आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टकुमारतुलीतल्या गणेश मूर्ती जातात ९० देशांत:इथे वर्षभर फक्त मूर्ती बनवल्या जातात, १४ फुटी गणेश मूर्ती १ लाखांना विकली

लेखक: अक्षय वाजपेयी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्यात एक जागा आहे, कुमारतुली. कुमार म्हणजेच कुंभार आणि तुली म्हणजेच राहण्याचे ठिकाण. म्हणजेच कुंभारांची राहण्याची जागा. इथे वर्षभर फक्त मूर्ती तयार केल्या जातात. हे लोक इथेच राहतात, खातात-पितात आणि कामही करतात. कुमारतुलीत शिरताच लहान-लहान गल्ल्या तुम्हाला दिसतील. या गल्ल्यांच्या दोन्ही बाजूला कुंभारांचे वर्कशॉप आहेत. वर्कशॉपमध्ये उघड्या अंगाचे फक्त लुंगी नेसलेले कुंभार मूर्ती तयार करताना तुम्हाला दिसतील. भोला पाल सुमारे 53 वर्षांपासून इथे मूर्ती बनवत आहेत. ही त्यांची पाचवी पिढी आहे. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा ते गणपतीची एक छोटी मूर्ती हातात घेऊन तिला रंग देत होते. भोला सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत काम करतात. मध्ये 2 तासांसाठी लंच ब्रेक घेतात. कुमारतुलीत असे काय आहे, ज्यामुळे इथल्या मूर्ती इतक्या प्रसिद्ध आहेत? भोलांना आम्ही हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, इथली शिल्पकला तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. ही हातांची कला आहे. यात यंत्र नाही, तर हातांनी मूर्ती बनवल्या जातात. इथे असे कलाकार आहेत, जे तुमचीही हुबेहूब मूर्ती तयार करतील. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे काम बंद होते. त्यामुळेच यंदा भोला खूश आहेत. यावेळी मार्केट उघडले आहे आणि ऑर्डरही चांगल्या मिळत आहेत. पण रॉ मटेरियल महागल्याने मूर्तींची किंमतही वाढली आहे. आयोजकांना मात्र जुन्या किंमतीतच मूर्ती हव्या आहेत. थोडी ओढाताण आहे. पण चर्चेतून भाव निश्चित होतो.

कुमारतुली येथे गणपतीच्या मूर्तीवरून अखेरचा हात फिरवताना कलाकार.
कुमारतुली येथे गणपतीच्या मूर्तीवरून अखेरचा हात फिरवताना कलाकार.

300 वर्षांपूर्वी वसले, 90 पेक्षा जास्त देशांत जातात मूर्ती
300 वर्षांपूर्वी वसलेल्या कुमारतुलीतून 90 हून अधिक देशांत मूर्ती जातात. यात दुर्गा मातेच्या मूर्तीला सर्वाधिक मागणी असते. कुमारतुली मूर्ती समितीचे खजीनदार सुजीत पाल म्हणतात, गणेश जी आणि दुर्गा मातेच्या मूर्ती अनेक दिवसांपूर्वीच परदेशात गेल्या आहेत.
अडीच ते तीन फुट उंचीच्या बहूतांश मूर्ती अमेरिका, फ्रान्स आणि स्वीत्झर्लंडला गेल्या आहेत. परदेशांतील भारतीयांकडून या मूर्तींना चांगली मागणी आहे. बहुतांश मूर्ती जहाजातून नेल्या जातात. काही विमानातून पाठवल्या जातात. परदेशात जाणाऱ्या मूर्तींची किंमत लाखांमध्ये असते.
कुमारतुलीतून गणपतीच्या सुमारे 5 हजार लहान-मोठ्या मूर्ती विकल्या जातील. तर दुर्गा मातेच्या सुमारे 4 हजार मूर्ती विकण्यासाठी तयार केल्या जात आहेत. गणपतीच्या सर्वात महाग मूर्तीची ऑर्डर प. बंगालच्या मेदिनीपूरमधून आहे. गणपतीची 14 फुट उंच मूर्ती 1 लाखांत बूक झाली आहे.

