आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॉलेज रिपोर्ट:दैनंदिन जीवनात सामान्यांच्या गरजेच्या या 6 महत्त्वाच्या क्षेत्रात आपण किती ‘स्वदेशी’

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दैनंदिन जीवनात सामान्यांच्या गरजेच्या या ६ महत्त्वाच्या क्षेत्रात आपण किती ‘स्वदेशी’
  • उत्पादने ब्रँडिंगमध्ये जगात मागे, ते वाढवण्याची गरज : नीती आयाेग

(धर्मेन्द्र सिंह भदौरिया)

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आत्मनिर्भरतेवर भर दिला आहे. भास्करने सर्वसामान्य व्यक्तींच्या कामाशी जाेडलेल्या ६ प्रमुख क्षेत्रांमधील स्वदेशी कंपन्यांची स्थिती जाणून घेतली. दूरसंचार आणि एफएमसीजी क्षेत्रात भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र, माेबाइल हँडसेट, ग्राहकाेपयाेगी वस्तू क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा बाेलबाला आहे. या संदर्भात बाेलताना दिल्ली स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्सचे प्राध्यापक राम सिंह म्हणाले, आत्मनिर्भर भारत शक्य आहे. पेट्राेलियम उत्पादने, गुगल, फेसबुक सारख्या तंत्रज्ञान कंपन्या साेडल्या तर आपण आत्मनिर्भर बनू शकताे. जपान, जर्मनीसारखे देशही साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मच्या बाबतीत विदेशी प्लॅटफाॅर्मवर अवलंबून आहेत. नीती आयाेगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, आपली उत्पादने जागतिक बाजारात ब्रँडिंगमध्ये पिछाडीवर आहेत. आपल्या देशातील लहान व मध्यम उद्याेग जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांच्या व्यवसायाची मर्यादा १०० काेटी रुपयांपर्यंत निश्चित कर‌ण्यात आली आहे. स्वयंपूर्ण याचा अर्थ आपण परकीय भांडवली गुंतवणूक वा एमएनसीचा विराेध असा नाही. टेक्नाेपॅक कन्सल्टिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अंकुर बिसेन म्हणाले, देशी कंपन्यांच्या तुलनेत बहुराष्ट्रीय कंपन्या लाभांश आणि राॅयल्टी परदेशात घेऊन जातात, पण ती १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. अशामध्ये स्थानिक ब्रँड किंवा उत्पादनांना चालना द्यावी लागेल, परंतु माेबाइल उत्पादन वा ग्राहकाेेपयाेगी वस्तू क्षेत्रात स्थानिक कंपन्यांच्या तुलनेत विदेशी कंपन्या व्यवसायात खूप पुढे आहेत हे मान्य करावे लागेल.

> वाहन : मारुती-सुझुकीची एका वर्षात १४ लाखांपेक्षा जास्त वाहनांची विक्री

देशाच्या जीडीपीमध्ये वाहन, वाहनांच्या सुट्या भागांचे याेगदान ९.४ % म्हणजे जवळपास १८ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त.२०१९-२० मध्ये २७.७५ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली.

भारतीय कंपनी 

प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये स्वदेशी कंपन्यांमध्ये महिंद्रा २०१९-२० मध्ये आघाडीवर हाेती. कंपनीने १.८७ लाख गाड्यांची विक्री केली.

विदेशी कंपनी

मारुती-सुझुकीमध्ये सुझुकी जपानी कंपनीचा हिस्सा आहे. २०१९-२० मध्ये कंपनीने देशात सर्वात जास्त १४.२ लाख प्रवासी वाहनांची विक्री केली.

> दूरसंचार क्षेत्र : देशातील सर्वाधिक ३३% ग्राहक आता जिआेकडे

देशात जानेवारी २०२० पर्यंत ११५ काेटींपेक्षा जास्त माेबाइल ग्राहक हाेते. २०१८ मध्ये कंपनीने १०.४ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली हाेती.

