आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हविस्मृतीत गेलेले नौदलाचे बंड:पटेलांनी थांबवले नसते तर गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज तोफेने उडवले असते

मनीषा भल्ला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वप्रथम हे छायाचित्र पाहा...

तुमच्या लक्ष्यात आलेच असेल की, हे छायाचित्र मुंबईतील अरबी समुद्राच्या काठावरील गेटवे ऑफ इंडियाचे आणि 560 खोल्या आणि 44 आलिशान सुट असलेल्या ताज या पंचतारांकित हॉटेलचे आहे. आज या इमारती बघून सगळ्यात आधी 26/11 चा मुंबई हल्ला आठवतो, पण तुम्हाला माहीत आहे का, 1946 मध्ये सरदार पटेल यांनी थांबवले नसते तर या दोन्ही इमारती 3 इंची युद्धनौकेच्या बंदुकांनी उडवल्या गेल्या असत्या.

आश्चर्यचकित होऊ नका! आज मी या इमारतींसमोर उभी आहे. तुम्हाला एका रक्तरंजित स्वातंत्र्ययुद्धाची कहाणी सांगण्यासाठी. हे तेच युद्ध आहे, ज्यानंतर तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लीमेंट अ‍ॅटली यांनी ताबडतोब भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि 20 जून 1948 या निर्धारित तारखेच्या 10 महिने आधीच म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वतंत्र्य झालो.

घटना 18 फेब्रुवारी 1946 ची आहे. बॉम्बे (आताचे मुंबई) या बंदरावर ब्रिटिश भारतीय नौदल म्हणजेच रॉयल इंडियन नेव्हीने निकृष्ट अन्नाच्या बहाण्याने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. अनेक महिन्यांपासून या नौसैनिकांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात होते. त्यांना नाश्त्यामध्ये डाळ आणि डबल रोटी दिली जात होती तर दुपारच्या जेवणात तीच डाळ आणि त्यासोबत भात वाढला जात असे.

अखेरीस बंदराजवळील संप्रेषण प्रशिक्षण केंद्र असलेल्या HMIS तलवारच्या खलाशांच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी घोषणा दिल्या - ‘जेवण नाही तर कामही नाही’ त्यांनी ब्रिटीश अधिकार्‍यांचे आदेश मानण्यास नकार दिला. बंडखोर नौसैनिकांनी HMIS तलवार कमांडर आर्थर फ्रेडरिक किंग याच्या गाडीचे टायर पंक्चर केले आणि त्यावर गांधीजींची Quit India आणि नेताजींची Jai Hind या घोषणा लिहिल्या.

HMIS तलवारचा कमांडर आर्थर फ्रेडरिक किंग हा उच्च दर्जा असलेला होता. त्याला भारतीय नौदलाला ब्लॅक बास्टर्ड या सारख्या शिव्या घालण्याची सवय होती. त्यामुळे बंडखोर नौसैनिकांनी आधी त्याची गाडी पंक्चर केली आणि त्यावर ‘Quit India’ आणि ‘Jai Hind’ या घोषणा लिहिल्या. बंडखोरीची ही वृत्ती दाखविणारे कोणतेही चित्र आजपर्यंत समोर आलेले नाही, त्यामुळेच दिव्य मराठी नेटवर्कचे कलाकार गौतम चक्रवर्ती यांनी तो प्रसंग तुमच्यासाठी सचित्रपणे मांडला आहे.

वास्तविक या बंडामागचे कारण खूप लहान वाटत असेल मात्र, बंडाची ठिणगी आधीच धगधगत होती. निकृष्ट अन्नामुळे या आगीत तेल ओतले गेले.

खरे तर, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आझाद हिंद फौजेच्या तीन वरिष्ठ अधिकार्‍यांवर सुरू असलेल्या खटल्यांमुळे 5 नोव्हेंबर 1945 पासून भारतीय नौदलातील सैन्य धुमसत होते. या अधिकाऱ्यांमध्ये मेजर जनरल शाहनवाज खान, कर्नल प्रेम सहगल आणि कर्नल गुरबक्ष धिल्लन यांचा समावेश होता. ब्रिटिश राणीविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवला जात होता. त्याला ‘रेड फोर्ट ट्रायल्स’ असे म्हणतात.

