आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Help In Corona Crisis | The ICA Provided Rs 31 Lakh To 36 Former Cricketers As An Aid. 17 Women Players Included

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनात मदत:जिब्बूंच्या निधनाच्या 22 वर्षांनंतर पत्नीला मदत; एमसीए, बीसीसीआयच्या दुर्लक्षानंतर कॅन्सरग्रस्त रंजिताला पाठबळ

दिव्य मराठीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
माजी खेळाडूंना 60 हजार ते 1 लाखापर्यंतची झाली मदत - Divya Marathi
माजी खेळाडूंना 60 हजार ते 1 लाखापर्यंतची झाली मदत
  • आयसीएकडून माजी 36 खेळाडूंना 31 लाखांची मदत; 17 महिलांचा सहभाग; यात महाराष्ट्रातील पाच महिला

(संजीव गर्ग/ एकनाथ पाठक)

देशाच्या आणि राज्याच्या क्रिकेटला एका उंचीवर नेणारे माजी खेळाडू सध्या संकटात आहेत. अशाच ३६ माजी क्रिकेटपटूंना मानसिक आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन (आयसीए) कंबर कसली. या संघटनेने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या माजी खेळाडूंना ३१ लाखांची आर्थिक मदत केली आली. यामध्ये १७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. यात महाराष्ट्राच्या कॅन्सरग्रस्त रंजिता राणे, भारती अकाेलकर, नीलम पाटील, उषाराणी आणि चंद्रानी या पाच महिला खेळाडू आहेत. एमसीए, बीसीसीआयने दुर्लक्ष केल्यानंतरही रंजिता राणे सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत.

रंजिता राणे : कॅन्सरवर उपचार, आर्थिक, वैद्यकीय मदत मिळेना

मुंबई संघाच्या सामन्यागणिक विजयात सातत्याने माेलाचे याेगदान देणाऱ्या गाेलंदाज रंजिता राणे सध्या कॅन्सरच्या दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. राज्याच्या महिला क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यासाठी आणि चालना मिळवून देण्यात त्यांचा माेलाचा वाटा आहे. मात्र, त्यांची ही कामगिरी सध्या दुर्लक्षित झाली आहे. त्यामुळेच या संकटाच्या काळात त्यांच्याकडे मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यांना या आजारपणात दाेन्ही संघटनांकडून काेणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. याशिवाय त्या निवृत्तिवेतनापासून वंचित आहेत. त्यांनी १९९३ ते २००३ च्या दरम्यान महिलांच्या सीनियर नॅशनल आणि वेस्ट झाेन क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. आंध्र प्रदेशविरुद्धची ३/१८ ही सर्वाेत्तम कामगिरी त्यांच्या नावे नाेंद आहे. रंजिता सध्या या आजारावर उपचार घेत आहेत.

एसके जिब्बू : कमी सामने खेळल्याने निवृत्तिवेतन नाही

राजस्थानचे रणजीपटू श्रीकृष्ण जिब्बू यांना राज्याचे प्रतिनिधित्व करूनही काेणत्याही प्रकारच्या सुविधा मिळाल्या नाहीत. त्यांचे २२ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांची पत्नी मीता जिब्बू यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. पतीच्या निधनाच्या २२ वर्षांनंतर आता ८० वर्षीय मीता यांना संघटनेच्या वतीने आर्थिक स्वरूपातील मदत मिळाली. राज्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करूनही जिब्बू यांचे कार्य दुर्लक्षितच राहिले. त्यामुळेच त्यांना अद्यापही राजस्थान क्रिकेट संघटना आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काेणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यांचे कार्य हे दुर्लक्षितच राहिल्याची खंत पत्नी मीता यांनी व्यक्त केली. मीता जिब्बू यांचे सध्या चालणे पूर्णपणे बंद आहे. त्यांना व्हीलचेअरचा वापर करावा लागताे. त्यांना आजारपणाच्या काळात जवळपास महिन्याकाठी दहा हजारांचा खर्च लागताे.

देवराज गोविंदराज : निवृत्तीनंतर लंडनमध्ये बनले बसवाहक

वेगवान गाेलंदाज देवराज गाेविंदराज यांना निवृत्तीनंतर अनेक माेठ्या संकटाचा सामना करावा लागला. आर्थिकदृष्ट्या कमकुवतीमुळे त्यांना निवृत्तीनंतर लंडन येथे बस वाहकाच्या भूमिकेत काम करावे लागले. या माजी वेगवान गाेलंदाजाने करिअरमध्ये ९३ प्रथम श्रेणीचे सामने खेळले. हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी १९० विकेटची कमाई केली. याच अव्वल कामगिरीमुळे त्यांना १९७०-७१ मध्ये विंडीज दाैऱ्यासाठी भारतीय संघामध्ये स्थान मिळवले. मात्र, दुर्दैवाने त्यांना या दाैऱ्यात एकही सामना खेळता आला नाही. या दाैऱ्यात भारताने ही मालिका जिंकली हाेती. याशिवाय त्यांनी इंग्लंडचाही दाैरा केला. मात्र, त्यांना यादरम्यानही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. निवृत्तीनंतर त्यांनी २०११ मध्ये लंडन येथे जाऊन बस चालवली. यातून त्यांनी आर्थिक बाजू बळकट केली. त्यांना बीसीसीआयकडून २२ हजारांचे निवृत्तिवेतन मिळते.

बातम्या आणखी आहेत...