भारतीय कंपनी 

ट्रायच्या ३१ जानेवारी २०२० पर्यंतच्या अहवालानुसार माेबाइल ग्राहकांत सर्वाधिक ३२.५६ % हिस्सा रिलायन्स जिआेचा आहे.

विदेशी कंपनी 

२८.४५ % ग्राहकांसह व्हाेडाफाेन- आयडिया दुसऱ्या स्थानी आहे. आयडिया भारतीय कंपनी असून तिचा ब्रिटनच्या व्हाेडाफाेनशी करार आहे.

> एफएमसीजी: आयटीसी महसुलामध्ये देशातील सर्वात माेठी कंपनी

इंडिया ब्रंॅड इक्विटी फाऊंडेशनच्या अनुसार एफएमसीजी देशातील चाैथे सर्वात माेठे क्षेत्र आहे. २०१७-१८ आर्थिक वर्षात एफएमसीजीला ३.९६ लाख काेटी रुपयांचा महसूल मिळाला.

भारतीय कंपनी 
देशातील सर्वात माेठ्या आयटीसी एफएमसीजी कंपनीला ४९,८६२ काेटी रु. (२०१८-१९ )महसूल मिळाला.

विदेशी कंपनी 

हिंदुस्तान यूनिलिव्हरला २०१८-१९ आर्थिक वर्षात ३८ हजार २२४ काेटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

> ग्राहकाेपयाेगी वस्तू : संॅमसंग सर्वात माेठी कंपनी, स्वदेशीमध्ये व्हाेल्टास आघाडीवर

वर्ष २०१९ मध्ये ग्राहकाेपयाेगी वस्तू उद्याेगाची बाजारपेठ जवळपास ७६ हजार ४०० काेटी रुपयांची (१०.९३अब्ज डॉलर) हाेती. आताही त्यात वेगाने वाढ हाेत आहे.

भारतीय कंपनी 

टाटा समुहातील व्हाेल्टासला २,१२० काेटी रु. एकूण उत्पन्न (२०१८-१९) मिळाले. बाजार हिस्सा ५ %च्या आसपास.

विदेशी कंपनी 

ग्राहकवस्तू बाजारात (मोबाइल हंॅडसेट साेडून) सॅमसंगचा १५ ते १८ % बाजारहिस्सा आहे.

> मोबाइल हंॅडसेट : आघाडीच्या ५ कंपन्यांमध्ये एकही भारतीय नाही

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशननुसार वर्ष २०१९ मध्ये देशात २८.२९ काेटी हंॅडसेटची विक्री (शिपमेंट)झाली. यात स्मार्टफाेनची संख्या जवळपास १५.२५ काेटी हाेती.

भारतीय कंपनी

भारतीय कंपन्यांत लाव्हाची स्थिती चांगली असून तिने २०१९ मध्ये १.५ काेटी फिचर फोन व १० लाखांपेक्षा जास्त स्मार्टफाेन विक्री केली.

विदेशी कंपनी 

२०१९ मध्ये स्मार्टफाेन शिपमेंटमध्ये ४.३६ काेटी युनिटसह शाओमी सगळ्यात आघाडीवर हाेती. तिचा वाटा २८.६ % हाेता.

> पादत्राणे : विदेशी कंपन्यांत बाटा आघाडीवर, स्वदेशीमध्ये रिलॅक्साे

भारतीय पादत्राणांची विद्यमान बाजारपेठ अंदाजे ७५ हजार काेटी रुपयांची आहे. पादत्राण बाजारपेठेत असंघटित क्षेत्राचा सर्वात जास्त वाटा आहे.

भारतीय कंपनी 

रिलॅक्साे फूटवेअर या क्षेत्रातील सर्वात माेठी भारतीय कंपनी आहे. २०१८-१९ मध्ये कंपनीला २,२९३ काेटी रुपयांचा महसूल मिळाला.

विदेशी कंपनी 
बाटा या क्षेत्रातील सर्वात माेठी कंपनी. स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बाटाला २०१८-१९ मध्ये २,९२८ काेटी रु.महसूल मिळाला.

बातम्या आणखी आहेत...