एकाच दिवसात म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी मुंबईतील सर्व 11 नौदल तुकड्यांमधील 20 हजार खलाशी या बंडात सामील झाले. 22 फेब्रुवारीपर्यंत, बंड दडपण्यासाठी आलेले ब्रिटिश सैनिक आणि बंडखोर भारतीय सैनिक एकमेकांना धमक्या देत राहिले. मोठ्या प्रमाणात गोळीबारही झाला.

भारतीय नौदलाने बॉम्बे बंदराभोवती असलेली 22 जहाजे ताब्यात घेतली. नौसैनिकांना घाबरवण्यासाठी ब्रिटिशांनी बंदरावर अत्यंत कमी उंचीवर युद्धविमान उडवण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल, बंडखोर नौसैनिकांनी बॉम्बेभोवताली पकडलेल्या युद्धनौकांच्या तोफांना गेटवे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताजकडे वळवले. त्यांनी इंग्रजांना इशारा दिला - आमचे नुकसान केले तर दोन्ही इमारती उडवून दिल्या जातील.

HMIS तलवार हे तेव्हा ब्रिटीश नौदल तळ होते. त्या काळात संवादाचे प्रशिक्षण केंद्र होते. आजकाल याला नेव्हल ट्रान्सपोर्ट डेपो म्हटले जाते, जिथे जुन्या जहाजांची दुरुस्ती केली जाते. हे दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात आहे.

नौदलाच्या इतिहासावर अनेक पुस्तके लिहिणारे निवृत्त कमांडर श्रीकांत बी केसनूर सांगतात की, HIMS तलवार मध्येही एक रेडिओ स्टेशन होते. बंडखोरांनी या रेडिओ स्टेशनद्वारे आपण संपावर जात असल्याची घोषणा केली. अशाप्रकारे हा संदेश लगेचच देशातील सर्व नौदल छावण्यांमध्ये पसरला आणि 20 फेब्रुवारीपर्यंत 20,000 लोक, 78 युद्धनौका, 23 नौदल स्टेशन या बंडात सामील झाले. 19 फेब्रुवारी रोजी कराची बंदरातील सर्व नौदल कार्यालयांमध्ये उठाव झाला. कराची बंदराजवळ एचएमआयएस हिंदुस्थानच्या खलाशांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संपर्क तोडला. 22 फेब्रुवारी 1946 रोजी कलकत्ता (आता कोलकाता) येथे HMIS हुगळी या युद्धनौकेच्या खलाशांनी अधिकार्‍यांचे आदेश मानण्यास नकार दिला.

दक्षिण मुंबईतील रस्त्यावर 'ब्रिटिश भारत सोडा'च्या घोषणा देण्यास सुरूवात झाली. भारतीय नौदलाने आझाद मैदानावर सभा घेऊन ब्रिटिशांविरुद्धची मोहीम तीव्र केली. त्या दिवसांमध्ये प्रत्येक रस्ता हा दक्षिण मुंबईकडेच जात असल्याचे वाटत होते. मुंबईतील या भागात दोन लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले होते.

हे बंड चिरडण्यासाठी इंग्रजांनी सर्व शक्ती पणाला लावली. 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान ब्रिटिश सैन्य आणि पोलिसांनी कुलाबा आणि दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर 400 लोकांना गोळ्या घालून ठार मारले. 1500 हून अधिक लोक जखमी झाले.

तेव्हा.

22 फेब्रुवारी 1946: भारतीय नौदलाच्या उठावासोबतच मुंबईतील तत्कालीन गिरगाव परिसरात सर्वसामान्य लोकही त्यांच्या समर्थनार्थ बाहेर पडले. हे चित्र ब्रिटीश सैन्य आणि स्थानिक नागरिक यांच्यातील जबरदस्त संघर्षाचे वर्णन करते.

आणि आता...

31 ऑगस्ट 2022: आज गिरगावचा हा परिसर पूर्णपणे बदलेला आहे. 1946 च्या उठावाचा मागमूसही या रस्त्यावर उरलेला नाही. रस्त्याच्या पलीकडे एक जुने चर्च आहे, त्यामुळे मागून डोकावणारी एक उंच इमारत या चर्चच्या भविश्याकडे निर्देशीत करते.

