आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी लाइव्ह रिपाेर्ट:उष्माघातामुळेे राज्यातील 12 हजार पाेल्ट्रींमधील काेंबड्यांची तडफड

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाेल्ट्री फार्ममध्ये तापमान नियंत्रणासाठी माेकळ्या हवेबराेबरच फॅनचीदेखील व्यवस्था करण्यात येत आहे

राज्यात बहुतांश भागात उष्णतेची लाट असल्याने नागरिकच नव्हे, तर पाळीव प्राणी, बागायती पिके हाेरपळत आहेत. राज्यातील १२ हजार पाेल्ट्रींमधील सुमारे २.२५ काेटी कोंबड्यांना उष्माघात होत असल्याने तडफडून त्यांचा जीव धाेक्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरासह ग्रामीण भागात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान हे सलग ४२ अंशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पोल्ट्रीधारकांना कोंबड्यांचा जीव वाचविण्यासाठी शेडमध्ये सरळ पाण्याची फवारणी करावी लागत आहे. त्याबराेबरच पत्र्यांना थंड रंग लावणे, पत्र्यावर तुस किंवा चिपाड टाकून त्यावर पाणी मारणे असे विविध उपाय करावे लागत आहे. उष्माघातामुळे सध्या कोंबड्यांचे उत्पादन हे ४० टक्क्यांवर आले असुन लाॅकडाऊनच्या काळातही घाऊक बाजारात प्रथमच जिवंत कोंबडीला सव्वाशे रुपये किलो दर मिळत आहे.

वाढत्या तापमानामुळे होणारे परिणाम

> ३५ अंश सेल्सियसपर्यंत तापमान हाेते सहन

> काेंबड्यांना उष्माघाताचा धोका

> पोल्ट्रीचे उत्पादन ४० टक्क्यांवर

> किरकोळ बाजारात चिकनच्या दरात वाढ

> पाळीव जनावरांना अपचनाचा त्रास

वय आणि वजनानुसार समताेल

पोल्ट्री शेडमध्ये कोंबड्याच्या वय आणि वजनानुसार तापमानाचा समतोल ठेवावा लागतो. शेडच्या पत्र्यावर तणस, चिपाड टाकून तापमान कमी केले जाते. - दीपक भोर, पोल्ट्री उत्पादक मुंगसरा

अर्ध्या तासाने पाण्याची फवारणी

मालेगाव, देवळा, बागलाण तालुक्यात उन्हात कोंबड्या जिवंत ठेवण्यासाठी दर अर्ध्या तासाने शेडमध्ये आणि कोंबड्यांवर पाण्याची फवारणी करावी लागत आहे. - राजेंद्र मगर, पोल्ट्री उत्पादक, पिंपळगाव वाखारी

प्रथमच सव्वाशे रुपये किलो दर

लाॅकडाऊनमुळे सर्व हाॅटेल व्यवसाय बंद आहे. त्यामुळे चिकनची मागणी घटली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत आहे.अशाही परिस्थितीमध्ये कोंबड्यांचा पुरवठा होत नसल्याने जिवंत कोंबड्यांचा घाऊक दर हा सव्वाशे रुपयांपर्यंत गेला आहे. - उद्धव अहिरे, अध्यक्ष, आनंद अँग्रो.

बातम्या आणखी आहेत...