आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हिरो सायकल्स'ची ब्रॅण्ड बनण्याची कहाणी:फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिम व्यक्तीकडून घेतले ब्रॅण्डचे नाव, चार भावांनी मिळून तयार केले दुचाकीचे साम्राज्य

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

हिरो सायकल्स या ब्रॅण्ड मागची कहाणी फारच रंजक आहे. मुंजाल ब्रदर्सनी दुचाकीचे साम्राज्य निर्माण केले. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंजाल कुटुंब भाजीचा व्यापार करायचे. फाळणीनंतर ही मंडळी लाहोरहून आधी अमृतसर आणि नंतर लुधियाना येथे आली. सुरुवातीला सायकलच्या स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. नंतर सायकलनिर्मिती उद्योगात मुंजाल ब्रदर्स शिरले. हिरो हा ब्रॅण्ड कसा बनला त्यामागची कहाणी जाणून घेऊया..

चार भाऊ, भारत-पाक फाळणी आणि हीरो
याची सुरुवात ब्रिजमोहन लाल मुंजाल आणि त्यांचे तीन भाऊ दयानंद, सत्यानंद आणि ओमप्रकाश यांच्यापासून झाली. ते पंजाब (आता पाकिस्तान) मधील टोबटेक सिंग जिल्ह्यातील कमालिया शहराचे रहिवासी होते. फाळणीपूर्वी ते अमृतसरला आले आणि सायकलच्या पार्ट्सचा व्यवसाय करू लागले. एके दिवशी ब्रिजमोहन यांनी आपल्या भावांसमोर सायकल निर्मितीचा प्रस्ताव ठेवला. काही प्रश्न विचारल्यानंतर भाऊ सहमत झाले आणि त्यांनी लुधियानामध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

येथे एक मनोरंजक किस्सा आहे. अमृतसरचे मुंजाल बंधू आपले सामान बांधून लुधियानाला जाण्याच्या तयारीत होते, तेव्हा करीम दिन नावाचा मुस्लिम माणूस पाकिस्तानला निघाला होता. करीम दिन यांचा सायकल सँडल बनवण्याचा व्यवसाय होता आणि त्याने स्वतःचे ब्रँड नाव तयार केले होते. तो त्यांचा मित्र ओमप्रकाश मुंजाल यांना शेवटच्या वेळी भेटायला गेला तेव्हा ओमप्रकाश यांनी करीम दिनकडे त्याचे ब्रँड नेम वापरण्याची परवानगी मागितली. करीम दीन यांनी होकार दिला. तो ब्रँड होता - 'हिरो'.

कशी तयार झाली हिरो सायकल?

मुंजाल बंधूंना सायकलचे सर्व भाग स्वतः बनवायचे होते. त्यांना परदेशी भागांवर अवलंबून राहायचे नव्हते, कारण त्यांच्या किंमती जास्त होत्या आणि वेळेवर त्याचा सप्लाय होत नव्हता. देसी पार्टमधून हिरो सायकल कशी तयार केली गेली ते जाणून घ्या...

सायकल स्प्रिंग: मुंजाल ब्रदर्सने 1954 मध्ये सायकल फोर्क (ज्या भागात सायकलचे चाक जोडले जाते) बनवण्याचा पहिला प्रयोग केला. अनेकवेळा अयशस्वी झाल्यानंतर अखेर त्यांना त्यात यश
मिळाले.

सायकल हँडल: मुंजाल ब्रदर्स रामगढिया समाजाकडे सायकलचे हँडल बनवण्यासाठी गेले. ते पारंपारिक गवंडी होते. सुरुवातीच्या त्रुटींनंतर, अंतिम उत्पादन उत्कृष्ट असल्याचे दिसून आले.

सायकल फ्रेम: मुंजाल ब्रदर्सना भारतीय जमीनीची वास्तविकता माहीत होती. म्हणूनच त्यांना एक मजबूत फ्रेम बनवायची होती. जेणेकरून सायकलवर दोन-तीन लोक बसून सहज फिरू शकतील. अशी
फ्रेम त्यांनी बनवली.

मडगार्ड्स आणि हँडल बार्स देखील स्वदेशी कारखान्यांमध्ये तयार केले गेले. शेवटी, 100% हिरो मेड सायकल तयार झाली. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांनी या सुंदर सायकलमध्ये पेडल्स भरले आणि आनंद व्यक्त करण्यासाठी कुटुंबाकडे निघाले. 1956 मध्ये त्यांनी बँकेकडून 50 हजारांचे कर्ज घेतले आणि पंजाब सरकारकडून सायकल बनवण्याचा कारखान्याचा परवाना मिळवला.

IPO आणण्याची योजना, ई-सायकलवर लक्ष केंद्रित

आता कंपनीची धुरा ओमप्रकाश मुंजाल यांचा मुलगा पंकज मुंजाल यांच्या हाती आहे. ते कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. पंकज मुंजाळ म्हणतात की, हिरो सायकलचा आयपीओ आणला जाईल, परंतु त्याची अंतिम मुदत अद्याप निश्चित केलेली नाही. 2024 पर्यंत त्याच्या IPO बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. हिरो सायकल्स ही सार्वजनिक कंपनी बनवण्याचा आमचा विचार आहे.

सध्या हिरो सायकल्सच्या टर्नओव्हरपैकी 50% उलाढाल भारताबाहेरून येते. हिरो इंटरनॅशनलच्या माध्यमातून त्यांच्या कंपनीने गेल्या काही वर्षांत युरोपमध्ये आपले अस्तित्व मजबूत केले आहे. हिरो मोटर्स आणि यामाहा मोटर कंपनीने मजबूत उत्पादन पोर्टफोलिओसह जागतिक ई-सायकल ड्राइव्ह युनिट कंपनी बनण्यासाठी करार केला आहे.

या अंतर्गत, जागतिक बाजारपेठेसाठी ई-सायकल ड्राइव्ह मोटर्स तयार करण्यासाठी भारतात एक उत्पादन युनिट स्थापन केले जाईल. पहिल्या मॉडेलचे उत्पादन नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...