शहरातील गिरगावचा रस्ता ज्यावर बंडखोर नौसैनिकांना पाठिंबा देणारे किमान 100 मुंबईकर ब्रिटिशांच्या गोळ्यांचे बळी ठरले, त्या रस्त्यावर आज किराणा वस्तूंपासून चष्म्यापर्यंतची दुकाने आहेत. येथे अनेक चहाची दुकाने आणि एक चर्च देखील आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 100 वर्षांहून जुन्या इमारती आहेत. त्यापैकी बहुतेकांची वरच्या मजल्यावर घरे आणि खाली दुकाने आहेत. घर आणि दुकानांवरील बोर्ड त्यांच्या वयाची साक्ष देत आहेत.

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीचे निवृत्त संचालक आणि 'टाइमलेस वेट' पुस्तकाचे लेखक कमांडर डॉ. जॉन्सन ओडाक्कल सांगतात की, या बंडाला बॉम्बेतील गिरणी कामगारांनी पूर्ण पाठिंबा दिला होता, त्यामुळेच जे 400 लोक मारले गेले त्यातील बहुतेक बॉम्बेचेच होते.

नौसैनिकांनी 2 फेब्रुवारीलाच चिटकवले होते 'भारत छोडो'चे पोस्टर

2 फेब्रुवारी 1946 रोजी, भारतीय खलाशी बीसी दत्त यांना त्यांच्या साथीदारांसह ब्रिटिश भारतीय नौदलाच्या HMIS तलवार कडे जाणाऱ्या लाकडी पायऱ्यांवर "भारत छोडो" आणि "जय हिंद" अशा घोषणा असलेले पोस्टर चिटकवतांना पकडण्यात आले होते. या घटनेचेही कोणतेच चित्र नाही, त्यामुळे दिव्य मराठी नेटवर्कचे कलाकार गौतम चक्रवर्ती यांनी ती घटना तुमच्यासाठी चित्रित केली आहे.

18 फेब्रुवारी 1946 ला या बंडाची सुरुवात झाली, पण त्याची ठिणगी 2 फेब्रुवारी 1946 पासून पेटायला सुरुवात झाली होती. बंडखोर नेत्यांपैकी एक असलेले बी.सी. दत्त यांनी केंब्रिज विद्यापीठाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम करणाऱ्या सैनिकांची सुटका आम्हाला हवी होती, कारण त्यांचा हेतू 'क्रांतिकारक कृती' होता, ते आमच्यासारखेच होते. ते देशभक्त होते.

दत्त म्हणाले, “आम्ही 2 फेब्रुवारी 1946 रोजी सकाळी HMIS तलवारकडे जाणाऱ्या लाकडी पायऱ्यांवर 'छोडो भारत' आणि 'जय हिंद' सारख्या घोषणा असलेले पोस्टर्स चिकटवले. दरम्यान, आम्हाला गोंद लावतांना सामानासह पकडण्यात आले आणि 8 फेब्रुवारी 1946 रोजी आमचे कोर्ट मार्शल करण्यात आले.

भारतीय नौदलातील बीसी दत्त आणि त्यांच्या साथीदारांनी HMIS तलवार येथे "भारत छोडो" आणि "जय हिंद" पोस्टर्स लावताना पकडले त्यांना कोर्ट मार्शल दरम्यान ब्रिटीश अधिकारी फ्रेडरिक किंगने ब्लॅक बास्टर्ड सारख्या वांशिक अपशब्दांचा सामना करावा लागला. याच ठिणगीने 18 फेब्रुवारी 1946 ला ही आग आणखी पेटली. दैनिक दिव्य मराठी नेटवर्कचे कलाकार गौतम चक्रवर्ती यांनी या घटनेचेही चित्रण केले आहे.

सुनावणी दरम्यान, कमांडिंग ऑफिसर फ्रेडरिक किंग याने आमच्या सहकारी मरीनला 'ब्लॅक बास्टर्ड' 'सन ऑफ बिच' आणि कुली असे वांशिक अपशब्द वापरले. यानंतर मी, एम एस खान आणि मदन सिंग यांच्यासोबत भारतीय नौदलाला उपोषण करण्यास प्रवृत्त केले. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 1500 खलाशांनी वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेवण नाही तर कामही नाही’ अशा घोषणा दिल्या. दरम्यान, मुंबई हवाई दलाचे वैमानिक आणि विमानतळ कर्मचारीही वांशिक भेदभावाविरोधात संपावर गेले होते, वैमानिकांनीही या बंडाला पाठिंबा दिला होता.

