आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआराेग्य मंत्रालयाने विनालक्षण व साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या हाेम आयसाेलेशनचा कालावधी १४ दिवसांवरून सात दिवसांवर आणला आहे. या बदललेल्या निर्णयामागे संसर्गाच्या तीव्रतेचे कारण आहे. हाेम आयसाेलेशनसह इतर मुद्द्यांवर पवनकुमार यांनी एनटागी ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र अराेरा व प्राे. नीरज निश्चल यांच्याशी केलेली चर्चा..
होम आयसाेलेशन सात दिवसांचे का केले?
विनालक्षण व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांतील विषाणूचा प्रभाव ५ ते ७ दिवसांत कमी हाेताे, असा दाेन वर्षांतील क्लिनिकल अनुभव असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सातव्या दिवशी आरटीपीसीआरचा अहवाल येत असे. माेठ्या लाेकसंख्येला संसर्ग झाला आहे. म्हणूनच विलगीकरणाचा कालावधी जास्त असण्याची गरज नाही.
हा बदल ओमायक्राॅन व्हेरिएंटच्या दृष्टीने आहे की काेराेना रुग्णांसाठी?
व्हेरिएंट काेणता का असेना, साैम्य तसेच विना लक्षण असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
डेल्टामुळे गंभीर आजारी पडण्याचा धाेका आहे?
काेणताही विषाणू असाे. सात दिवसांनंतर विषाणूचा शरीरातून नायनाट हाेताे. आजार धाेकादायक असल्यास संसर्गाच्या पाचव्या दिवशी स्थिती गंभीर हाेते. त्यामुळे रुग्णास दाखल करावे लागेल.
सात दिवसांनंतरही क्वाॅरंटाइनमध्ये राहावे का?
रुग्णात लक्षणे आणि ज्वर नसल्यास सात दिवसांनंतर क्वाॅरंटाइनमध्ये राहण्याची मुळीच गरज नाही. सहाव्या दिवशी लक्षणे दिसत नसल्यास रुग्ण अगदी आठव्या दिवशी घराबाहेर पडू शकताे. परंतु काेविडचे प्राेटाेकाॅल मात्र पाळले जावे.
बहुतांश देशांत हाेम आयसाेलेशन पाच दिवसांचे आहे. भारतात ७ दिवस का?
हा निर्णय भारतातील स्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. सात िदवसांनंतर बाहेर पडण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह यावी, असे अनिवार्य नाही. म्हणूनच सात दिवसांचा काळ सुरक्षित मानला गेला आहे.
साैम्य लक्षणांच्या सर्व वयाेगटातील व्यक्तीने हाेम आयसाेलेशनमध्ये राहावे?
गंभीर आजार असलेल्या साठीतील नागरिकांनी साैम्य स्वरूपाची लक्षणे असली तरी सात दिवसांचे हाेम आयसाेलेशन करावे. परंतु त्यासाठी आधी डाॅॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
हाेम आयसाेलेशनमध्ये साैम्य लक्षणांत काय करावे?
अशा रुग्णांनी डाॅक्टरांचा संपर्कात राहावे. आॅक्सिजनचे प्रमाण कमी हाेऊ देऊ नये. त्यावर निगराणी ठेवली पाहिजे. एका तासाच्या अंतराने तीनवेळा आॅक्सिजनची पातळी ९३ किंवा त्यापेक्षा कमी असल्यास तसेच श्वास घेण्यास त्रास हाेत आहे. त्याचबराेबर तीन दिवसांपासून सतत १०० वर ताप असल्यास अशा रुग्णाने रुग्णालयात दाखल व्हावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.