्या तणावामुळे अक्यूट कोरोनरी सिन्ड्रोम आणि इलेक्ट्रोलाइटसह ॲसिड-बेस्ड समस्यांमुळे एरिथीमिया उद्भवू शकतो. या परिस्थितीत हृदयविकारामुळे अचानक मृत्यू होऊ शकतो.
 • महामारीत हार्ट फेल होण्याची प्रकरणे सुद्धा वाढली आहेत. काही लोक असेही आहेत की त्यांना हृदयाशी संबंधित कुठलाही आजार नव्हता. माइल्ड कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांमध्ये सुद्धा हृदयरोग दिसून आले आहे.
 • फोर्टिस हॉस्पिटल शालीमार बागमध्ये कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नित्यानंद त्रिपाठी यांच्या मते, कोविड-19 पासून बरे झालेल्या 25% लोकांमध्ये कार्डिओवस्क्युलर समस्या पाहण्यात आल्या आहेत. कोविड-19 मुळे झालेल्या 40% मृत्यूचे कारण हृदयरोगाशी संबंधित होते.
 • दिलासा देणारी बाब म्हणजे कोविडनंतर उद्भवलेल्या हृदयरोगांपैकी 78% रुग्ण पूर्णपणे निरोगी झाले आहेत. तरीही अनेकांना आधीच्या तुलने अधिक थकवा जाणवतो. अशात ही समस्या हृदयरोगांमुळे होत आहे की फुफुसांच्या संक्रमणामुळे हे सांगणे कठिण आहे.

हृदय रोगांपासून वाचण्यासाठी युवकांनी काय करावे?

 • हृदयरोग टाळण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. आरोग्यासाठी पूरक असे पर्याय निवडून राहणीमानात बदल करावे लागतील. ही सवय अगदी लहानपणापासून लागायला हवी. एक वेळ अशीही येईल की हृदय रोगांवर लक्ष देण्यापेक्षा आपल्याला निरोगी हृदयाची काळजी कशी घेता येईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
 • दररोज 30 मिनिटे वॉक, जॉगिंग, स्विमिंग आणि सायकलिंग सुद्धा मनाला दिलासा देणाऱ्या कसरती ठरू शकतात. हृदयविकार असतील तर पुश-अप्स आणि वेट लिफ्टिंग कधीही टाळलेलेच बरे.
 • जिम करताना सुद्धा डॉक्टरांची देखरेख आणि त्यानुसार आहार खूप महत्वाचा आहे. योग आणि ध्यान साधना केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा पोषक आहेत. योगामध्ये यम (काय करावे, काय नाही), नियम (स्वयं-अनुशासन), आसन (मुद्रा), प्राणायाम (श्वसन क्रिया), प्रतिहार (विचार), धरना (एकाग्रता), ध्यान (आध्यात्मिक चिंतन), समाधी ( श्रेष्ठता) या 8 गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.

व्यायाम, फूड सप्लीमेंट्समुळे हार्ट अटॅक होऊ शकतो का?

हो! डॉ. अमित कुमार सिंघल, सीनिअर कंसल्टंट, कार्डिओलॉजी, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, जयपूर यांच्या मते, हृदय रोगांमुळे दरवर्षी जगात 1.7 कोटी लोकांचा मृत्यू होतो. भारतात या रोगामुळे दरवर्षी सरासरी 30 लाख लोकांचा जीव जातो. अशात जास्तीचा व्यायाम आणि फूड सप्लीमेंट याला कारणीभूत ठरतात का हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

अती व्यायामः मेयो क्लिनिकच्या एका अभ्यासानुसार खूप व्यायाम करणे हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. यातून लठ्ठपणा आणि इतर समस्या येऊ शकतात. गरजेपेक्षा जास्त व्यायाम हार्ट अटॅकला निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करू नये.

पूरक आहारः फूड सप्लीमेंट्सने खास फायदा होतो असे संशोधन झालेले नाही. त्याचा जास्त वापर शरीरासाठी नुकसान पोहोचवू शकतो. कॅल्शियम आणि विटामिन डी चे प्रमाण अधिक झाल्यास हृदयविकार होऊ शकतात. यामुळेच पुढे जाऊ हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

बातम्या आणखी आहेत...