कुमारतुलीतील जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला लोक मूर्ती बनवताना दिसतील. अनेक लोक हे काम पिढ्यानपिढ्या करत आहेत.
कुमारतुलीतील जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला लोक मूर्ती बनवताना दिसतील. अनेक लोक हे काम पिढ्यानपिढ्या करत आहेत.

कुमारतुलीमध्ये कशा तयार होतात मूर्ती

  • या मूर्ती भाजलेल्या मातीऐवजी उन्हात वाळलेल्या मातीने तयार केल्या जातात.
  • सर्वात आधी बांबू आणि सुक्या भुशाने याचा सापळा तयार केला जातो. यामुळे मूर्तीला सुरूवातीचा आकार मिळतो. यासाठी खास बांबू सुंदरबनातून आणला जातो.
  • सापळा उभा राहिल्यानंतर त्यावर मऊ माती लावली जाते. मातीचे एकावर एक अनेक थर लावले जातात. अनेकदा माती योग्य आकारात ठेवण्यासाठी कपडेही चिकटवले जातात.
  • मूर्तीत दोन प्रकारच्या खास मातीचा वापर होतो. एक चिकट काळी माती आणि दुसरी गंगेची माती. ही पांढऱ्या रंगाची मऊ माती असते. या दोन्ही प्रकारच्या मातीसह हाताने तयार केलेला गोंदही मिसळला जातो. यानंतर ती सुकू देतात.
  • सुकल्यानंतर पांढऱ्या पेंटचा पहिला थराचा लेप लावतात. नंतर तो सुकल्यावर वेगवेगळ्या रंगाने रंगवतात.
  • कुमारतुलीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींसाठी बहुतांश कलाकार नैसर्गिक रंगांचाच वापर करतात. काही आर्टीस्ट आपले ब्रशही स्वतःच तयार करतात. नवतरुण कलाकार आता रेडिमेड पेंट आणि पेंटब्रशचा वापर जास्त करत आहेत.
  • मूर्ती रंगवल्यानंतर त्या डेकोरेट करण्याचे काम सुरू होते. साडी, धोतर आणि दुसरे कपडे घातले जातात. तेव्हा मूर्ती तयार होते.

वार्षिक 5 कोटींची उलाढाल
कुमारतुलीमध्ये सुमारे 250 कुंभार कुटुंब राहतात. तिथे मूर्ती बनवणारे सुमारे 400 कलाकार आहेत. कुंभारांचे अनेक कुटुंब आता प. बंगालच्या कृष्णानगर आणि नबाद्विमध्ये स्थलांतरित झाले आहेत. यामुळे या दोन्ही शहरांतही आता देश-विदेशांतून मूर्तीसाठी ऑर्डर येत आहेत.

कुमारतुलीची वार्षिक उलाढाल 5 कोटींच्या घरात आहे. यात केवळ मूर्ती तयार करणाऱ्या कुंभारांचाच समावेश नसून मूर्ती सजवण्यासाठीचे दागिने विकणारे दुकानदार, मूर्तीला लागणारे धोतर-साडी विकणाऱ्या दुकानदारांचाही समावेश आहे. मूर्ती तयार करणारे मुख्य कारागीर दररोज 1500 रुपये घेतात. हेल्परला 800 रुपये मजुरी मिळते. सुजीत पाल सांगतात, गणपतीची देशातील सर्वात मोठी आणि महाग मूर्ती कदाचित इथेच तयार होतात. कोरोनानंतरचा हा पहिला हंगाम आहे ज्यात एक लाखांच्या गणेश मूर्तीची ऑर्डर मिळाली आहे. ही मूर्ती तयार होऊन क्लाएंटला मिळालीही आहे.

बातम्या आणखी आहेत...