नेहरू आणि गांधी यांची भाषणे ऐकण्यासाठी नौसैनिक लपून जात

बंडाचा एक भाग असलेले नाविक बीबी मुथप्पा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "आमच्यापैकी बरेच खलाशी जवाहरलाल नेहरू आणि इतर नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात जात असत. माझ्यावर महात्मा गांधींचा खूप प्रभाव होता. या बंडाच्या काळात, 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 'गेटवे ऑफ इंडिया' आणि ताजमहाल हॉटेलजवळील रॉयल नेव्हीच्या कोस्टल ब्रँचमध्ये तैनात असलेल्या खलाशांना त्यांच्या खोल्या आणि शौचालयात बंद केले होते. अनेक जहाजांवरही असेच घडले.

ताजमहाल हॉटेलवर मरीन हल्ला तर करणार नाही ना, अशी भीती ब्रिटिशांना होती. स्वयंपाकी, सफाई कामगार, अन्नसेवक आणि अगदी सैनिक बँडच्या सदस्यांकडून शस्त्रे काढून घेण्यात आली. 22 फेब्रुवारीपर्यंत, मुंबईच्या तटीय शाखेला मराठा लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांनी वेढले होते. यादरम्यान बंडखोर आणि त्यांच्यात अनेक तास गोळीबार सुरू होता.

19 फेब्रुवारी 1946 रोजी सुरू झालेल्या या बंडाला मुंबईतील गिरणी कामगारांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान शहरातील रस्त्यावर सुमारे दोन लाख लोक होते. यामुळेच मारले गेलेल्या 400 लोकांपैकी सर्वाधिक मुंबईतील होते.

23 ते 24 फेब्रुवारी 1946 दरम्यान, बंड थंड होण्यास सुरुवात झाली. बंडाचे नेतृत्व करणाऱ्या बहुतांश भारतीय नौसैनिकांनी सरदार पटेलांच्या आदेशानुसार शरणागती पत्करली. यादरम्यान बंडखोर नौसैनिकांनाही मुंबईच्या रस्त्यावर पकडण्यात आले. या चित्रात दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील एका रस्त्यावर ब्रिटीश पोलिस एका बंडखोर मरीनला घेऊन जाताना दिसत आहेत.

पटेल यांच्या सांगण्यावरून एका आठवड्यात बंडखोरांनी केले आत्मसमर्पण

बंडखोर बीसी दत्त आणि एमएस खान यांचे साथीदार मदन सिंह यांच्या मते- आम्ही काँग्रेस नेत्यांच्या विशेषत: सरदार पटेल यांच्या विनंतीनंतर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. कोणताही छळ होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते. आम्ही आधीच स्पष्ट केले होते की बंडखोर मरीन ब्रिटीश अधिकार्‍यांना शरण जाणार नाहीत तर त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना शरण जातील. त्यानंतरच बंडखोरांनी 23-24 फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले.

वर्षानुवर्षे या बंडाची इतिहासात नोंदही नाही

निवृत्त कमांडर श्रीकांत बी. केसनूर स्पष्ट करतात की, भारतीय नौदलाच्या इतिहासात पूर्वी या घटनेला विद्रोह, रॉयल इंडियन नेव्ही विद्रोह आणि बॉम्बे विद्रोह असेही म्हटले जात होते, परंतु आता आम्ही त्याला उठाव म्हणतो. अनेक वर्षे या आंदोलनाचे दस्तावेजीकरणही झाले नाही. यामुळेच देशवासीयांना या चळवळीची माहिती नसून, भारतीय नौदलाने काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे दस्तऐवजीकरण केले आहे.

या बंडाचा भाग असलेल्या बीबी मुथप्पा म्हणतात की, खलाशांच्या बंडाला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळाला नाही, त्यांनी खलाशांना शिस्तीत राहण्यास सांगितले. नेहरूंनी नौदल बंडापासून स्वतःला दूर केले. कदाचित त्यामुळेच स्वतंत्र भारताच्या इतिहासात आम्हाला स्थान नाही. भारतीय नौदलाने 50 वर्षांहून अधिक काळानंतर आमच्या योगदानाचे स्मरण केले आणि एक छोटेसे स्मृतिचिन्ह देऊन कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

अखेरीस वाचा बॉम्बे नौदलाच्या विद्रोहाचा तारखेनुसार तपशील...

बातम्या आणखी आहेत...